५ दिवसांचा आठवडा आणि पगार ७ दिवसांचा? : बच्चू कडू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2020
Total Views |

bacchu kadu_1  
 
 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्राप्रमाणे राज्यात ५ दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. येत्या २९ फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांना हा नवीन नियम लागू होणार आहे. या निर्णयावर राज्यमंत्री बच्चू कडू नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडा २ दिवसांचा करा, पण २ दिवस तरी कर्मचारी काम करतात का? हे आधी तपासा. 'आठवडा ५ दिवसांचा आणि पगार ७ दिवसांचा?' असा टोलाही त्यांनी निर्णायावर लगावला.
 
 
राज्यामध्ये केंद्राप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. येत्या २९ फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांना हा नवीन नियम लागू होणार आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. मात्र, राज्यमंत्री बच्चू कडू या निर्णयामुळे नाराज असल्याचे दिसते आहे. आठवडा दोन दिवसांचा करा पण दोन दिवस तरी कर्मचारी काम करतात का? हे आधी तपासा असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
 
 
"जो चांगला कर्मचारी आहे, त्याचे वेतन वाढवा. त्यांचा ४ दिवसांचा आठवडा करा, पण जो कर्मचारी, अधिकारी कामच करत नाही या सगळ्यांना पगार देताना त्यांच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे," असेही बच्चू कडू म्हणाले. "काही अधिकारी कर्मचारी काहीच काम करत नाहीत. नागरिकांच्या एक एक महिना फाईल रखडलेल्या असतात. त्यांच्या अनेक तक्रारी असतात. पदावर पगार देण्यापेक्षा कामावर पगार दिला पाहिजे. सेवा हमी कायद्याची एकही अंमलबजावणी नाही. पण या बाबतीत कुठलीही कारवाई होत नाही. ७ दिवसात फाईल पुढे गेली पाहिजे, पण यावर कुठलाही निर्णय सरकार घेत नाही." असे बच्चू कडूंनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@