आसाम एनआरसीचा डेटा सुरक्षित : गृह मंत्रालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |


Assam NRC_1  H



नवी दिल्ली : आसाम एनआरसीचा डेटा हटविला जात असल्याबद्दल कॉंग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. गेल्या १५ डिसेंबरपासून आसाम एनआरसी डेटा ऑनलाइन क्लाऊडवर उपलब्ध नसल्याचे ही आरोप करतेवेळी सांगण्यात आले. त्यामुळे विषयावर गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की, तांत्रिक बिघाडामुळे एनआरसीचा डेटा दिसत नाही. यामध्ये लवकरच सुधारणा केली जाईल.



आसाममधील एनआरसी डेटा हटविण्याच्या मुद्यावर, गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "एनआरसीचा डेटा सुरक्षित आहे. काही तांत्रिक त्रुटीमुळे ही आकडेवारी उपलब्ध नाही. तांत्रिक त्रुटी शोधून काढण्यात आल्या आहेत. लवकरच त्याचे निराकरण होईल व ही आकडेवारी पुन्हा दिसू लागेल."

आसाममधील कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया यांनी कुलसचिव व एनआरसी समन्वयक यांना पत्र लिहिले, “एनआरसीचा ऑनलाइन डेटा एनआरसी संकेतस्थळावरून अचानक दिसेनासा झाला आहे. एनआरसीशी संबंधित या डेटामध्ये या प्रक्रियेचा भाग असणाऱ्या किंवा त्या सर्वांच्या नावांचा समावेश असल्याचे आपल्याला माहिती आहे. हा डेटा सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार १३ ऑगस्ट २०१९ रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता.परंतु तो आता संकेतस्थळावर उपलब्ध नाही." याबाबत गृहमंत्रालयातून कॉंग्रेस नेते देवव्रत यांना स्पष्टता देण्यात आली की, एनआरसीचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असून तांत्रिक त्रुटीमुळे तो क्लाऊडवर दिसत नाही. लवकरच या तांत्रिक त्रुटीवर निराकरण केले जाईल.
@@AUTHORINFO_V1@@