पंतप्रधान मोदी म्हणजे सज्जन व्यक्ती : डोनाल्ड ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |

Modi Trump_1  H
 
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भारत दौऱ्यावर येण्याआधी प्रतिक्रिया दिली. "मी भारतात जाण्यास उत्सुक असून मोदी हे एक सज्जन व्यक्ती आहेत," असे ट्रम्प म्हणाले. "मी भारत दौऱ्यावर जाणार आहे. तिथे माझे स्वागत करण्यासाठी विमानतळापासून ते स्टेडियमपर्यंत लाखो लोक उपस्थित राहतील, असे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी एक सज्जन व्यक्ती असून ते माझे खुप चांगले मित्र आहेत. मी भारतात जाण्यासाठी उत्सुक आहे", असे ट्रम्प यांनी सांगितले.
 
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा मंगळवारी ‘व्हाईट हाऊस’तर्फे जाहीर करण्यात आल्या. येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येणार असून त्यांच्या दौऱ्यात भारत-अमेरिकेदरम्यान काही महत्त्वाचे व्यापार करार केले जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातबाबत दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधीच दिली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ह्यूस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यावेळी भाषण करताना मोदी यांनी ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणाही केली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@