भाजपला कोणीही थांबवू शकणार नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2020
Total Views |

j p Nadda maharashtra _1&




नवी मुंबई
: भाजपला एकट्याने विजयश्री मिळवायची आहे. आता आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. पुढील निवडणुका भाजप विरुद्ध सर्व अशा होणार आहेत. त्यामुळे सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावून राज्यात भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणण्याचा निर्धार करा, असे ठणकावून सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना स्फूर्तिमंत्र मंत्र दिला.


भाजपच्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे नड्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील चित्र तुम्हाला पालटायचे आहे. एक गंभीर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काम करायचे आहे. ‘ऑल व्हर्सेस वन-भाजप’ अशी तयारी तुम्हाला करायची आहे. आपल्याला एकट्याने विजय मिळवायचा आहे, कोणी भाजपला थांबवू शकणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो, असेही नड्डा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र आमच्या मित्रपक्षाने दगलबाजी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. ही अभद्र, अनैसर्गिक आघाडी आहे. या आघाडीविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी गावपातळीपर्यंत प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावावी. आता कार्यकर्त्यांनी पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी ३७०वे कलम रद्द झाल्यामुळे काश्मीरच्या विकासाला मिळालेली गती, मोदी सरकारने देशाला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी घेतलेले निर्णय याचा आढावा घेतला.


नड्डा पुढे म्हणाले की, भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. ३७०व्या कलमाविरोधात १९५२ पासून म्हणजे जनसंघाच्या स्थापनेपासून आमच्या कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्यांनी लढा दिला. ३७०वे कलम रद्द करणे हा आमच्या दृष्टीने भावनेचा विषय नव्हता. हे कलम रद्द केल्याने काश्मीरच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. काश्मीरमधील दहशतवाद संपू लागला आहे. काश्मीरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस मतदान केले. श्रीनगर मध्ये १०० टक्के मतदान झाले, असेही नड्डा यांनी सांगितले.


अधिवेशनातून नवी ऊर्जा

भाजपचे हे अधिवेशन महत्त्वपूर्ण आहे. अधिवेशनातून नवीन ऊर्जा घेऊन आता सर्व कामाला लागतील, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. राज्यात जनादेश मिळाला होता, पण काही लोकांनी मागच्या दाराने सरकार बनवले, अशी टीकाही विखेंनी शिवसेनेचे नाव न घेता केली.
@@AUTHORINFO_V1@@