शार्दूल ठाकूर : ‘ए सुपर-ओव्हर मॅन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2020
Total Views |


shardul thackur_1 &n



न्यूझीलंडविरूद्ध चौथ्या टी-२० सामन्यात भारताला ‘सुपर-ओव्हर’मध्ये विजय मिळवून देणार्‍या पालघरकर शार्दूल ठाकूरच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या चौथ्या टी
-२० सामन्यात भारताने ‘सुपर-ओव्हर’मध्ये आणखी एक विजय मिळविला आणि भारताचा जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूर हा सर्वत्र चर्चेतआला. खरंतर हा सामना ‘सुपर-ओव्हर’मध्ये गेलाच नसता. मात्र, अंतिम षटकात शार्दूल ठाकूरने केलेल्या प्रभावी मार्‍यामुळे प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या संघाला सहा चेंडूंमध्ये सात धावाही काढता आल्या नाहीत. परिणामी सामना ‘सुपर-ओव्हर’मध्ये निकाली काढण्यात आला. रोमहर्षक सामन्यात भारताला विजय मिळवून देणारा शार्दूल हा तेव्हापासून सर्वत्र प्रकाशझोतात आला. जसप्रीत बुमराह हा भारताच्या जलदगती गोलंदाजीचे सध्याचे प्रमुख अस्त्र मानले जाते. सध्याच्या घडीला गोलंदाजांमध्ये तो अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने जर हा करिष्मा केला असता, तर ते कदाचित नवल वाटले नसते.



मात्र
, पहिल्यांदाच विदेशी दौर्‍यावर संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरने ते करून दाखवल्यामुळे त्याच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे. आपल्या पहिल्याच परदेशी दौर्‍यावर चमकदार कामगिरी करणारा शार्दूल हा सध्या क्रिकेटविश्वात सर्वत्र चर्चेत असून त्याचे करावे तितके कौतुक कमीच म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, आपल्या परदेशी दौर्‍यावर अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करणारा हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. आपल्या पहिल्याच परदेश दौर्‍यातील सामन्यात शतक ठोकण्याची किमया याआधी अनेक फलंदाजांनी केली. मात्र, गोलंदाजांमध्ये काहीतरी विशेष करण्याची कामगिरी शार्दुलनेच केली असून तो कौतुकास पात्र आहे, यात शंकाच नाही. आजच्या घडीला क्रिकेटविश्वात तो ‘सुपर-ओव्हर मॅन’ म्हणून ओळखला जात असला तरी इथवरचा त्याचा प्रवास हा संघर्षपूर्ण राहिला आहे.



शार्दूल ठाकूर हा मूळचा पालघरचा रहिवासी
. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पालघरमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचा मानदेखील शार्दूल ठाकूरला मिळाला आहे. पालघर जिल्हा हा मुंबईशी संलग्न असलेला जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी आजवर या जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याची संधी अद्यापपर्यंत कुणाला मिळाली नव्हती. शार्दूलच्या रूपाने पहिलावहिला पालघरकर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून उदयास आला असून जिल्ह्यातील अनेकांना त्याचा अभिमान वाटतो. शार्दूलचा जन्म पालघरमध्ये १६ ऑक्टोबर, १९९१ रोजी झाला. त्याचे वडील नरेंद्र ठाकूर हे नारळाचे व्यापारी. समुद्रकिनारा लाभलेल्या या पालघरमध्ये क्रिकेट खेळण्याचे वेड अनेक मुलांना आहे.


लहानपणापासूनच शार्दूलला क्रिकेट खेळण्याचे भयंकर वेड
. समुद्रकिनार्‍यावर तो नेहमी क्रिकेट खेळण्यास जाई. लहानपणापासूनच खेळाची रूची असलेल्या शार्दूलला अभ्यासात तसा रस कमीच. क्रिकेटच्या खेळातच त्याचे अधिक मन रमायाचे. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला हा शार्दूल एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होईल, असा आम्ही स्वप्नातही विचार केला नसल्याचे त्याचे कुटुंबीय नेहमी सांगतात. मात्र, त्याने आपल्या मेहनत, अपार कष्ट आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर त्याने आपले स्वप्न स्वतः पूर्ण केल्याचे कौतुक त्याच्या कुटुंबीयांकडून केले जाते. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,’ ही म्हण शार्दूलला अगदी योग्य प्रकारे लागू होते. लहानपणीच त्याने आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेदरम्यान एकाच षटकात सहा चेंडूंवर सहा षट्कार खेचण्याचा पराक्रम केला होता. तेव्हापासून तो जिल्ह्यात ‘अष्टपैलू खेळाडू’ म्हणून प्रसिद्ध झाला. मुळातच क्रिकेटमध्ये रस असणार्‍या या शार्दूलने क्रिकेटमध्येच आपले करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने आपल्या कुटुंबीयांजवळ क्लबमधील प्रशिक्षण मिळवून देण्याची मागणीदेखील केली. आर्थिक परिस्थितीअभावी क्लबमध्ये जाणे परवडणारे नसल्याने पदरमोड करत ठाकूर कुटुंबीयांनी शार्दूलची ही इच्छा पूर्ण केली.



क्लबमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रशिक्षण घेतल्यानंतर
‘रणजी’सह इतर सामने खेळण्यासाठी शार्दूलला पालघर ते मुंबई असा अनेकदा प्रवास करावा लागत असे. लांबचा प्रवास असला तरी शार्दूलने कधी गुडघे टेकले नाही. अपार कष्ट करत त्याने आपला सराव सुरूच ठेवला. अखेर त्याच्या या कष्टाचे चीज झाले. रणजी सामन्यांमध्ये उत्तम प्रदर्शन केल्यानंतर त्याला ‘आयपीएल’मध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१५ साली ‘दिल्ली डेअर डेविल्स’ संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिले. शार्दूलने यावेळी अनेक सामन्यांत चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नजर त्याच्यावर पडली आणि शार्दूलसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले. ‘आयपीएल’ सामन्यात धोनीने आपल्या संघात त्याचा समावेश केल्यानंतर अनेक क्रिकेट प्रशिक्षकांनी शार्दूलची कामगिरी पाहून त्याला आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्याबाबत सकारात्क मत व्यक्त केले. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात त्याला संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने ‘सुपर-ओव्हर’मध्ये इतिहास घडविला. पहिल्याच परदेश दौर्‍यात चमकदार कामगिरी करणार्‍या पालघरकर शार्दूलच्या कर्तृत्वाला सलाम...!



- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@