शाहीन बाग येथे गोळीबार : हल्लेखोर अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |


shahin bag_1  H




नवी दिल्ली :
दिल्लीतील शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याविरुद्ध बेमुदत आंदोलन सुरू असतानाच आज पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. जिथे निदर्शने सुरू आहेत तिथून काही अंतरावरच आजची गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोराने तीन गोळ्या हवेत झाडल्या. हा इसम नोएडा भागातून आला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आज झालेल्या गोळीबारात सुदैवाने कुणी जखमी झालेले नाही.




दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी या घटनेबाबत माहिती दिली. संबंधित इसमाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ कारवाईचे पाऊल उचलत हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या, असे बिस्वाल यांनी सांगितले. हल्लेखोराचे नाव कपिल असे आहे व तो दिल्लीतील दल्लूपुरा भागातील राहणारा असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@