सुरेश हावरे यांचा अभिमान वाटतो : नितीन गडकरी

    15-Feb-2020
Total Views |
Dr Suresh Haware _1 
 

'नॅनो हाऊसिंग' पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात



मुंबई : " सुरेश हावरे यांचा व्यक्ती म्हणून अत्यंत अभिमान वाटतो," असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. सुरेश हावरे यांनी लिहिलेल्या 'नॅनो हाऊसिंग' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. "अत्यंत खडतर अशा प्रकारचा प्रवास करून आलेल्या घरातून सुरेश हावरे आले आहेत आणि नागपूर येथे असताना आपण त्यांचा प्रवास जवळून पाहिला," असेही गडकरी म्हणाले. 'नॅनो हाऊसिंग' या पुस्तकाच्या निमित्ताने देशभरातील बांधकाम व्यवसायाचा ऊहापोहदेखील गडकरी यांनी केला.
 
सुरेश हावरे यांनी आपल्या प्रस्तावनेच्या सुरुवातीला बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीचा उल्लेख केला, पण त्याचबरोबर लहान घरांच्या मागणीमुळे निर्माण होणार्यात घरांचाही उल्लेख केला. बदलत्या मागण्यांनुसार घराचा विचार केला, तर यापुढच्या काळात यातील संधीही समोर येऊ शकतात. लहान घरांची मागणी आहे व ती पूर्ण करूनही व्यवसाय करता येऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात हाचा धागा पकडला. "बांधकाम व्यावसायिकांना 40-50 टक्के नफा कमावण्याची सवय लागली असून आता लोक घरे बांधून तयार ठेऊन बसले आहेत. त्यांना असे वाटते की, उद्या घराच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. मात्र असे काहीच होणार नसून ही मंडळी पूर्णपणे खड्ड्यात जाणार आहेत." सुरेश हावरेंनी केलेल्या संशोधनाचा उपयोग पुढच्या काळात या उद्योगाला कशा प्रकारे होईल हेदेखील त्यांनी उपस्थितांना सांगितले.
 
आपण रस्त्याच्या माध्यमातून नवे मार्ग निर्माण केले आहेत. तसेच, "दिल्ली-मुंबई हा मार्ग येणार्या तीन वर्षांत पूर्ण होईल. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला निरनिराळ्या प्रकारच्या संधी असतील," असेही गडकरी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा व माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे असे मान्यवर उपस्थित होते. या दोघांनीही सुरेश हावरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले. हावरे समूहाचे अमर हावरे व अमित हावरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.