स्वकर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणारे परेश राजन गुजरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |


paresh rajan gujare_1&nbs


आपल्या प्रयत्नांना जर जिद्दीचे बळ दिले तर स्वप्नांचे क्षितिज सहज गाठता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या शांत पण महत्त्वाकांक्षी स्वभावाने राजकीय क्षेत्रात फार कमी वेळात मोठ्या स्थानावर पोहोचणारे आपल्या सेवाभावी आणि मनमिळावू स्वभावाने समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे टिटवाळा येथील प्रसिद्ध उद्योजक परेश राजन गुजरे... परेश हे शालेय जीवनात अगदी हुशार होते. नंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअर ही पदवी मिळवली. त्यानंतर एका खाजगी कंपनीत कामाला असताना त्यांना त्यांच्यातला व्यावसायिक गप्प बसू देत नव्हता. म्हणून प्रथम वडिलांबरोबर फॅब्रिकेशनच्या व्यवसायात काम करू लागले. पण, या कामात त्यांचे मन काही लागेना, आपले शिक्षण आणि आपले काम याची सांगड त्यांच्या मनात बसत नव्हती.



नंतर त्यांना मित्राच्या ओळखीने कल्याण
-शीळफाटा रोडवर रस्त्याचे काम मिळाले. हळूहळू त्यांच्या कामाची व्याप्ती इतकी वाढली ती अगदी दिल्लीपर्यंत आणि त्यानंतर परेशजी यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. एवढे सगळे सुरू असताना त्यांनी राजकीय क्षेत्रातसुद्धा पदार्पण केले. एक सामान्य कार्यकर्ता ते भाजप युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदापर्यंत त्यांचा प्रवास अगदी थक्क करणारा... कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी ‘हेल्थ फर्स्ट’ म्हणत त्यांनी स्वतःबरोबर टिटवाळामधील नागरिकांसाठी ‘फिटनेस फर्स्ट’ नावाची अद्ययावत व्यायामशाळा सुरू केली. तसेच ’KEDZEE’ नावाने प्री स्कूल सुरू केले आहे. आज अनेक कंपन्यांमध्ये त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, या नात्याने ते नेहमीच समाजातील सर्व गरजू लोकांना मदत करत असतात.



ती बांधिलकी जपताना स्मार्ट आधार कार्ड शिबीर
, आरोग्य शिबीर तसेच कला व क्रीडास्पर्धा, भारतीय सैनिक/माजी सैनिकांचा सत्कार, शरीरसौष्ठव स्पर्धा असे अनेक यशस्वी कार्यक्रमांचे आयोजन केले. आज त्यांनी आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून टिटवाळा परिसरातील शाळांमधील यशस्वी आणि गुणी विद्यार्थ्यांना ‘बालरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्याचा हा सोहळा त्यांच्या ‘सर्वम प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे आयोजित केला आहे. हा सोहळा दि.१२ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता रिजेन्सी सर्वम क्लब हाऊस, मांडा-टिटवाळा(पूर्व) येथे होणार आहे. या पुढेही या संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांनादेखील सन्मानित करणे तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धांचे आयोजन तसेच मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्याचे परेश गुजरे यांचे ध्येय आहे.त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकिर्द अशीच बहरत जावी, यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

@@AUTHORINFO_V1@@