राणीबागेत कानपूरहून आणलेल्या बाराशिंगाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020   
Total Views |
deer_1  H x W:
 
 

प्राणिसंग्रहालय प्रशासन नव्याने दाखल झालेल्या प्राण्यांच्या देखभालीमध्ये असमर्थ ठरल्याचे बोलले जात आहे.

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - मुंबईतील 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया'त (राणीबाग) वाघांची जोडी आल्याचा आनंद साजरा होत असताना गेल्या वर्षी कानपूरहून उद्यानात दाखल झालेल्या बाराशिंगाचा (स्वॅम डीअर) शुक्रवारी मृत्यू झाला. श्वसनाच्या आजाराने बाराशिंग्याच्या जोडीपैकी मादी बाराशिंगाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालय प्रशासन नव्याने दाखल झालेल्या प्राण्यांच्या देखभालीमध्ये असमर्थ ठरल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
भायखळ्याच्या राणीबागेतील आधुनिकीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. याअंतर्गत अनेक नवीन प्राणी राणीबागेत दाखल होत आहेत. बाराशिंगा, कोल्हे, तरस, अस्वल, बिबट्या या प्राण्यांचे पर्यटकांना दर्शन होत आहे. तर काही दिवसांपूर्वीच याठिकाणी औरंगाबादहून करिष्मा आणि शक्ती नामक वाघाची जोडी दाखल झाली आहे. मात्र, गेल्यावर्षी राणीबागेत आणलेल्या बाराशिंगाच्या जोडीमधील मादीचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. ८ मार्च, २०१९ मध्ये बाराशिंगाच्या या जोडीला 'कानपूर झूलॉजिकल पार्क' येथून आणण्यात आले होते. त्य़ासाठी कृत्रिम तलाव, अन्न पुरवठ्याची खोली आणि विश्रामाकरिता दलदलीचा भाग व छप्पर असा सुसज्ज पिंजरा बांधण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यांचे दर्शन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. या हरण्यांच्या बदल्यात कानपूर प्राणिसंग्रहालयाला मिलिटरी मकाव पोपटाची एक जोडी आणि नाईट हेरॉन यांच्या तीन जोडया देण्यात आल्या होत्या.
 
 
 
 
 
गेल्या आठवडाभरापासून बाराशिंगाच्या या जोडीमधील मादीला श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डाॅ. संजय त्रिपाठी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. आम्ही तिच्यावर उपाचार करण्याचे प्रयत्न करत होतो. मात्र, शुक्रवारी सकाळी ती मृत्यावस्थेत आढळ्याचे त्यांनी सांगितले. ही मादी पाच वर्षांची होती. शुक्रवारी तिचे शवविच्छेदन करण्यात आले. बाराशिंगा असलेले राणीबाग हे महाराष्ट्रातील पहिले प्राणिसंग्रहालय आहे. यामध्ये मादी बाराशिंगाचा मृत्यू झाल्याने आता नर बाराशिंगा एकटे पडले आहे. मात्र, यानिमित्ताने राणीबाग प्रशासन पुन्हा एकदा नव्या प्राण्यांच्या देखभालीमध्येही असमर्थ ठरल्याचे बोलले जात आहे. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@