'जेएनयु'तील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे रा. स्व. संघ कार्यक्रमांबद्दल प्रश्न विचारतात !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |
Vinod-Tawade _1 &nbs
 
 
 

विनोद तावडे यांचे खासदार सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र

 
 
नवी मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर प्रश्न विचारणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी टीकास्त्र सोडले आहे. एकीकडे जेएनयूतील देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आवाज उठवायचा आणि दुसरीकडे एखाद्या संघटनेच्या माहितीपर कार्यक्रमाला विरोध करायचा ही दुटप्पी भूमीका सरकारमधील नेत्यांची आहे, असा टोला नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. भाजप १६ डिसेंबरपासून होणाऱ्या अधिवेशनात ठराव मांडून सरकारच्या दुटप्पीपणाचा बुरखा फाडणार असल्याची घोषणा तावडे यांनी केली आहे.
 
 
भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय परिषदेला नवी मुंबईत सुरुवात होणार आहे. याबद्दलची घोषणा करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपतर्फे कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. जनादेश धुडकावून सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले, त्यामुळे येत्या काळात भारतीय जनता पक्ष हा प्रखर विरोधी पक्ष म्हणून पुढे येईल, असे मत भाजप नेते विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, माधव भंडारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
 
 
तावडे म्हणाले, "भारतीय जनता पक्ष येत्या काळात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करेल, कर्जमाफी, झोपडपट्टी पूर्नवसन आणि सर्वसामान्यांचे प्रश्न यांना वाचा फोडण्याचे काम सरकारतर्फे केले जाणार आहे. याबद्दलचा ठराव परिषदेत मांडून त्याप्रमाणे येत्याकाळात पक्षाच्या वाटचालीची घोषणा केली जाईल. महाविकास आघाडीच्या कामकाजाविरोधात रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करणार आहोत." अशी माहिती त्यांनी दिली.
 

 

नवी मुंबई येथे राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात होणार असून भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याहस्ते ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. चंद्रकांतदादा पाटील नव्याने भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारतील. यानंतर आगामी पक्षा दिशा ठरवण्यात येईल. पक्षातर्फे लोकहीताचे अनेक प्रस्तावही यावेळी मांडण्यात येईल. भाजप अध्यक्ष उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच इतर मान्यवरांची भाषणेही यावेळी होणार आहेत.



 
 
 

 

@@AUTHORINFO_V1@@