सजग नेतृत्व!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |
1 _1  H x W: 0


महामारीचे संकट ज्यावेळी अवघ्या देशावर ओढावले होते, त्याचवेळी ठाणे महापालिका क्षेत्रातही कोरोना हातपाय पसरत होता. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसमोर जाऊन सार्‍यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी ओळखत ठाणे महापालिकेचे नगरसेवक मनोहर जयसिंग डुंबरे यांनी मदतकार्याचा धडाका लावला. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या वाटपावर भर न देता, ते खरोखरी एक ‘कोविड योद्धे’ म्हणून कित्येकांच्या मदतीला धावून गेले. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा...

मनोहर जयसिंग डुंबरे
 
राजकीय पक्ष : भाजप
 
लोकप्रतिनिधी पद : नगरसेवक
 
प्रभाग क्र. : २, ठाणे
 
संपर्क क्र. : ९३२१२१५०६०
 
अचानक सुरू झालेल्या ‘लॉकडाऊन’ आणि कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देणे देशवासीयांसाठी नक्कीच अवघड होते. ठाण्यातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. दुसर्‍यांदा ठाणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून जाणारे मनोहर डुंबरे यांच्या कार्यक्षेत्रातील भाग हा संमिश्र वस्तीचा होता. एकीकडे हिरानंदानीतील उच्चभ्रू वसाहत, तर दुसरीकडे डोंगरीपाडा, कोलशेत आणि पातलीपाड्यातील मध्यमवर्गीय वस्ती, असे या प्रभागाचे स्वरूप.
 
 
‘लॉकडाऊन’ कडक होत असताना, डुंबरे यांनी गरजू नागरिकांची परिस्थिती लक्षात घेतली. अन्नछत्र मोहीम झपाट्याने सुरू केली. पातलीपाडा येथील गुरुद्वाराच्या सहकार्याने प्राथमिक आराखडा तयार केला. पहिल्या ‘लॉकडाऊन’मध्ये अन्नछत्र सुरू झाले. मनोहर डुंबरे यांनी सुरू केलेले हे ठाण्यातील पहिले अन्नछत्र. सर्वात प्रथम सुरू झालेले हे अन्नछत्र सर्वाधिक तीन महिने चालविण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले.
दुकानदार ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करतात का? गर्दी टाळण्यासाठी काय खबरदारी घेतली जाते, याची स्वतः जागोजागी फिरून त्यांनी पाहणी केली. सोसायट्यांमध्ये जाऊन जंतुनाशक फवारणी त्यांनी करवून घेतली होती. २४ तास संपर्क ठेवणारी टिम उभी केली होती. त्याद्वारे नागरिकांच्या सर्वप्रकारच्या तक्रारी सोडवण्याची यंत्रणा कार्यान्वित केली.
 
घरपोच अन्नसेवा, वृद्ध नागरिकांना औषधोपचार पोहोचवण्यास या पथकाचा हातभार लागला. निर्बंध, बंद वाहतूक व्यवस्था यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना दिलासा मिळाला. ‘लॉकडाऊन’च्या नियमांची तंतोतंत अंमलबजावणी केल्यानंतर शिस्तबद्धता कामाला आली. वॉर्ड क्रमांक-२ मध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
 
 
मनोहर डुंबरे यांना साथ लाभली ती भावना डुंबरे यांच्या ‘अर्पण फाऊंडेशन’ची. या संस्थेच्या माध्यमातून अन्य महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली. भावना आणि त्यांच्या पथकाने धडाडीने काम करत सेवा दिली.
 
प्रभाग क्रमांक-२ मध्ये मदतकार्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला. घरपोच अन्न पॅकेट पुरविण्यासाठी पाच स्वयंसेवकांचे पथक, प्रत्येक सोसायटीत पदाधिकार्‍यांशी फोनवरून व्यक्तिगत संपर्क, सोसायटीतील अडचणींवर तोडगा, दवाखाने बंद असल्याने ठिकठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे, प्रभागातील झोपडपट्ट्यांमधील २० हजारांहून अधिक नागरिकांची ‘अ‍ॅन्टिजेन टेस्ट, संशयित रुग्णांसाठी फिव्हर क्लिनिक, ‘अर्पण फाऊंडेशन’च्या माध्यमातून प्रभागातील कोरोनाबाधित इमारतींची व प्रतिबंधात्मक भागाची माहिती आदी वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. ४५ हजारांहून अधिक कुटुंबीयांपर्यंत इतर मदत पोहोचवली. तसेच दहा हजार ‘आर्सेनिक अल्बम’ गोळ्यांचे वाटपही केले.
 
 

1 _2  H x W: 0  
 

“कोरोना महामारीच्या या भीषण संकटात, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक लागली. या काळात माझ्याबरोबरच असंख्य भाजप कार्यकर्ते, ‘अर्पण फाऊंडेशन’चे कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक २ मधील हितचिंतकांनी २४ तास कार्यरत राहून प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. यापुढील काळातही आम्ही याच ऊर्जेने, जिद्दीने जनतेच्या सेवेसाठी नक्कीच कार्यरत असू.”
 
 
 
इतर ठिकाणी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा कुटुंबात आलेल्या प्रत्येकाला आलेले कटू अनुभव आपल्या वॉर्डमध्ये येऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवला. ‘कोविड’ रुग्णाच्या कुटुंबांशी संपर्क ठेवत त्यांना आवश्यक मदत पोहोचवली. त्यांना ‘क्वारंटाईन’च्या नावाखाली वेगळे पडू देता कामा नये, यासाठी प्रयत्न केला. या काळात आणखी एक हलगर्जीपणा महापालिका प्रशासनातर्फे केला जात होता. कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांच्या घराबाहेरील कचरा उचलण्यासाठी यंत्रणा नसल्याने कचर्‍याचे ढीग तसेच पडून होते. नगरसेवक डुंबरे यांनी या प्रकाराचा पाठपुरावा करत याचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
 
महामारी संकट काळात सार्‍यांनी एकत्र राहून लढा द्यायला हवा, हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला. राज्य सरकार व महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांची लूट केली जात होती. एका पोलिसाच्या पत्नीचे रुग्णालयात झालेल्या हालाकडे डुंबरे यांनी राज्य सरकारसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.
पातलीपाडा भागातील खासगी रुग्णालयात मुंबई पोलीस दलातील हवालदाराच्या पत्नीवर कोरोनावर उपचार केले जात होते. मात्र, त्या खासगी रुग्णालयाने अवघ्या चार दिवसांतच ८० हजार रुपयांचे बिल पाठवले होते. बिल न भरल्यामुळे त्या पोलीस पत्नीला बेडवरून उतरवून पायर्‍यांवर बसविण्यात आले. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच तातडीने डुंबरे यांनी रुग्णालय गाठले, तसेच या भगिनीची व्यथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. फडणवीस यांनी तत्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना यासंदर्भात दखल घेण्याची विनंती केली.
 
 
त्यानंतर मुंबई पोलीस दलाच्या मदतनिधीतून कोरोनाबाधित हवालदार व हवालदारांच्या कुटुंबीयांनाही तत्काळ एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली. प्रभागातील पोलीस पत्नीची व्यथा मांडल्यामुळे हवालदारांसह शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला. या घटनेनंतर अनेक हवालदारांचे दूरध्वनी आले. त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. “केवळ पीएसआयपर्यंतच्या अधिकार्‍यांना मिळणारी ही मदत हवालदारानांही मिळण्यासाठी माझे साहाय्य झाल्याने मला खूप समाधान वाटते,” असे मत डुंबरे यांनी व्यक्त केले. रुग्णालयातील अवास्तव बिले, महात्मा फुले आरोग्य योजनेत रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क, ‘क्वारंटाईन केंद्रा’त नागरिकांना देण्यात येणारा अन्नाचा दर्जा, घोडबंदर रोडवरील प्रवाशांसाठी एसटी सेवा आदींकडे लक्ष वेधत जनतेचे गार्‍हाणे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
शहरातील सोसायट्यांच्या क्लब हाऊसमध्ये कोरोना केंद्र सुरू करण्याचा तुघलकी निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्याविरोधात पहिल्याच दिवशी मनोहर डुंबरेंनी एल्गार केला. अखेर दुसर्‍याच दिवशी प्रशासनाने नमते घेऊन हा निर्णय मागे घेतला. मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे बाळकूम येथील ‘कोविड रुग्णालय’ सुरू करण्यास महापालिकेच्या होणार्‍या दिरंगाईकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर तातडीने रुग्णालयाचे लोकार्पण झाले.
 
कोरोनाविरोधात लढाई सुरू असतानाच, महावितरणने अन्यायकारक पद्धतीने वीजबिलांची दरवाढ लादली. त्याविरोधात मनोहर डुंबरे यांनी महाराष्ट्रात पहिले वीजबिल दरवाढविरोधी आंदोलन केले. यानंतर महावितरणने चुकीची बिले दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला. मनोहर डुंबरेंच्या आंदोलनानंतर पातलीपाडा येथे निश्चित झालेला हा महावितरणचा फॉर्म्युला राज्यभरात राबविला गेला.
 
मनोहर डुंबरे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी ठाणे शहराच्या केलेल्या दौर्‍यातही सहभागी होते. विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत, कोरोना रुग्णांना सुविधा मिळवून दिल्या. कोरोना आपत्तीच्या काळात भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांचे सहकार्य व मार्गदर्शनात नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मदतीचे शिवधनुष्य लीलया पेलले.
 
 




@@AUTHORINFO_V1@@