राष्ट्राय नम: पुस्तकाचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2020
Total Views |
Mohanji bhagwat_1 &n




सिंधमध्ये हिंदू असला पाहिजे; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन


मुंबई : फाळणीमुळे सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. परंतु, सिंध आपला आहे, ही भावना सिंधी समाजच नव्हे तर प्रत्येक भारतीयाने हिंदुने मनात बाळगली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीलाही सांगितली पाहिजे. सिंधला कधीही विसरता कामा नये, उलट सिंधमध्ये एक दिवस सिंधी हिंदू असलाच पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

राजपाल पुरी फाऊंडेशन आणि भारतीय सिंधू समाजाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोहित पुरी लिखित राष्ट्राय नम: या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अंधेरी येथील द लीला हॉटेलच्या सभागृहात करण्यात आला होता. पुस्तक प्रकाशनाच्या अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक होते. मंचावर यावेळी राजपाल पुरी यांच्या पत्नी तमला पुरी, पुत्र व पुस्तकाचे लेखक रोहित पुरी आणि ललित पुरी तथा भारतीय सिंधू समाजाचे अध्यक्ष लक्षमण रामचंदानी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरसंघचालकांनी वरील विचार मांडले.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, आपल्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या वा समाजाच्या पूर्वजांनी परिश्रम केले, कष्ट उपसले म्हणून भावी पिढीला चांगले दिवस येतात. आपल्या पूर्वजांनी केलेल्या परिश्रमाची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे. राष्ट्राय नम: या पुस्तकाच्या माध्यमातून तेच काम झाल्याचे दिसते. परंतु, हे पुस्तक म्हणजे केवळ राजपालजींनी केलेल्या कार्याची माहिती नव्हे तर प्रेरक म्हणून काम करेल. सदर पुस्तकाच्या वाचनाने इतरांचेही जीवन घडावे. फाळणीच्या काळात सिंध व नंतर संकटाच्या काळात भारतात राजपालजींनी केलेले कार्य मोठे पराक्रमी आहे. अर्थात हे काम केवळ देश व समाजाप्रतिच्या आपुलकीच्या आपलेपणाच्या भावनेनेच त्यांनी केले. हीच आपलेपणाची भावना इतरांतही रुजावी. ते काम हे पुस्तक करेल, असा विश्वास यावेळी डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला.

इस्रायलचे उदाहरण देत डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, आपल्या मातृभूमीप्रतिच्या श्रद्धा व निष्ठेने ज्यू समाजाने आपले राष्ट्र पुन्हा निर्माण केले. तब्बल १८०० वर्षे ज्यू समाजाने आपल्या मायभूमीत परतण्याची कांक्षा जागृत ठेवली आणि ते त्यांनी करुन दाखवले. फाळणीवेळी पाकिस्तानात गेलेला सिंध प्रातदेखील आपलाच आहे. परंतु, ही भावना भावी पिढीतही उतरली पाहिजे. त्याचे स्मरण ठेवले पाहिजे. आपले हरवलेले परत मिळवण्याची जिद्द मनी बाळगली पाहिजे. त्यासाठी आपलेपणाने परिश्रम केले पाहिजे. असे झाल्यास सिंधच्या एकत्रीकरणातून आपल्या पवित्र भारताला पुन्हा एकदा विश्वगुरुचे स्थान नक्कीच मिळेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, परिसस्पर्शाने लोखंडाचे जसे सोने होते, तसे राजपाल पुरी यांचे चरित्र व कार्य होते, असे सरसंघचालकांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, परिसाच्या स्पर्शाने केवळ लोखंडाचे सोने होते, परंतु, राजपालजींसारख्या परीसाच्या संपर्कात आलेल्याचे सोने नव्हे तर ती व्यक्ती स्वत:च परीस झाली. आताच्या पुस्तकातूनही तसेच होईल, असेही सरसंघचालकांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@