संकटात सेवेची संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

sanjay pande_1  
 


‘कोरोना’ या जागतिक महामारीच्या संकटाने उच्च-नीच भेद गळून पडले. सारे एका पातळीत आले. पण, या संकटात सापडलेल्यांना संजय पांडे यांनी मदतीचा हात दिला. कुठलाही भेदाभेद न बाळगता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिकवणुकीनुसार रंजल्या-गांजल्यांची सेवा संजय पांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याचा मोबदला म्हणजे जनतेने दिलेले अनेकानेक आशीर्वाद आणि प्रेम. तेव्हा, त्यांच्या या मदतकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

संजय पांडे
राजकीय पक्ष : भाजप
पद : अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा
कार्यक्षेत्र : वर्सोवा, अंधेरी
संपर्क क्र. : ९८९२२८९२५६

कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईसह देशभरात सुरू झाला तेव्हा तो एवढे भयानक रूप धारण करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अदृश्य असलेल्या कोरोना विषाणूने सर्वांना घरात बसवून एका पातळीत आणून ठेवले. या संकटसमयी संजय पांडे यांनी विविध स्तरावर मदत अभियान राबविले.


अन्नछत्रातर्फे दररोज ५०० लोकांना जेवण


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला, त्या अंतर्गत देशभर संचारबंदी लागू करण्यात आली. या परिस्थितीत एका समस्येने पांडे यांचे लक्ष वेधले ती म्हणजे ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांची होणारी उपासमार. कंपनी कामगारांना अर्धामुर्दा पगार मिळत होता. पण, हातावर पोट असणार्‍या रोजंदारी कामगारांचे काय? राज्यात सर्वच बंद असल्याने त्यांचा रोजगार बंद झाला होता. त्यामुळे आता खायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. अशा विवंचनेत सापडलेल्या कुटुंबांना आधार मिळाला तो पांडे यांनी सुरू केलेल्या ‘कम्युनिटी किचन’ म्हणजेच अन्नछत्राचा. या अन्नछत्राचा लाभ सलग एक महिना ५०० लोक घेत होते व त्यासाठी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते अतोनात मेहनत घेत होते. येणार्‍या कोणालाही उपाशीपोटी परत पाठवत नव्हते.
 
दररोज दोन हजार लोकांना अन्नपाकिटे

याव्यतिरिक्त अजूनही काही लोक ‘संचारबंदी’ तसेच अन्य कारणांमुळे अन्नछत्रापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यामध्ये एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, अन्नछत्राच्या स्थळापासून दूर असलेले बेघर लोक, ‘लॉकडाऊन’मुळे अडकलेले परप्रांतीय मजूर, तसेच कोरोनाच्या लढ्यात अग्रणी असलेले बंदोबस्तावरील पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, तसेच अनेक लोकांचा समावेश होता. त्यांच्यासाठी ‘कम्युनिटी किचन’मध्ये तयार केलेल्या अन्नाची पाकिटे तयार करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली. रोज दोन हजार याप्रमाणे सलग ३० दिवस ६० हजार इतक्या अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. कोणते दान श्रेष्ठ आहे ते आम्हाला माहीत नाही. पण, परिस्थितीनुसार त्या-त्या वेळी आवश्यक असलेल्या वस्तूचे दान करणे हेच श्रेष्ठ दान समजतो. त्यामुळे कोरोना काळात भुकेलेल्यांना अन्न पुरविणे हेच श्रेष्ठ दान समजतो.

गरजूंना धान्याचे किट


काही कुटुंबे अशीदेखील होती की, त्यांना अन्नपाकिटांची गरज नव्हती. त्यांना धान्याची गरज होती. घरी अन्न शिजवून ते सहकुटुंब जेवण करू इच्छित होते. मात्र, त्यांना धान्य आणि आवश्यक वस्तू मिळविण्यात अडचणी येत होत्या. अशा कुटुंबांकरिता अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू पुरविण्यात आल्या. तांदूळ, गहू, खाद्यतेल, मसाले, चहापावडर, साखर व इतर वस्तू यांचे एक किट बनविण्यात आले. वर्सोवामधील पाच हजार रिक्षाचालक व विभागातील इतर ७,५०० लोक अशा एकूण १२ हजार ५०० गरजू लोकांना त्यांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून कृतकृत्य झाल्याचे पांडे सांगतात.


१७ हजार लोकांना ‘आर्सेनिक’ गोळ्या


केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांच्या वापरातून रोगप्रतिकार क्षमतेमध्ये वाढ होत असल्याचे सिद्ध झाले. या पार्श्वभूमीवर जनतेला या महामारीशी सामना करता यावा, यासाठी मुंबईमधील वर्सोवा विभागात जवळपास १७ हजारांहून अधिक लोकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.


मुंबईबाहेरही मदत


कोरोनाची समस्या केवळ शहरापुरती मर्यादित नव्हती. महाराष्ट्रामधील अनेक भागात ही समस्या होती. त्यामुळे दुष्काळग्रस्त असलेल्या वर्धा जिल्ह्यामधील आर्वी तालुक्यात भाजप संलग्न नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाच हजार गरजूंना किराणा व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी गरजूंना २० हजार कापडी, तसेच संसर्गापासून बचावासाठी आवश्यक व मानवी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालय प्रमाणित ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधीच्या सात हजार बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

परराज्यातील मजुरांना सहकार्याचा हात


कोरोनाप्रतिबंधासाठी पुकारलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे सगळेच बेरोजगार झाले होते. मदतीवर किती दिवस अवलंबून राहायचे, हाताला काम नसल्याने खायचे काय, असा प्रश्न होता. त्यामुळे परराज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले अनेक मजूर स्वतःच्या राज्यात परत जाण्यासाठी धडपडत होते. त्या गरीब मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी भाजप उत्तर भारतीय मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून बसेसची व्यवस्था करण्यात आली. त्यांना रेल्वेने स्वतःच्या राज्यात जाता यावे यासाठी जे निकष लावण्यात आले होते, ते पूर्ण करून त्यांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा केला. इतकेच नव्हे तर त्यांना प्रवासादरम्यान पुरेल एवढ्या पाण्याच्या बाटल्या व अन्नाची पाकिटेही पुरविण्यात आली.


कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे प्रभावित जनतेला आम्ही सर्वोपरी मदतीचा हात दिला. या कोरोनाच्या संकटकाळात यापुढेही गरीब, गरजूंना, या ना त्या प्रकारे जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश करणार आहे.


‘पीपीई किट’चाही पुरवठा

कोरोनाप्रतिबंधाच्या लढ्यात अग्रणी असणार्‍या विभागातील ‘कोविड योद्ध्यां’ना संरक्षणासाठी ‘पीपीई किट’ हेच त्यांचे महत्त्वाचे अस्त्र असते. त्यामुळे मुंबई तसेच आर्वी तालुका मिळून ८५० हून अधिक ‘पीपीई किट’चे वाटप करण्यात आले.

‘आत्मनिर्भर’ कर्जसाहाय्य

‘लॉकडाऊन’ लागू झाल्यानंतर आर्थिक व्यवहार ठप्प झाले. सामान्य कुटुंबे आर्थिक संकटात सापडली. त्यांना या अडचणीच्या काळात मदत व्हावी म्हणून आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू महिलांसाठी ‘महिला आत्मनिर्भरता कर्ज साहाय्य योजना’ सुरू केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते तिचा शुभारंभ करण्यात आला. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणार्‍या कुटुंबातील महिलेला रुपये दहा हजार कर्ज द.सा.द.शे आठ टक्के व्याजाने १५ महिन्यांकरिता उपलब्ध केले गेले. विशेष बाब म्हणजे, यातील चार टक्के व्याजाचा भार भाजप संलग्न नानाजी देशमुख प्रतिष्ठानने उचलला. म्हणजेच, केवळ चार टक्के व्याजावर रुपये दहा हजार महिलेस उपलब्ध झाले. त्याचा परतावा तीन महिन्यानंतर सुरू होणार आहे. तसेच, मासिक हप्ता रुपये ८८८ म्हणजेच रोज ३० रुपये इतका राहील. अत्यल्प व्याजदरावर मिळणार्‍या या सवलतीच्या कर्जपुरवठ्यामुळे गरजू महिलांना घर सावरण्यास मदत होईल. तसेच आर्थिक व्यवहार सुरू झाल्यानंतर छोट्या व्यवसायासाठीही मदत होईल, हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेचा लाभ आजपर्यंत १,३०० हून अधिक महिलांनी घेतला असून आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबातील किमान पाच हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळावा हे लक्ष्य असल्याचे पांडे सांगतात.


आदिवासी विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन


कोरोनामुळे मुलांचे शिक्षण बंद आहे. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा फॉर्म्युला शोधला आहे. मध्यम परिस्थितीतले लोक पोटाला चिमटा घेऊन स्मार्ट फोन घेऊ शकतात. पण, दोन वेळचे जेवण कसेतरी मिळवणारे स्मार्ट फोन कसे घेणार? स्मार्ट फोनअभावी मुंबईमधील आरे कॉलनीमधील खांबाचा पाडा इथले काही आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला मुकणार होते. ही गंभीर बाब लक्षात येताच सामाजिक भान जपत रविवार, ३० ऑगस्ट रोजी खांबाचा पाडा इथल्या २५ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करत भाजप उत्तर भारतीय मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे २५ स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले. तसेच मुंबईमधील आरे कॉलनीमधील खंबाचा पाडा इथे राहणार्‍या आदिवासी मुलांची अशीच दैन्यावस्था होती. अशा मुलांना मदतीचा हात देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे भाजपचे लक्ष्य असल्याचे पांडे म्हणाले.


- अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@