प्लीज, पाडा रे....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2020   
Total Views |



CM MAHARASHTRA_1 &nb


मी त्यांना सरकार पाडायचे तर आमंत्रण दिले नाही ना? तर, तह करून सोबत असलेल्यानांही तसेच वाटत असावे. काय करू, जगदंब ! हिम्मत असेल तर पाडा रे सरकार प्लीज!


हुश्श
.. शेवटी म्हणालो मी की, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. काय करणार? सारखं सरकार टिकेल ना टिकेल ना? की उलथेल (उलथेल म्हणजे कोसळेल हो,) तर कोसळणार तर नाही ना? असे वाटत राहते. त्यांची मी पुन्हा येईन, गोड बातमी येणार, हे सरकार आपल्या कर्माने पडणार, ही असली स्फोटक विधाने माझ्या मनात घर करून राहिली आहेत. बाबा असते तर? छे, बाबा असते तर दिल्ली आणि बारामतीची भानामती झालीच नसते. तो विचारच सोडलेला बरा.


तर शेवटी मी आवाहन दिलेच आहे की
, हिम्मत असेल तर पाडा सरकार. मात्र यावर काही लोकांनी बारामतीच्या धाकट्या साहेबांना, धाकटे म्हणजे पुतणे महाराज हो. (नाहीतर तुम्हाला बारामतीचे धाकटे राजकुमार वाटायचे) तर त्यांना पहिले तपासून पाहिले असेल की, ते रेंजमध्ये आहेत ना? काय करावे, तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क करू इच्छिता, ती व्यक्ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, हे वाक्य स्वप्नातही कानी पडू नये असेच वाटते. काय घ्या, उद्या कोणी संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले तर? त्याला शोधा, त्याला मनवा, वर तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर नव्हताच असे जगाला खोटे सांगा. हे सगळे सुरू असताना कमळवाल्यांचे गूढ हसणे सुरूच असते. कोणावर विश्वास ठेवावा बरं? बरं ज्यांना भ्रष्ट, द्रोही वगैरे वगैरे म्हटले तेच आमच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यांच्यावर विश्वास ठेवावा, तर पुन्हा बाबा आठवतात. त्यांनी यांना दारातसुद्धा उभे केले नसते. जगदंब ! मीच विसरलो नाही. त्यातही ते कमळवाले विसरतील तर शपथ, ते तर स्वत:ही विसरणार नाहीत आणि लोकांनाही विसरू देणार नाहीत. काही लोक म्हणतात की, बारामतीच्या काकांनी आणि दिल्लीच्या मॅडमनी चांगलेच धडे दिलेत. त्यामुळेच माझ्या राज्यात मुंबईचे पालकमंत्री असलम शेख झाले आणि त्यांनी हाजी अलीचे सौंदर्यीकरण करताना मुघल पद्धतीचे गार्डन रचना करण्याचे ठरवले. मुघल शब्दावरून मला कोथळा, औरंगजेब, अफजलखान सारे काही आठवले. असो, मुघल काय, इतिहास काय, सत्ता असेल तर सगळे सोपे असते. म्हणून तर मी त्यांना म्हटले, “पाडा सरकार.” यावर शत्रूच्या गोटातल्यांना वाटते की, मी त्यांना सरकार पाडायचे तर आमंत्रण दिले नाही ना? तर, तह करून सोबत असलेल्यानांही तसेच वाटत असावे. काय करू, जगदंब! हिम्मत असेल तर पाडा रे सरकार प्लीज!


बाबासाहेबांच्या विचारांचे मारेकरी


बेगुसराय बिहार येथे डॉ
. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सीएए समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भाजप नेते गिरीराज सिंह यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला. मात्र, त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राजदच्या स्थानिक नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गंगाजलाने धुतला. कारण काय तर भाजपच्या गिरीराज सिंह हे या नेत्यांच्या मते अस्पृश्य, त्याज्य होते आणि त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला स्पर्श केला होता.


छे
! बाबासाहेबांनी माणसाला अस्पृश्य ठरवणार्‍या सगळ्या चौकटींना भेदले. प्रत्येक भारतीयाला समानता, सन्मान मिळावा यासाठी त्यांनी एक रक्तविहीन अनुपम क्रांती केली. ती क्रांती म्हणजे संविधान. दु:ख आणि संताप येतो की, संविधान सुरक्षित असतानाही संविधान खतरे मे है, वगैरेंचा टाहो फोडणार्‍या भाकप आणि राजद या राजकीय पक्षाच्या नेेत्यांनी एका माणसाला अस्पृश्य ठरवले आहे, असे करत त्यांनी संविधानाचा कायदा मोडला आहे. हे राजकीय पक्ष शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत हिंदू धर्मात विषमता, अस्पृश्यता आहे म्हणत सदान्कदा जातीय विषमतेचे राजकारण करतात. या निर्लज्ज लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अपवित्र ठरवले आहे, हे ठरवताना एका माणसाच्या स्पर्शाला अस्पृश्य ठरवले आहे. हे सर्व काही बाबासाहेबांच्या आयुष्यभराच्या विचारांच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. एका माणसाला अस्पृश्य ठरवल्याबद्दल या नेत्यांवर, संविधानानुसार कारवाई व्हायलाच हवी. आज, केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या राजकीय नेत्याला यांनी अस्पृश्यतेची वागणूक दिली आहे. या पार्श्वभूमीवर खरोखरच सर्वार्थाने अंत्यज असलेल्या वंचितांना हे कसे वागवत असतील ? मात्र, यातून एक मात्र कळले की, हे ढोंगी लोक हिंदूच्या आस्थांची नेहमी निंदा करतात. मात्र, बाबासाहेबांचा पुतळा पवित्र करण्यासाठी यांना आठवले मात्र गंगाजल. यावरूनच यांची मानसिकता कळते. बाबासाहेबांचा पुतळा शुद्ध करणारे हे इतके थोर आहेत का? सत्तेसाठी बाबासाहेबांच्या नावाचा वापर करणार्‍या या नेत्यांचे मन आणि विचारच अशुद्ध आहेत. हेच बाबासाहेबांच्या समता-बंधुता या विचारांचे मारेकरी आहेत. खरे म्हणजे भाकप, राजदच्या या नेत्यांमुळे संविधान खतरे में आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@