जुळून येती रेशीमगाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |


samudayik vivah _1 &



९ फेब्रुवारी रोजी कोठिंबे, ता. कर्जत येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून नारायण रेकी सत्संग परिवार आणि ‘स्माईल ए स्प्रेड’ या संस्थेच्या मदतीने जनजाती समाजातील २०५ जोडप्यांच्या सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा विवाहसोहळा म्हणजे संस्कार, संस्कृती, धर्म आणि समाजाच्या समरस उत्थानाचे प्रतीकच आहे.



कोठिंबेमध्ये जनजाती समुदायाच्या २०५ जोडप्यांचा विवाहसोहळा आयोजित केला तेव्हा वनवासी कल्याण आश्रमाचे
तू मै एक रक्त’ हे ब्रीदवाक्य संकल्पस्वरूपात प्रत्यक्षात उतरले. वनवासी समुदायातील जोडप्यांचा विवाह विनासायास व्हावा म्हणून शहरातील बांधवांनी त्यांचा वेळ, ऊर्जा, श्रम आणि आर्थिक मदतही केली. शहरातील भाऊ वनवासी भावाच्या सोबतीला उभा राहिला. नागरी आणि वनवासी समाजाच्या एकतेचे अप्रतिम वास्तवच होते,” हे वनवासी कल्याण आश्रमचे प्रदेश संघटक अमित साठे सांगत होते. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून कोठिंबे येथे वनवासी समाजातील जोडप्यांचासामुदायिक विवाह झाला. त्या विवाहसोहळ्याचे समन्वयक म्हणून अमित यांच्यावर जबाबदारी होती.



या विवाहसोहळ्याचा लाभ २०५ जोडप्यांनी घेतला
. शहरी भागात किंवा ग्रामीण भागात होणारे किंवा एखाद्या समाजगटाने आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा आणि कोठिंबे येथे आयोजित केलेला सामुदायिक विवाहसोहळा यामध्ये खूप अंतर आहे. कारण, ‘नाही रे’ गटातला आजही वंचित आणि समाजप्रवाहापासून दूर असलेला बांधव म्हणजे वनवासी बांधव आहे. त्यातच या समाजामधील श्रद्धा-अंधश्रद्धेचा गैरवापर करत त्यांचा फायदा घेणारेही या समाजाने पाहिलेले. त्यामुळे नागरी समाजापासून चार हात दूरच बरे असेच यांचे वागणे. गरिबी आणि गरिबीतून प्रकटलेले सर्वच प्रश्न बहुतेक वनवासी बांधवांच्या पाचवीला पूजलेले. समाजामध्ये जन्म, विवाह आणि मृत्यू या तीनही घटनांसाठी फारच विधी करावे लागतात. त्यासाठी खर्च करावा लागतो. त्याचा परिणाम मुख्यत: ’विवाह’ या संस्कारावर झाला आहे. आजही रायगड तालुक्यातील वनवासी समाजातील कितीतरी जोडपी विवाहाशिवाय सहजीवन जगत आहेत. त्यांना ती हौस आहे किंवा नवी फॅशन वाटते म्हणून नाही, तर समाजाच्या रितीभातीनुसार विवाह करण्यास खूप खर्च येतो. तितके पैसे जवळ नसतात.


त्यामुळे नाईलाजाने विवाहाशिवाय ते एकत्र राहतात
. अहोरात्र काबाडकष्ट करतात, पैसे जमवतात आणि मग लग्न करतात. लग्न करायला पैसे नाहीत म्हणून कित्येक उपवर मुला-मुलांची लग्नाची वयेही याचसाठी उलटून जातात. त्यातून अनेक कौटुंबिक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. तसा हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. या प्रश्नाची दखल घेत वनवासी कल्याण आश्रम सातत्याने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत असते. तसाच हा कोठिंबेचा सामुदायिक विवाह सोहळा. अमित सांगतात, “विवाह सोहळ्यासाठी जोडप्यांनी नावनोंदणी करावी, यासाठी एक माहिती अर्ज तयार करण्यात आला होता. रायगडमधील जोडप्यांचे अर्ज भरण्यासाठी नऊ गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटात तीनजण होते. हे गट संपूर्ण रायगडमध्ये फिरले. ५पाड्या-पाड्यावर गेले. विवाहोत्सुक जोडप्यांचे अर्ज भरले. त्यांना या विवाहसोहळ्यांची माहिती दिली. अशाप्रकारे २०५ जोडपी या सोहळ्यामध्ये सहभागी झाली. या जोडप्यांसोबत त्यांचे-त्यांचे जवळचे नातेवाईक आले होते. या वर्‍हाडींची संख्याच १० हजार होती. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता पहिले वर्‍हाड आले, तर ११ वाजता शेवटचे वर्‍हाड आले. विवाहाचा मुहूर्त दुपारी १२.४७ वाजताचा होता.



जवळजवळ सर्वच जोडप्यांनी मुहूर्त साधला होता
. एका जोडप्याची एक करवलीसुद्धा होती. ही करवली होती वनवासी कल्याण आश्रमाची महिला कार्यकर्ता. या करवलीवर खूप मोठी जबाबदारी होती. ती अशी की, या प्रत्येक नवविवाहित जोडप्याला आयोजकांकडून विविध प्रकारच्या ४१ भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. नवविवाहित कुटूंबास जे काही लागेल ते त्यात होते. अगदी नववधूस साजशृंगाराच्या वस्तूपासून ते चटई, चादर, भांडीकुंडीपर्यंत, तर या वस्तू या जोडप्यांना देणे, विवाहविधीमध्ये त्यांना मदत करणे.” हजारो लोक या विवाहसोहळ्यास आले होते. त्यांची व्यवस्था करणे सोपी गोष्ट नव्हती. पण गावातील २०० तरुणांनी या सोहळ्यास स्वेच्छेने हजेरी लावत मदत केली. वनवासी कल्याण आश्रम, नारायण रेकी सत्संग परिवार आणी ‘स्माईल ए स्प्रेड’ या संस्थेचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. मुंबईचे विनोद टिब्रेवाला व इतर देणगीदारांच्या देणगीतून या विवाहसोहळ्याला नेटकेपण प्राप्त झाले.



- अमित साठे 
@@AUTHORINFO_V1@@