दिल्ली रणसंग्राम : आपच्या किल्ल्याला भाजपचे आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2020
Total Views |

delhi election_1 &nb

दिल्लीमध्ये केजरीवालांची हॅट्ट्रीककडे वाटचाल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ७० जागांकरता झालेल्या मतदानाचा आज मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदान हे ६२.६९ टक्के नोंदवण्यात आले होते. सकाळी चालू झालेल्या मतमोजणीमध्ये सध्या सकाळी ११ वाजेपर्यंतच्या निकालामध्ये आप ७० पैकी एकूण ५५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक म्हणजे १५ जागांवर आघाडी मिळवली आहे. तसेच, काँग्रेस पक्षाने साधा भोपळाही फोडला नाही.
 
आतापर्यंतचे निकाल पाहता, यावेळी दिल्ली विधानसभेमध्ये सत्ताधारींमध्ये एक आणि विरोधी पक्षामध्ये एकच पक्ष दिसणार आहे. काँग्रेसला याही वेळेस साधा भोपळाही फोडता आलेला नाही. काँग्रेसच्या अंतर्गत मरगळीमुळे त्यांना एवढ्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी 'अजून वाट पहा, निकाल पलटूही शकतो,' अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली. तसेच, 'आधीच्या कौलांमध्ये भाजपला दोनच जागा मिळतील पण भाजपने चांगले आव्हान देत १५ जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे ही बाब अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाला विचार करायला लावण्यासारखी आहे.' असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@