ठाण्यातील लेक सिटी मॉलला आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |

thane mall fire_1 &n



ठाणे
: ठाण्यातील कापुरबावडी लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. कापूरबावडी येथील बालकुम फायर स्टेशन जवळ हा मॉल आहे. मॉलमधील सर्व ग्राहकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.


या घटनेत अजून कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले आहे. ग्राहकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. परिसरातील लेक सिटी मॉलला आज, शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मॉलमधील चौथ्या मजल्यावर अडकलेल्या एकाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवले. या मॉलच्या चौथ्या मजल्यावर नामदेव झोरे हे अडकले होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाला नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@