...मग काँग्रेसचे दुकान बंद करायचे का? ; काँग्रेसची आपापसातच जुंपली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |

Congress_1  H x
 
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा चांगलाच तोंडघशी पडला. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसच्या नावावर भोपळा जमा झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये सध्या निराशेचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच, या निवडणुकीमध्ये पक्षाच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. यासर्व गोष्टींमुळे पक्षामध्ये खळबळ माजली आहे. याचदरम्यान, माजी केंद्रीय अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावर दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांना घराचा आहेर देत ''मग, दुकान बंद करायचे का?'' असा प्रश्न विचारला. तसेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी चाको यांनीदेखील त्यांच्यावर टीका केली.
 
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्यामुळे नेत्यांमध्ये उदासीनता पसरली आहे. अशामध्ये पी चिदंबरम यांनी अरविंद केजरीवालांना शुभेच्छा दिल्यानंतर आपच्या विजयावर गर्व का? असा खोचक सवाल करत पुढे त्या म्हणाल्या की ,"सर, योग्य सन्मानाने केवळ एव्हढेच जाणून घेण्याची इच्छा आहे की, भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस पक्ष स्थानिक पक्षांना आऊटसोर्स करत आहे का? याचे उत्तर नाही असे असेल तर मग आपण आपल्या पराभवावर मंथन करण्याऐवजी आपच्या विजयावर गर्व का करत आहोत? आणि याचे उत्तर होय असे असेल तर मग आपण आपले दुकान बंद करावे?"
 
 
एवढ्यावरच न थांबता "भाजप फूट पाडणारे आणि केजरीवाल स्मार्ट पॉलिटिक्स करत असतील तर आपण (काँग्रेस) काय करत आहोत? आत्ममंथन खूप झाले आता काम करण्याची वेळ आली आहे, असा सल्लाही शर्मिष्ठा यांनी दिला आहे. तसेच, "२०१३ साली शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या तेव्हापासूनच काँग्रेसच्या घसरणीला सुरूवाट झाली होती. एक नव्यानेच दाखल झालेल्या आपने काँग्रेसची सगळी व्होट बँक हिसकावून घेतली. ती आपण परत मिळवू शकलेलो नाहीत, ती आत्ताही आपजवळच आहे." अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी चाको यांनी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@