बघ्यांच्या गर्दीने घेतला गव्याचा जीव; सैरभैर पळाल्याने थकून गव्याचा मृत्यू ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |
indian gaur _1  


कोथरूडमधील घटना 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोथरुडमधील महात्मा वसाहतीत बुधवारी सकाळी रानगवा शिरल्याची घटना घडली. वन विभागाने सहा तासांच्या प्रयत्नानंतर बघ्यांच्या गर्दीचा सामना करत रानगव्याला पकडले. मात्र, उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला. बघ्यांच्या गर्दीमुळे बिथरलेला गवा सैरावैरा पळून थकल्याचे वन विभागाने नमूद केले. त्यामुळे वन्यजीव बचावादरम्यान होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा डोके वर काढून उभा राहिला आहे. 
 
 
 
 
गेल्या काही वर्षांपासून सह्याद्रीच्या दक्षिण भागात अधिवास करणाऱ्या रानगव्यांच्या पाऊलखुणा सह्याद्रीच्या उत्तरेपर्यंत आणि किनारपट्टीभागात विस्तारल्या आहेत. फणसाड, जुन्नर या भागातून प्रथमच गव्यांच्या नोंदी समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत बुधवारी पहाटे कोथरुडमधील महात्मा वसाहतीतील रहिवाशांना एका रानगव्याचे दर्शन झाले. हा गवा साधारण ८०० किलो वजनाचा नर होता. त्याची उंची ५.३० फूट आणि वय ४ वर्षांचे असावे. रानगवा दिसल्यावर रहिवाशांनी त्याची माहिती वन विभागाला कळवली. त्यानंतर ८ वाजता वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत बावधन येथील रेस्क्यू नामक वन्यजीव बचाव पथकाचे स्वयंसेवक आणि कात्रज प्राणिसंग्रहालयाचे पथक होते.
 
 
 
 
समाज माध्यम आणि वृत्तवाहिन्यांवरुन ही बातमी परल्यावर महात्मा वसाहतीत बघ्यांची गर्दी निर्माण झाली. या गर्दीमुळे गवा बिथरुन वसाहतीमधील रस्त्यावर सैरावैरा पळू लागला. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह वन्यजीव पथकातील स्वयंसेवकांना गव्या पकडण्यासाठी कसरत करावी लागली. पथकातील पशुवैद्यकांनी त्याला बैशुद्धीचे इंजिक्शन देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, गवा त्यालाही हुलाकावून देत पळून जात होतो. अखेरीस सहा तासांच्या शर्यतीनंतर गव्याला बेशुद्धीचे इंजिक्शन देऊन त्याला पकडले. मात्र, तोपर्यंत गवा थकला होता. त्याच्या नाकावर आणि शरीरावर जखमा झाला होत्या. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पु्ण्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली. सलग खूप वेळ पळाल्यामुळे तो थकल्याचे त्यांनी नमूद केले. 
 
 
 
 
थकल्यामुळे मृत्यू ? 
 
महाराष्ट्र वन विभागाने अधिकृतपणे प्रकाशित केलेल्या गवा-मानव संघर्ष टाळण्यासाठीच्या 'प्रमाणभूत प्रचलित कार्यपद्धती'नुसार (एसओपी) बघ्यांची गर्दी, आरडाओरड, पाठलाग यामुळे गवा बिथरतो. त्यांना दिशेचे ज्ञान होत नाही. गवा सैरभैर होतो आणि त्यातूनच गव्याकडून माणसावर हल्ला होण्याची शक्यता वाढते. गव्यांना जास्त अंतर सलगपणे धावत येत नाही. यातच दमल्याने किंवा घाबरून हद्यविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू होता. कोथरुडमधील प्रकरणातही बघ्यांच्या गर्दीमुळे गवा सैरभैर पळाल्याने तो थकला. थकव्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. 
 
 
 
गवा आला कुठून ? 
 
कोथरुडसारख्या दाट लोकवस्तीमध्ये गवा कुठूून आल्याची चर्चा होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर सह्याद्रीमधील हरितक्षेत्रात गव्यांचा वावर आढळून आला आहे. भीमाशंकर अभयारण्य, पानशेत या भागात गव्यांचा अधिवास आहे. त्यामुळे याच भागातून हा गवा भरकटलेल्या अवस्थेत कोथरुडमध्ये आल्याची शक्यता आहे. वीस वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पुण्यातील भारती विद्यापीठाच्या परिसरात गवा भरकटेल्या अवस्थेत आला होता. 
@@AUTHORINFO_V1@@