एकूण १५० गाड्या सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे सुरू : अर्थमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |


railway budget 2020_1&nbs


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प २०२० सादर होत असताना सर्वांचे लक्ष होते ते रेल्वेसाठी नवीन काय तरतुदी काण्यात येणार. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही प्रमाणात रेल्वासाठी चांगल्या योजण्या आखल्या आहेत. 'रेल्वेची मिळकत खूपच कमी आहे. त्यामुळे सौरऊर्जा तयार करण्यासाठी रेल्वेच्या जमिनीचा उपयोग होणार आहे,' अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, एकूण १५० गाड्या सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे सुरू होणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. 


त्याचप्रमाणे देशामध्ये तेजससारख्या आणखी गाड्या चालवल्या जातील. तेजसला रेल्वेच्या माध्यमातून पर्यटनस्थळांशी जोडले जाणार आहे. असेदेखील त्यांनी सांगितले. तसेच, ५५० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध आहेत. देशभरात मानव रहित रेल्वे क्रॉसिंग हटविण्यात आल्या आहेत. २७ हजार किलोमीटर ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे ट्रॅकच्या कडेला सौरऊर्जा ग्रीड बांधण्याचे नियोजन आहे. १४८ कि.मी. बंगळुरू उपनगरीय ट्रेनची व्यवस्था केली जाणार असून यासाठी एकूण १८ हजार ६०० कोटी रुपये खर्च केले जातील. ज्यामध्ये केंद्र सरकारकडून २५ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. तसेच देशातील ४ रेल्वे स्थानकांची पुनर्विकास होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@