काश्मीरप्रश्नी भारताने तुर्कीला फटकारले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |

pakista turkey india_1&nb



नवी दिल्ली
: तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यीप एर्दोगान यांनी एकदा पाकिस्तानच्या भेटीवर पुन्हा एकदा भारताविरूद्ध विष ओकले. कश्मीरप्रश्नात लक्ष घालत ते म्हणाले की,रजब तैयब इरदुगानसाठी काश्मीर तेवढेच महत्त्व आहे जेवढे पाकिस्तानसाठी आहे. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तुर्कीला खडे बोल सुनावले. मंत्रालयाने म्हटले आहे की, तुर्की नेत्यांनी भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करू नये असे सुनावले आहे.


भारत सरकारला तुर्कीचे राष्ट्रपती आणि तुर्की-पाकिस्तान यांनी संयुक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "जम्मू-काश्मीरच्या विषयातील तुम्ही दिलेले सर्व संदर्भ आम्ही नाकारतो. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे." मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, "आम्ही तुर्की नेतृत्वाला विनंती करतो की, पाकिस्तानकडून भारतामध्ये निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या धोक्यासह सर्व बाबींचा खरा अर्थ समजून घेण्याच्या क्षमता तुमच्यात विकसित करा. तसेच भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करू नका."


काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला बिनशर्त पाठिंबा देण्याचे आश्वासन तुर्कीने दिले होते...


पाकिस्तान दौऱ्यादरम्यान तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान म्हणाले की, जम्मू-काश्मीर हे तुर्कीसाठी तेवढेच महत्वाचे आहे जेवढे पाकिस्तानसाठी आहे. तसेच पाकिस्तानच्या समर्थनात काश्मीर आणि एफएटीएफच्या प्रश्नास बिनशर्त पाठिंबा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉनच्या वृत्तानुसार, “इरदुगान यांनी काश्मिरींच्या संघर्षाची तुलना पहिल्या महायुद्धाच्या काळात झालेल्या ओटोमन साम्राज्याच्या लढायाशी केली. अलेड पॉवर्स आणि ऑटोमन साम्राज्य यांच्यातील गॅलीपोलीच्या लढाईशी तुलना करतांना इरदुगान म्हणाले, “गॅलिपोली आणि काश्मीरमध्ये कोणताही फरक नाही. तुर्की अत्याचाराविरूद्ध आवाज उठवतच राहील”. गॅलिपोली मोहिमेमध्ये दोन लाखाहून अधिक सैनिक ठार झाले.


काश्मीरच्या मुद्यावर तुर्की पाकिस्तानबरोबर का आहे ?


भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रणेत्या राष्ट्राला मानवाधिकाराचे धडे देणारे एर्दोगान हे तुर्कीमध्ये कट्टर इस्लामिक हुकूमशहा म्हणून ओळखले जातात. एकेपीचे विद्यमान तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान हे कमाल अतातुर्क यांची कमाल्लिझम ही विचारधारा संपुष्टात आणून धर्मनिरपेक्षतेचा अंत करण्यात गुंतले आहेत. तुर्कीमध्ये एर्दोगान यांची तुलना सद्दाम हुसेन, बशर अल-असद आणि मुअम्मर गद्दाफी सारख्या हुकूमशहाशी केली जाते. एकीकडे एर्दोवनला युरोपियन संघात सामील व्हायचे आहे, दुसरीकडे, तुर्कीमध्ये ऑटोमन साम्राज्याची स्थापना करून ते स्वत: ला एक मोठा इस्लामिक नेता म्हणून स्थापित करू इच्छित आहे.
@@AUTHORINFO_V1@@