एकतर्फी लक्षणांचे आजार
One Sided Disease
माणसाला जेव्हा आजार होतो तेव्हा तो कुठल्याही प्रकारे लक्षणे दाखवू लागतो. आजाराची दिसणारी ही लक्षणे काहीवेळा फक्त शारीरिक पातळीवर असतात. काहीवेळा मानसिक पातळीवर असतात किंवा काहीवेळा वैकल्पिक असतात, ज्याप्रकारे आजार त्याची लक्षणे दाखवत असतो. त्याचप्रकारे मग त्याचे वर्गीकरण करून त्याचा अभ्यास करावा लागतो. होमियोपॅथीमध्ये सर्व प्रकाराच्या आजारांचे अत्यंत बारकाईने असे निरीक्षण करून मग त्याचा अभ्यास केला गेला आहे. आज आपण अशाच प्रकारच्या आजाराचा अभ्यास करणार आहोत, ज्याला ‘एकतर्फी लक्षणांचे आजार’ म्हणजेच ‘वन साईडेड डीसिस’ असे म्हणतात. याची जर व्याख्याच करायची म्हटली तर जे आजार अतिशय कमी लक्षणे दर्शवितात, अशा आजारांना ‘एकतर्फी लक्षणांचे आजार’ म्हणतात. या आजारात एक किंवा दोन अशी मुख्य लक्षणे असतात जी फार प्रामुख्यानेच दिसतात व या मुख्य दिसणार्या लक्षणांमुळे इतर सर्व लक्षणे अस्पष्ट होतात किंवा झाकोळली जातात.
या प्रकारचे आजार हे मुख्यत्वे ‘जुनाट आजार’ (Chronic Disease) या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांचा धोका असा असतो की, यात कमीत कमी लक्षणे दिसत असल्याने असे असे आजार बरे होण्यास फार कमी कालावधी जातो. डॉ. हॅमेमान यांना ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ या ग्रंथात परिच्छेद १७२ ते परिच्छेद १८४ मध्ये या प्रकारच्या आजाराबद्दल विस्तृत विश्लेषण केले आहे. हे आजार आरोग्याचे कसे व कशाप्रकारे उपचार केला असता हे आजार बरे होण्यास मदत होते. त्याचेही मार्गदर्शन केले आहे. अभ्यासासाठी सोयीचे व्हावे म्हणून या एकतर्फी लक्षणांच्या आजाराचे दोन भागात विभाजन केले आहे. दिसणार्या मुख्य लक्षणांची प्रकृती पाहून हे वर्गीकरण केले गेले आहे.
अ) अंतर्गत तक्रारी व लक्षणे असणारे आजार
ब) फक्त बाह्य तक्रारी व लक्षणे दिसणारे बाह्य स्वरूपी आजार.
अ) अंतर्गत तक्रारी व लक्षणे असणारे आजार हे आजार पुन्हा दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत.
१) ज्या आजारांमध्ये फक्त शारीरिक पातळीवर व शरीराच्या अवयवांच्या पातळीवर लक्षणे व चिन्हे दिसून येतात व ज्या आजारांमध्ये आजाराचे मुख्य लक्षण हे फक्त शारीरिक व अवयवांच्याच पातळीवर असते. त्यावेळी ते फक्त अवयव निगडित आजार असे म्हणतात.
उदाहरणार्थ - एखाद्या रुग्णाला वर्षानुवर्षेडोकेदुखी, अर्धशिशी अथवा चक्कर येणे असा त्रास असतो व त्याव्यतिरिक्त त्याला दुसरे कुठलेही लक्षण नसते.किंवा एखाद्या रुग्णाला बर्याच काळापासून अतिसाराचा त्रास असतो व काही पचनास जड पदार्थ खाण्यात आले की तो वाढतो इत्यादी.
२) काही एकतर्फी आजारात फक्त मानसिक लक्षणेच मुख्यत्वे करून दिसतात. या लक्षणांचा जोर इतका असतो की, बाकीची शारीरिक किंवा अवयवांची लक्षणे या मानसिक लक्षणांच्या पुढे पूर्णपणे झाकोळून जातात, अशा आजारांना आपण मानसिक आजार असेही म्हणतात. अनेक प्रकारची भीती, त्रास होणे, काही प्रकारचे चरपळर, अपुळशींळशी असे आजार या प्रकारात मोडतात.
(क्रमश:)
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)