'शिकारा' चित्रपट आधी पहा, नंतर बोला... ; विधू विनोद चोप्रांना राग अनावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2020
Total Views |

vidhu vinod chopra_1 

काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणाऱ्या विधू विनोद चोप्रांची भावनिक 'साद'

 
 
 
मुंबई : नुकताच प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा 'शिकारा' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांची व्यथा मांडण्यात आली आहे. अनेक कारणामुळे या चित्रपटाला विरोधाचा सामना करावा लागत आहे. चित्रपट न पाहता या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर विधू विनोद चोप्रा चांगलेच भडकले. शिकाराला विरोध करणारे गाढव आहेत अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
 
 
 
 
एका महाविद्यालयामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान विधू विनोद चोप्रा म्हणाले की, “शिकारा चित्रपटाबाबत आलेल्या काही प्रतिक्रियांमुळे मी व्यथित झालो आहे. माझ्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३३ कोटी रुपये कमावले होते. तर माझ्या आईच्या स्मरणार्थ मी बनवलेल्या ‘शिकारा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३३ लाख रुपये कमावले. यावरुन लोकांनी मला ट्रोल केले. मी काश्मीरी लोकांच्या दुःखाच भांडवल केल्याचा आरोप लोकांनी माझ्यावर केला. त्यामुळे माझे अशा लोकांना एवढच सांगण आहे की, त्यांनी गाढव होऊ नये. प्रत्यक्ष चित्रपट पहावा त्यानंतर त्यावर भाष्य करावे.”
 
 
यासर्व प्रकारानंतर त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत सविस्तरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले आहे की, " मी एक काश्मीरी हिंदू असून काश्मीरमधील घटनांचा पीडितही आहे. काश्मीरमध्ये माझे घर होते, त्याची तोडफोड करण्यात आली होती. माझ्या कुटुंबावर देखील हल्ला झाला होता. माझी आई ‘परिंदा’ चित्रपटाच्या प्रिमियरसाठी एक छोटी बॅग घेऊन मुंबईला आली होती. मात्र, त्यानंतर ती कधीही परत काश्मीरला जाऊ शकली नाही. मुंबईमध्येच तिचे निधन झाले. तुम्ही मला केवळ ‘मुन्नाभाई’ आणि ‘थ्री इडियट्स’ या चित्रटांच्या निर्मात्याच्या रुपातच ओळखता. मात्र, मी गेल्या चाळीस वर्षांपासून चित्रपटांची निर्मिती करत आहे. १९७९ मध्ये मी बनवलेल्या पहिला लघुपटाची ऑस्करसाठी निवड झाली होती. त्यानंतरचे माझे काम पाहून प्रसिद्ध निर्माते इगमार म्हणाले होते की, तू कधीही आपला आत्मा विकून लोकांचे मनोरंजन करणार नाही. मी शेवटपर्यंत याच पद्धतीने काम करत आलो आहे. मात्र, आता माझ्यावर मी आत्मा विकून चित्रपट बनवल्याचा आरोप होत आहे. मी ‘शिकारा’ चित्रपटातून काश्मिरी पंडितांच्या मुद्द्याचे व्यावसायिकरण केल्याचा आरोप माझ्यावर होत आहे.
 
 
 
 
 
 
 
माझ्यावर होत असलेले हे आरोप निरर्थक आहेत कारण मला पैसाच कमवायचा असता तर मी ‘मुन्नाभाई’ आणि ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांचे दुसरे भाग बनवले असते. मात्र, मी ‘शिकारा’ यासाठी बनवला कारण आपल्यापैकी अनेक जण आमच्या दुःखांपासून वंचित आहात. मात्र, मी या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आणि पीडित आहे. १९९० मध्ये आम्हाला काश्मीरमधून हाकलून लावण्यात आले होत. जर आपल्याला इतिहासाचे ज्ञानच नाही तर तो पुन्हा घडण्याची शंका निर्माण होते आणि याचा आरोपही आपल्यावरच येतो. ‘शिकारा’ माझे सत्य आहे, माझ्या आईचे सत्य आहे. माझे सहलेखक राहुल पंडिता यांचही सत्य आहे. ही त्या समुदायाची गोष्ट आहे ज्याने इतक्या मोठ्या हिंसाचारानंतरही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. ‘शिकारा’ चित्रपटही हिंसा आणि विद्वेषाची बीजे रुजवल्याशिवाय अमानुष पीडेचा प्रत्यय आणून देण्याचा प्रयत्न आहे. हा चित्रपट एक असा संवाद सुरु करण्याच्या दिशेने टाकलेला प्रवास आहे. ज्यामुळे ही आशा निर्माण होते की, काश्मीरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये परतण्यास सक्षम होतील." अशी भावनिक साद त्यांनी या पोस्टमार्फत घातली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@