गायिका सावनी रविंद्रचे बंगाली संगीतसृष्टीत पदार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |
savani_1  H x W



‘शोन रे शोखी’ या बंगाली गाण्याला सावनीचा आवाज
मुंबई : आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र हीने नुकतेच बंगाली संगीतसृष्टीत पदार्पण केले आहे. यापूर्वी सावनीने मराठी, गुजराती तमिल, तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा सहा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.


‘शोन रे शोखी’ हे तिचे पहिले बंगाली गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. बंगाली गाणे गाण्यासाठी सावनी बंगाली भाषा शिकली. 'गाणं गाताना शब्द उच्चारणही महत्वाचं असतं. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. तो ही यायला हवा. त्यामूळे गाण्यावर अर्थातच खूप मेहनत करावी लागली. हे गाणं आपली स्वप्न साकार करण्यासाठी निघालेल्या मुलीचं मनोविश्व सांगणारं गाणं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना मनोबल देणारं आणि सकारात्मक दृष्टीकोण देणारं गाणं आहे', असे सावनी या गाण्याबद्दल सांगताना म्हणते.






नाबरून भट्टाचारजी यांनी हे गाणे लिहिले असून, शुभंकर शेंबेकरने या गाण्याला संगीत दिले आहे. डॉ. आशिष धांडे ह्यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याचे चित्रीकरण गोव्यात करण्यात आले आहे. गाण्याच्या मूडनूसार, गोव्यासारख्या शांत आणि रम्य ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. नवीन शहरात एकटीने राहणे, वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देणे, आणि करीयर करणे हे कठीण नक्कीच असते, पण अशक्य नसते हेच या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@