सामाजिक समरसतेचा सेतू वणंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020   
Total Views |


ramai memorial_1 &nb



ग्रामविकास योजनेंतर्गत भाजप आमदार भाई गिरकर यांनी रमाबाई आंबेडकर यांचे जन्मगाव वणंद (दापोली) दत्तक घेतले. आ. गिरकरांनी या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनेंतर्गत सहा कोटी सत्तावण्ण लाख रुपये खर्च केले. विकासांतर्गतच इथे भव्यदिव्य मातोश्री रमाई स्मारक सभागृह बांधले(विश्रांतीगृह). त्याचा लोकार्पण सोहळा दि. ६ फेब्रुवारी रोजी वणंद इथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक होते, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर !



७ फेब्रुवारी म्हणजे डॉ
. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची जयंती. जयंतीच्या पूर्वसंध्येला रमाबाईंच्या स्मृतीला वनंद करण्यासाठी महाराष्ट्रभरातून आयाबाया इथे स्वेच्छेने पदरमोड करून जमल्या होत्या. रमाबाईंच्या जयंतीनिमित्त दापोली वणंदचा निसर्गरम्य शांत परिसर गजबजला होता. नुकतेच मातोश्री रमाई स्मारक सभागृहही आ. भाई गिरकरांच्या प्रयत्नांनी, त्यांच्या सहकार्याने बांधलेले. माता रमाईंच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला मातोश्री रमाई स्मारक सभागृहाचा (विश्रांती गृह) लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने समता परिषदेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. मयुर देवळे, योजना ठोकळे, रघुवीर तूरेकर, सुर्यकांत गायकवाड, विजय मोरे, शशिकांत मांढरे तसेच या प्रकल्पाचे समन्वयक चंद्रमणी गमरे उपस्थित होते. कार्यक्रमामुळे वातावरणात एक उत्साह, आनंद भरून राहिलेला. या आनंदात सहभागी झालेल्या घोळक्यातली एक वृद्धा म्हणाली, “भीमबाबाच्या बरूबर रमाईनं किती त्याग केलं, तिला इसरून चालनं का? बया, आता मह्या रमाईचं माहेर साजरं दिसू लागलंय. अगूदर पण आम्ही यायचो, पण आता मन पार आनंदून गेलं.”



६ आणि ७ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये हजारो लोक या स्मृतिस्थळी येतात
, अगदी वर्षानुवर्षे न चुकता. पण या बाहेरून येणार्‍या लोकांसाठी कसलीही सोय नव्हती. आले तर राहायचे कुठे, नैसर्गिक विधींचे काय? गावात रस्तेही नव्हते. एक वाहन आले की दुसरे त्या रस्त्यावर येऊच शकत नाही. या ठिकाणी येताना मागेच एक वाहन उलटलेही होते. पाणी, रस्ता, निवारा, शौचालय कसली कसली म्हणून सोय नव्हती. पण आज चित्र पालटले आहे. ग्रामविकास योजनेंतर्गत भाजप आमदार भाई गिरकर यांनी वणंद गाव दत्तक घेतले आणि या गावाचा कायापालट झाला. विकास काय असतो हे पाहायचे असेल तर वणंद गावाला जरूर जावे. थोडक्यात, वणंदचा झालेला कायापालट त्यांच्यासाठी सुखद धक्का होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्राणापेक्षा जास्त मानणारी ही भोळीभाबडी जनता. इथे येताना बहुसंख्य लोक पंचस्थळांना भेट देण्याच्या इच्छेनेच येतात. ती पंचस्थळे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ आंबावडे गाव, महाडचे चवदार तळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे काही काळ वास्तव्य केले, ते काळकाईचे खोंड, माता रमाबाईंचे जन्मस्थान वनंद आणि येथील बौद्ध लेणी. या पंचस्थळांना भेट देताना मुक्काम किंवा निवास करावा, अशी व्यवस्था नव्हतीच. मात्र, मातोश्री रमाई स्मारक सभागृह बांधल्याने आता जनतेला सुविधा प्राप्त झाली आहे. भव्यदिव्य विश्रांतीगृहात शेकडो लोक एकाच वेळी विश्रांती घेऊ शकतात. मुक्काम करू शकतात. तसेच या विश्रांतीगृहाला लागूनच दहा शौचालये आहेत. काही दिवसात इथे भाई गिरकरांच्या माध्यमातून ‘आरो प्रणाली’मार्फत पाणी या विश्रांतीगृहामध्येच नाही तर बाजूच्या पूर्ण बौद्धवाडीला उपलब्ध होणार आहे. शुद्ध, निर्मळ पाणी, स्वच्छ शौचालय आणि स्नानगृह, निवासाची उत्तम सोय या विश्रांतीगृहामध्ये असल्याने माता रमाईच्या स्मृतिस्थळी येणार्‍यांचा त्रास आणि खर्च दोन्ही वाचला आहे.



यावर पुण्याहून आलेल्या एका महिलेचे म्हणणे होते
, “बौद्धवाडीत आज ‘आरो प्रणालीमार्फत पाणी मिळणार ही किती मोठी गोष्ट आहे. खरेच काळ बदलला आहे. ‘अच्छे दिन’ आलेत.” त्या महिलेचे म्हणणे बरोबरच होते. ‘अच्छे दिन’च आले म्हणायचे. कारण, जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्र होरपळलेलाच आहे. वणंद गावामध्ये माता रमाईचे स्मारक व्हावे म्हणून सगळे गावकरी एकजुटीने आलेले. माता रमाईच्या गावची सरपंचही महिलाच, सुवर्णा खळे. हिंदू महिलांना हक्क मिळावेत, यासाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांमुळे आजची महिला शिकली सवरली, शासनकर्तीही बनली. त्याचे मूर्तिमंत प्रतीकच सुवर्णा खळे, तर या गावचे ग्रामविकास अधिकारी देशपांडे. देशपांडे यावेळी म्हणाले की, “ माता रमाईच्या जन्मगावी ग्रामविकास अधिकारी म्हणून मी काम करीत आहे, हे माझे भाग्य आहे. महाडच्या चवदार तळ्याचा संघर्षक्रांतीची गाथा आहे. त्यामध्ये माझ्या आत्याच्या कुटुंबानेही सहभाग घेतला होता. आजही चवदार तळ्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९ मार्चला स्मृतिवंदन होते. त्यात माझ्या आत्याच्या कुटुंबाला ‘कर्णिकां’ना मान असतो. गावचे अध्यक्ष म्हणाले,"माता रमाईंच्या स्मरणार्थ हे गाव भाई गिरकरांनी दत्तक घेतले आणि गावाचे रूप पालटले. खरेच माता रमाईची पुण्याई मोठी.” या सार्‍यांशी बोलून वाटले की, जे ब्राह्मण, मराठा, मागासवर्गीय वगैरे वगैरेमध्ये जातीयतेचे विष कालवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी वणंदची सामाजिक एकता झणझणीत अंजन आहे.



या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते भीमराव आंबेडकर
. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘माता रमाईंचा त्याग आम्हा सगळ्यांना प्रेरणा देतो. त्यांच्या जन्मगावाचा विकास होताना पाहून आनंद वाटतो. ग्रामविकास योजनेंतर्गत मातोश्री रमाई सभागृह विश्रांतीगृहाचा लोकार्पण सोहळा आज आहे. रमाईंच्या स्मृतिस्थळाला भेट देणार्‍या समाजबांधवाचा त्यामुळे हक्काचा मुक्काम करता येणार आहे. भाई गिरकरांच्या कार्य खरेच प्रशंसनीय आहे.” या सोहळ्याचे खरे प्रणेते भाई गिरकर यावेळी म्हणाले की, “हे माझ्या रमाईचे गाव आहे. आमदाराने ग्रामविकास योजनेंतर्गत गाव दत्तक घ्यायचे असते म्हणून मी हे गाव दत्तक घेतले नाही, तर या गावाशी माझे भावनिक ऋणानुबंध आहेत. मी सफाई कामगाराचा मुलगा. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाईमुळे. त्यांचे ऋण मी फेडू शकणार नाही. गावाचा विकास करण्यासाठी जे काही करता येणे शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न करीन. येत्या वर्षात वणंद गावाच्या विकासासाठी आखलेल्या सर्व योजना पूर्ण होणार आहेत. हीच माझी माता रमाईला वंदना. सभागृह शांत होते. पण प्रत्येकाच्या चेहर्‍यावर माता रमाईच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचा कर्तृत्वाचा सार्थ अभिमान होता.”

@@AUTHORINFO_V1@@