भाजपची 'दीनदयाळ थाळी' सुरु ; पंढरपूरातून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |


dindayal thali _1 &n




पंढरपूर
: भाजपने 'दीनदयाळ थाळी' सुरू केली आहे. पंढपुरातून दीनदयाळ थाळीला सुरुवात केली आहे. ही थाळी अवघ्या ३० रुपयांत ही थाळी दिली जात आहे. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही थाळी सुरु करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरापासून ५ मिनिटांच्या अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ या योजनेस आजपासून शुभारंभ झाला.


पंढपुरातील काही महिलांनी श्री महिला उद्योग या संस्थेची स्थापना केली होती. या महिलांनी शेंगदाणा लाडू, पापड आणि इतर खाद्यपदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली होती. भाजपने या महिलांनासोबत घेऊन दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. यात ३ चपाती, १ भाताची मुद , १ वाटी भाजी, १ वाटी आमटी, १ वाटी ताक, लिंबू फोड, शेंग चटणी, लोणचे, पापड असे १० पदार्थ देण्यात येत आहेत. या थाळीची किंमत ३० रुपये आहे. दुपारी १२ ते १ या एक तासाच्या वेळेतच ही थाळी सर्वांना दिली जात आहे. विशेष म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक या थाळीचा लाभ घेत असून तासाभरात सुमारे ५०० भाविक या थाळीचा लाभ घेतला असे भाजपने सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीची सुरुवात झाली. भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्या पुढाकाराने ही थाळी सुरू करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@