प्रताप सरनाईकांचे सिद्धिविनायकाला साकडे
मुंबई: सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
सरनाईक कुटुंबीयांवरील ‘ईडा’पिडा टळो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले की, “जगावरील कोरोनाचे संकट आणि सरनाईक कुटुंबावरील ईडापिडा टळो, यासाठी बाप्पाला गार्हाणे घातले.” ते पुढे म्हणाले की, “ ‘ईडी’ ज्यावेळेस चौकशीसाठी बोलवणार त्यावेळी मी चौकशीसाठी हजर होईन. मी त्यांना पत्र दिले आहे. ‘ईडी’कडे मी जेव्हा मुदत मागितली तेव्हा त्यांनी मला मुदत दिली.”
आ.प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक तसेच इतर सहकाऱ्यांना सुद्धा मागच्या काही दिवसात ईडी चौकशीसाठी हजर राहावे लागले होते. काहींना अटकही करण्यात आली होती. येत्या काळात तरी न्यायालयात सुनावणीसाठी सरनाईक उपस्थितीत राहणार का, हे येत्या काळात सपष्ट होईलच.