सेंसेक्स वधारला : सकाळच्या घसरणी नंतर १११ अंकांची वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |

BSE mumbai_1  H
मुंबई : अर्थसंकल्प सादरीकरणामुळे शनिवारी सुद्धा शेअर बाजार चालू आहे. परंतु, शेअर बाजारात दिवसाची सुरुवात मात्र खराब झाली होती. यामध्ये सेंसेक्स २७९ अंकाने घसरला होता. परंतु, अर्थसंकलप सादर होत असताना १११ अंकांनी वाढून ४०,८३४ पर्यंत पोहोचला. शुक्रवारी सेंसेक्स ४०,७२३. ४९वर बंद झाला होता. निफ्टीमध्ये ८१. ८५ अंकांची घसरण झाली असून सध्या ३४. ८५ अंकांनी वाढून ११९९९.०५ अंकावर व्यवसाय करत आहे. शुक्रवारी निफ्टी ११,९६२.१० वर बंद झाले होते. अर्थसंकल्पातील घोषणांमुळे शेअर मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळतात. यापूर्वी २०१५ मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार होता. त्या दिवशी सुद्धा शेअर बाजार सुरू ठेवण्यात आला होता. सामान्य दिवसांमध्ये शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद असतो.
@@AUTHORINFO_V1@@