शिमला येथून आज दिसणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2020
Total Views |



space station _1 &nb



शिमला : सहा फेब्रुवारीपासून शिमल्यात वारंवार दिसणारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सर्वसामान्यांसाठी आणि पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. मंगळवारी या अंतराळ स्थानकाची जागा सायंकाळी सहा वाजता वाजता नैऋत्याकडून ३२ अंशांकडे दिसेल. त्यानंतर पुढच्या तीन मिनिटानंतर ते दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला जाईल. हे अंतराळ स्थानक चमकत्या ताऱ्यांच्या स्वरूपात दिसेल.


या अंतराळ स्थानकामध्ये अमेरिका आणि रशियामधील सहा वैज्ञानिक या संशोधन करत आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील पाणी आणि अग्निवर हे शास्त्रज्ञ बरेच संशोधन करीत आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये वेगवेगळ्या सामग्रीत आग पकडण्यावर संशोधन होत आहे. तसेच
, बारीक पाण्याचे थेंब होणे, पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचा दबाव अभ्यास केला जात आहे.






शिमला येथून दिसणाऱ्या या
अंतराळ स्थानकाचे नासाने  वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. सामान्य लोक आणि पर्यटक हे अंतराळ स्थानक पाहण्यास उत्सुक आहेत. ६ फेब्रुवारीपासून हे पाहिले जात आहे. यात एक्पेडीशन- ६२चा समावेश आहे. नेतृत्व रशियाच्या रॉसकोसमॉसचे कमांडर नेविनोमिस्क यांनी केले आहे. यात रशियाची अंतराळ संस्था रॉस्कोस्मोसमधील एंद्रेई बागकिन, निकोलाई थिकॉनोव या दोन अन्य उड्डाण अभियंत्यांचा देखील समावेश आहे. नासा येथील फ्लाइट इंजिनीअर अँड्र्यू मॉर्गन, ख्रिस कॅसिडी आणि महिला उड्डाण अभियंता जेसिका मेयर हे ही या टीममध्ये आहेत.

@@AUTHORINFO_V1@@