उदयनराजे भोसले यांना भाजपतर्फे राज्यसभेवर संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |

udayanraje on rajyasabha



नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.
दिल्ली येथे शुक्रवारी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील भाजपच्या वाट्याच्या राज्यसभेच्या तीन जागांवर कोणास संधी द्यायची याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. एका जागेवरून उदयनराजे यांना राज्यसभेवर निवडून आणण्याच्या संदर्भात करण्यात आली. त्याचप्रमाणे उदयनराजे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनादेखील पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचे समजते, तर अन्य एका जागेवर विदर्भातील एका माजी खासदाराची वर्णी लागू शकते.
राज्यसभेतील महाराष्ट्राचे सात सदस्य येत्या २ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. त्यामध्ये भाजपचे अमर साबळे, भाजपपुरस्कृत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपपुरस्कृत अपक्ष संजय काकडे, काँग्रेसचे हुसेन दलवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजिद मेमन आणि शिवसेनेचे राजकुमार धुत यांचा समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@