पर्यटन विकासासाठी २ हजार ५०० कोटींची तरतूद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |
tourism_1  H x


नवी दिल्ली : झारखंडमध्ये आदिवासी म्युझियम तयार करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामण यांनी जाहीर केले. सांस्कृतिक खात्यासाठी ३१५० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. पर्यटन विकासासाठी २ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे असे सीतारामण यांनी स्पष्ट केले. संस्कृती संवर्धनासाठी अभिमत विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार. देशातील ५ पुरातत्त्व केंद्रांचा विकास करणार, त्या पुरातत्व स्थळांमध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, तमिळनाडू राज्यातील पर्यटन स्थळांचा यात समावेश आहे.




ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष भर केंद्र सरकारकडून देण्यात येणार असून ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे पसवरणार असल्याचे निर्मला सीतारामण यांनी जाहीर केले. भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेट पोहोचविले जाणार. यासाठी ६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे निर्मला सीतारामण यांनी म्हंटले आहे. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भारतात तयार झाल्या पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्रांची निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी ११ वाजता २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे


@@AUTHORINFO_V1@@