देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो लवकरच कोलकातामधून धावणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2020
Total Views |

METRO KOLKATA_1 &nbs



कोलकाता
: देशात प्रथम मेट्रो सेवा सुरू करून इतिहास रचणारे कोलकाता शहर आज पुन्हा एक नवीन इतिहास निर्माण करण्यास सज्ज झाले आहे. कोलकाता मध्ये पहिली मेट्रो सेवा १९८४ मध्ये सुरू झाली, हे कार्य आज २१ व्या शतकातही सुरू आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल गुरुवारी कोलकाता पूर्व-पश्चिम मेट्रो ग्रीन सिग्नल देतील त्यानंतर ही सेवा शुक्रवारी रोजी सर्वसामान्यांसाठी सुरु केली जाईल. या मेट्रो सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो पाण्याखालून जाणाऱ्या बोगद्यातुन धावेल. ही देशातील सर्वात स्वस्त मेट्रो सेवा देखील असणार आहे. ही अंडरवॉटर लाइन १५ किलोमीटर असेल. यातील पहिल्या सहा किलोमीटर लांबीच्या मार्गाचे आज उदघाटन होणार आहे.



किमान भाडे फक्त पाच रुपये


या मेट्रोमध्ये एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकात जाण्याचे भाडे केवळ पाच रुपये असेल. रेट चार्टनुसार प्रवाशांना दोन किलोमीटरसाठी पाच रुपये, पाच किलोमीटरसाठी दहा रुपये, दहा किलोमीटरसाठी २० रुपये आणि नंतर शेवटच्या स्थानकासाठी ३० रुपये मोजावे लागतील. या मेट्रोमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा मिळतील. हे प्लेटफॉर्म स्क्रीन डोअर सुविधा आणि डिटेक्शन सिस्टम सारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच कोलकातामधील लोकांसाठी ही सेवा १२ किमीपर्यंत वाढविण्यात येईल.



देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो


कोलकाता मेट्रो रेल्वेच्या सीपीआरओ इंद्राणी बॅनर्जी यांनी सांगितले की, कोलकाता पूर्व-पश्चिम मेट्रो ही भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो असेल. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन लवकरच हुगळी नदीतुन मेट्रोचे भुयार बनविले जाणार आहे. पूर्व-पश्चिम प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे आणि मार्च २०२० पर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर प्रवाशांना पाण्याखालील मेट्रोचा एक रोमांचक अनुभव मिळेल. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सॉल्ट लेक सेक्टर पाच ते सॉल्टलेक स्टेडियमपर्यंत धावेल. या मेट्रोचा कोलकाताला मोठा फायदा होईल. आतापर्यंत मुख्य मार्गाने हे अंतर रस्त्याने पार करण्यासाठी सुमारे दीड तासाचा कालावधी लागत होता, परंतु मेट्रो सुरू झाल्याने हा प्रवास अवघ्या १३ मिनिटांत पूर्ण होईल. त्यांनी सांगितले की, सहा कोच असलेली ही नवीन अत्याधुनिक मेट्रो आहे.


केंद्रीय  रेल्वेमंत्री पीयूष गोयल करणार उद्घाटन


कोलकाता मेट्रो रेल भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ओळखल्या जाणाऱ्या १७ क्षेत्रांपैकी एक आहे. हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे १३ फेब्रुवारी रोजी या मेट्रो सेवेचे उद्घाटन करतील आणि १४ फेब्रुवारीपासून ही मेट्रो सर्वसामान्यांसाठी सुरु केली जाईल.
@@AUTHORINFO_V1@@