'हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |
Amit Shah _1  H
 
 

पराभव दिसत असताना अमित शाह यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिलं होतं


नवी दिल्ली : 'हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा' या अटलबिहारी वाजपेयी यांच्या ओळींप्रमाणेच केवळ १८ टक्के मते आणि एकही जागा दिल्लीत मिळणार नाही, असा अहवाल समोर दिसल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तगडे आव्हान देण्यासाठी अमित शाह यांनी स्वतःला प्रचारात पुरते झोकून दिले. दिल्लीत भाजपने प्रचारादरम्यान विजयाचा दावा जरी केला असला तरीही आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील तगड्या आव्हानाला जोरदार प्रतिहल्ला करण्याची तयारी आणि रणनिती अमित शाह यांनी आखली होती. एकेकाळी दिल्ली एकहाती मिळवणाऱ्या केजरीवाल यांना समोर आव्हान देण्यासाठी कुणीच नसल्याचे चित्र अमित शाह यांच्या प्रचारसभांनंतर बदलत गेले.
 
मात्र, समोर पराभव दिसत असतानाही प्रचाररॅली आणि सभांचा इतका अट्टाहास का असा प्रश्न पडतो. याचे कारण दिल्ली निवडणूक निकालांचा अहवाल होता. दिल्लीत भाजपला केवळ १८ टक्केच मते मिळतील तसेच एकही जागा जिंकता येणार नाही, असा तो अहवाल विश्वसनीय सर्वेक्षणात मिळाला होता. २०१५ साली झालेल्या निवडणूकांमध्ये भाजपला ३२.१९ टक्के मते मिळाली होती. लोकसभा निवडणूकांमध्ये ५६.८६ टक्के मते कमी मिळाली. दिल्ली भाजपच्या बैठकीत अमित शाह यांना हा अहवाल दाखवण्यात आला होता. नेमक्या याच कारणाने अमित शाह बेचैन झाले. दिल्ली भाजपचे अनेक रणनितीकार, राजकीय विश्लेषकांनी हा अहवाल पडताळला होता. काँग्रेसप्रमाणेच दिल्लीत भाजपचा सुफडा साफ होईल, अशी शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली होती. याच दिवशी भाजपची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, मित्रपक्षांनाही त्यांच्याच चिन्हांवर निवडणूक लढवण्याची मुभा देण्यात आली होती. यापूर्वी सर्व मित्रपक्ष भाजपच्या चिन्हावरच लढले होते.
 

निकाल कोणताही असो आपण लढणारच : अमित शाह
 
याच बैठकीत अमित शाह आणि रणनितीकार यांच्यात चर्चा झाली होती. हरलेल्या या लढाईत आणखी कस न लावता शांत बसावे असा सल्ला दिला होता. मात्र, अमित शाह यांनी तो नाकारत आपण स्वस्थ बसलो तर आपली तुलना काँग्रेसशी केली जाईल, तसेच मतांची टक्केवारी पुन्हा वाढवण्यासाठी या निवडणूकीत उतरावेच लागेल, निकाल काही असो आपण पूर्ण ताकदीनीशी लढू, असा ठाम निश्चय शाह यांनी केला होता.
 
 
दिल्ली जिंकण्याचा निर्धार
 
 
आम आदमी पक्षाची मक्तेदारी असणाऱ्या दिल्ली विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची स्पूर्ती अमित शाह यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली. पराभव समोर दिसत असतानाही खच्चीकरण झालेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने लढण्याचे बळ मिळाले. खुद्द अमित शाह यांनीही २३ जानेवारीपासून दर दिवशी ४ ते ५ पदयात्रा काढल्या. जनसभांचा आकडा वाढला. ३१ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर संकल्प पत्र (जाहीरनामा) घोषित करण्याची जबाबदारी सोपवली. दिल्लीत एकूण ३६ पदयात्रा आणि सभा घेतल्या. काही उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः उपस्थित राहिले. परिणामी ज्या अहवालात एकही जागा भाजपला मिळणार नाही असा कल देण्यात आला होता. निकालाअंती भाजपचे आठ आमदार दिल्ली विधानसभेवर निवडून आले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@