राज्यपालांनी केले पोर्तुगाल राष्ट्राध्यक्षांचे स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |
BhagatSinh-Koshyari _2&nb

राज्य सरकारच्या मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती


मुंबई : पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी राज भवन मुंबई येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. भारत व पोर्तुगाल देशांमधील संबंध दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.



BhagatSinh-Koshyari _1&nb
 


यावेळी राज्याचे उदयोग व खनिजकर्म मंत्री सुभाष देसाई, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, राजशिष्टाचार प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, उदयोजक हर्ष गोंयका व निरंजन हिरानंदानी यांसह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.




@@AUTHORINFO_V1@@