कोरोना काळातील ‘विश्वदीप’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

vishwadeep pawar_1 &



‘कोविड’ काळात अनेक गरजूंना अन्नधान्य आणि जेवण पुरविण्याचे काम भाजपच ‘फ’ प्रभागाचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक विश्वदीप सुभाष पवार यांनी केले आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. हे दान करताना पवार यांनी कोणताही फोटो काढला नाही. अन्नदान केल्यावर ते कोणाला सांगूही नये, अशीच पवार यांची धारणा आहे. प्रसिद्धीपासून लांब असलेला हा ‘कोविड योद्धा’ त्यांच्या या गुणांमुळेच इतरांपेक्षा वेगळा ठरतो.


विश्वदीप सुभाष पवार
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष
प्रभाग क्र. : शिवमार्केट-६९
लोकप्रतिनिधी पद : माजी नगरसेवक आणि ‘फ’ प्रभाग
समिती सभापती, माजी शिक्षण सभापती
संपर्क क्र. : ९३७२१९४७००


विश्वदीप पवार यांनी मध्यमवर्गीय असलेल्या; पण ‘कोविड’ काळात आपला व्यवसाय गमविलेल्या व्यक्तींना महिनाभर पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून दिला होता. हा मध्यमवर्गीय माणूस असल्याने त्याला फोटो काढून अन्नधान्य देणार असाल तर त्यापेक्षा नकोच, अशी त्यांची भावना होती. पण, पवार यांनी केवळ दान करण्याचे काम केले. अन्नधान्य वाटताना कुठेही कोणीही फोटो काढणार नाही, हे लक्षात आल्यावर प्रभागातील नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सोसायट्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटे-दुकटे राहतात. त्यांच्यासाठी जेवण बनविणारी किंवा घरकाम करणारी महिला ‘कोविड’काळात घरी येत नव्हती. या ज्येष्ठांना व गरजूंना डबा लावून देण्याचे काम विश्वदीप पवार यांनी केले. यामुळे काहींना रोजगार मिळाला. त्या जेवणाच्या डब्याचे पैसे पवार यांनीच दिले.



यातूनच ‘रोटी बँक’ ही संकल्पना पुढे आली. प्रभागात अनेक नागरिक असे होते की, त्यांना समाजासाठी काही तरी करायचे होते. पण, त्यांना आर्थिक मदत करता येत नव्हती. अशा नागरिकांना एकत्र करून ‘रोटी बँक’ ही संकल्पना सुरू केली. या उपक्रमात प्रत्येकांना दोन पोळ्या द्यायच्या होत्या. सुरुवातीला घरात पोळ्या करताना दोन अधिक पोळ्या करून समाजासाठी देणार्‍या नागरिकांनी नंतर चार किंवा पाच पोळ्या देण्यास सुरुवात केली. एकाचे दोन आणि दोनचे चार म्हणत, अनेक हात या उपक्रमासाठी पुढे आले. डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील जैन मंदिरात समाजातर्फे भोजन कक्षात जेवणाचे पॅकेट्स तयार केले जात होते. रोटी बँकेतून आलेल्या पोळ्या त्या पॅकेट्समध्ये भरून गरजू नागरिकांना देण्यात येऊ लागल्या. यामध्ये भात, डाळ, भाजी आणि पोळ्या यांचा समावेश होता. त्यात या ठिकाणी दररोज दीड हजार नागरिक जेवत असत. जून महिन्यापर्यंत हा उपक्रम सुरू होता. पवार यांनी वैयक्तिकरीत्या ही अनेक गरजूंपर्यंत अन्नधान्य पुरविण्याचे काम केले आहे. विश्वदीप पवार यांनी ‘भाजी आपल्या दारी’ हा उपक्रमही राबविला. या उपक्रमात शेतातील भाजी थेट ग्राहकांच्या दारात येऊ लागली. या भाजीला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली. त्यामुळे पवार यांनी अधिक शेतकर्‍यांकडून भाजी मागविण्यास सुरुवात केली. ग्राहकांनाही दोन दिवस आधी ऑर्डर देण्याचे आवाहन केले. ४०० हून अधिक सोसायट्यांमध्ये त्यांनी हा उपक्रम राबविला. नागरिकांना धान्य, भाजीपाला, औषधे, जीवनावश्यक वस्तू यांची मोफत घरपोच व्यवस्था पवार व त्यांच्या पत्नी श्रद्धा पवार यांनी केली. पवार दाम्पत्यांनी केलेल्या नियोजनाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.



कोरोना विषाणूविरोधात लढा देता यावा, यासाठी शिवमार्केट प्रभागातील नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडे जितके जमतील तितके पैसे पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी द्यावे असे, आवाहनही विश्वदीप पवार यांनी केले होते. या माध्यमातून जवळपास एक लाख ९० हजार १३५ रुपयांचा निधी त्यांनी जमा करून ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’ला सुपूर्द केला. इतकेच नव्हे, तर वैयक्तिकरीत्या ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’लादेखील त्यांनी मदत केली आहे. विश्वदीप पवार यांनी शिवमार्केट प्रभागात निर्जंतुकीकरण करून घेतले. याशिवाय ज्या सोसायटीत कोरोना रुग्ण आढळून येत होते, त्या सोसायटीत सॅनिटायझर करण्यात आले. ज्या नागरिकांना आपल्या घरात निर्जंतुकीकरण करायचे असेल त्यांनाही हर्बल सॅनिटायझरची व्यवस्था करून देण्यात आली. ‘कोविड’चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रथम पवार यांनी स्वत: सोसायटी निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली होती. पवार यांच्या प्रभागात आठवड्यातून दोनदा निर्जंतुकीकरण केले जाते. नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, यासाठी सोशल मीडियावरून जनजागृती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी थाळी व घंटानाद करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये पवार आपल्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. विश्वदीप पवार हे केवळ मत मागण्यासाठी नागरिकांकडे जात नसून दरवर्षी गणेशोत्सवात गणेशाचे दर्शन घ्यायलाही जातात.


पक्षाच्या कार्यात आमचा खारीचा वाटा असणार आहे. आमचे समाजकार्य सदैव सुरू राहणार आहे. नागरिकांना मदत करताना फोटो काढले नाही, त्यामुळे त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. ‘खरी तळमळ असणारा माणूस’ अशी दाद दिली. हा खरा भावनिक क्षण होता. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्याला जमेल तशी इतरांना मदत केली पाहिजे.


यंदा कोरोना असतानाही त्यांनी ६०० नागरिकांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. नागरिकांसोबत सेल्फी काढून या क्षणांच्या आठवणीही त्यांनी जपल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सीए दीपक गुप्ता, काजल काथारानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कोरोना विरोधात लढण्यासाठी दोन हजार नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. मास्कबरोबरच नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी प्रतिकारशक्तिवर्धक असलेले ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांचे संपूर्ण प्रभागात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनुसार वाटप केले. परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र मिळावे यासाठी शिबीर लावले होते. या शिबिरातून दहा हजार नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यात आले. पवार यांनी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ५० टक्के दरात नागरिकांच्या टाक्या साफ करून देण्याचा उपक्रम राबविला.

कोरोना रुग्णांचा आकडा मे महिन्यात वाढू लागला होता. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करीत राज्यात विविध ठिकाणी कार्यालयाच्या आणि घराच्या अंगणात काळ्या फिती लावून भाजपने आंदोलन केले. या आंदोलनात विश्वदीप पवार व त्यांच्या पत्नी श्रद्धा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी काळ्या फिती लावून महाविकास आघाडीचा निषेध नोंदविणारे फलक हाती घेऊन ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला होता. विश्वदीप पवार यांना त्यांच्या पत्नी श्रद्धा यांच्यासह कुटुंबीयांची मोलाची साथ मिळाली. ते सातत्याने नागरिकांमध्ये वावरत असत. गरजूंना मदत करण्यासाठी जात असत, त्यामुळे स्वत:ची ते सातत्याने अ‍ॅन्टिजेन चाचणी करून घेत होते. आतापर्यंत त्यांनी २५ वेळा स्वत:ची चाचणी करून घेतली आहे. कोविडपासून दूर राहण्यासाठी व्हिटामीन ‘सी’च्या गोळ्या, काढा अशी सर्व प्रकारची काळजी ते घेतात. पवार यांच्यामध्ये ‘आधी करावे, मग सांगावे’ ही वृत्ती दिसून येते. त्यामुळेच त्यांनी केवळ रक्तदान करा, असे समाजाला आवाहन न करता, स्वत:ही दोन वेळा रक्तदान केले. विश्वदीप पवार यांना पारसमणी देरासक, राखी देरासक, राजस्थान संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप युवा मोर्चा यांनी साथ दिली. कोणतेही उल्लेखनीय कार्य करताना वरिष्ठ पातळीवरील मार्गदर्शन आणि सहकार्य आवश्यक असते.



विश्वदीप पवार यांना माजी राज्यमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला अध्यक्ष पूर्व मंडल पूनम पाटील, नंदू जोशी, संजय कुलकर्णी, साऊथ इंडियन सेलचे मोहन नायर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. पवार यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही दिवसरात्र गरजूंच्या मदतीसाठी झटत होते. त्यामध्ये माधुरी भिडे, अनघा पवार, धरती गडा, अश्विनी गायकर, सायली सावंत, सीमा नवघरे, उषा गेलानी, अस्मिता ताते, अपर्णा सुरंजे, वंदना गोडबोले, अश्विनी खंडागळे, पोतनीस काकू, गोविंद रानडे, सुजाता रानडे, अशोक हळदिवे, प्रदीप नवघरे, विष्णुदास मालिया, प्रशांत पाटील, महेंद्र देशपांडे, संतोष मिस्त्री, चिराग केथिया, हिमांशू जैन, चारुदत्त गोखले, क्रिश लांडगे, प्रकाश पवार, प्रीतेश छेडा, राजेश देवरूखकर, स्वप्निल खरे, अश्विन शेट्टी, सुनील वांद्रे, हर्षल ठाकरे, सिद्धेश लखाणी, दक्ष लोधिया, सिद्धेश नेताळकर, उत्तमभाई शहा, यश वझे, अविनाश मंजुमदार, अक्षय पवार यांचा समावेश होता. विश्वदीप पवार यांना या कामात कडोंमपाकडून चांगले सहकार्य मिळाले. त्यांच्या सहकार्याने त्यांनी प्रभागात अ‍ॅण्टिजेन चाचणी आणि ‘माझे घर, माझी जबाबदारी’ हे उपक्रम यशस्वी केले.

- जान्हवी मोर्ये 
@@AUTHORINFO_V1@@