बिल गेट्स यांची इकोफ्रेंडली ‘सुपरयॉट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2020
Total Views |
bill gates_1  H




‘सुपरयॉट’मध्ये १४ पाहुण्यांसह, ३१ क्रू-मेंबर्सची व्यवस्था


मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी एका जहाजाची खरेदी केली. हे जहाज एक सुपरयॉट आहे. हा सुपरयॉट फक्त लिक्विड हायड्रोजनवर चालणार आहे. या भव्य यॉटमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. या भव्य आणि आलिशान यॉटची किंमत तब्बल ६५४ मिलियन डॉलर आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार या यॉटची किंमत ४ हजार ६०० कोटी रूपये सांगण्यात येत आहे. 

गेल्यावर्षी या सुपरयॉटचा आराखडा मोनेको यॉट शोमध्ये जाहीर केला होता. आतापर्यंत साकारण्यात आलेल्या सर्वात विशाल आणि महाग यॉटपैकी हा सुपरयॉट आहे. या सुपरयॉटची उंची ३७० फुट असून, यामधीन खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा की यॉटमध्ये लिक्विड हायड्रोजन भरल्यानंतर जवळपास ६४३७ किलोमीटर अंतर कापू शकेल. या सुपरयॉटमध्ये २८ टनचे दोन व्हॅक्यूम सिल्ड टँक आहेत.

बिल गेट्स यांच्या सुपरयॉटमध्ये १४ पाहुणे आणि ३१ क्रू-मेंबर्सचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय यामध्ये एक जिम, योगा स्टुडिओ, ब्यूटी रूम, मसाज पार्लर आणि स्विमिंगपूल देखील आहे. त्याचप्रमाणे हा सुपरयॉट ३१ किमी प्रती तास वेगाने धावणार आहे. पण इकोफ्रेंडली सुपरयॉटला तयार होण्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@