‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला मोठे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |

beti bacho beti padhao_1&


नवी दिल्ली
: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण  यांनी केंद्र सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी खास तरतूदी करण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेचे कौतुक केले. संबंधित योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे त्या म्हणाल्या. तसेच ३५ हजार ६०० कोटींची तरतूद केली आहे. महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावला असून बालविवाहाचे प्रमाण देखील घटल्याची माहिती त्यांनी दिली. याचसोबत त्यांनी मुलांपेक्षा मुलींमधील शिक्षणाचा सरासरी स्तर उंचावल्याचे सांगितले. सहा लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांकडे स्मार्टफोन्स पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.


अर्थसंकल्पात ही आहे महिलांसाठी खास तरतूद :

- महिलांच्या पोषणासाठी ३५ हजार ६०० कोटींची तरतूद
 
- २८ हजार ६०० कोटींचा खास महिलांसाठी निधी जाहीर
 
- मुलींच्या लग्नाचे वय निश्चित करण्यासाठी समितीचे गठन
 
- मुलीच्या लग्नाच्या वयाबरोबरच आता ‘आई होण्याची वयोमर्यादा’ ही ठरविण्यासाठी समिती गठीत
@@AUTHORINFO_V1@@