एक हात मदतीचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

more_1  H x W:



कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने कुणी गावाकडची पायवाट धरली, तर कुणी बंद दाराआड उपासमारीची वेदना सहन केली. या सगळ्याच गरजूंना कल्याण पूर्व भाजप मंडल अध्यक्ष व कडोंमपा परिवहन सदस्य संजय मोरे यांनी मदतीचा हात दिला. आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांची गरज ओळखून त्यानुसार त्यांना मदत केली. पोलीसमित्रांचीही त्यांनी काळजी घेतली. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख.


संजय बाबूराव मोरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजप मंडप अध्यक्ष, कल्याण (पूर्व)
कडोंमपा परिवहन सदस्य
प्रभाग क्र. : कल्याण पूर्व विभाग
संपर्क क्र. : ९८२१०५३९११

कोरोनाविरोधात लढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता पाच हजार पत्रकांची छपाई केली. या पत्रकांमधून त्यांनी मास्कचा आणि ही पत्रके घरोघरी जाऊन त्यांचे वाटप केले. पोलीस स्थानकातून जनजागृतीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार १५ ते २० दिवस संपूर्ण प्रभागातून दोन रिक्षा फिरविल्या होत्या. प्रभागात चार हजार लोकांना सॅनिटायझरचे वाटप केले. सॅनिटायझरसोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, याकरिता ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक गोळ्यांचे साडेसात हजार नागरिकांना वाटप केले. जवळपास १५० सोसायट्यांना सॅनिटायझर स्टॅण्डचे वाटप केले. नागरिकांना मदत करताना केवळ प्रभागाचा विचार न करता, मंडल अध्यक्ष या नात्याने प्रत्येक गरजूपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तीन हजार गरजू लोकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. भाजप युवा मोर्चाच्या मदतीने माणगाव येथील आश्रमाला वादळाचा तडाखा बसला, त्यावेळी मदत केली. त्यामध्ये प्रत्येकी २०० चादर, टॉवेल, ब्लँकेट दिले. ‘लॉकडाऊन’मध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच बाजारात गर्दी करीत असल्याने गर्दी टाळण्याकरिता ‘भाजीपाला आपल्या दारात’ हा उपक्रम राबविला. नागरिकांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांकडे भाजीची यादी देण्यास सांगितले होते. स्वस्त दरात ताजी भाजी उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. १४ हजार ५०० लोकांना भाज्यांचे वाटप केले.


‘कोविड’ची लक्षणे दिसून आली नाही, तरी अनेकांच्या चाचणी या सकारात्मक येत होत्या. ‘कोविड रुग्ण’ लवकर डिटेक्ट व्हावेत, याकरिता अ‍ॅन्टिजेन चाचणी शिबीर तीन दिवस घेतले. त्यात कल्याण पूर्वेतील विभागात दोन ते अडीच हजार लोकांची चाचणी केली. या कामात कडोंमपा, ‘जाणीव प्रतिष्ठान’चे प्रथमेश सावंत आणि मोरे यांच्या ‘कोकण प्रतिष्ठान’चे सहकार्य मिळाले. आपला परिसर आजारमुक्त व्हावा, यासाठी प्रत्येक सोसायटीत धूरफवारणी, औषधफवारणी केली. हे काम अजूनही सुरू आहे. आजही एखाद्या सोसायटीत ‘कोविड रुग्ण’ आढळल्यास त्यांच्या सोसायटीत सॅनिटायझेशन केले जाते. त्यासाठी दोन जंतुनाशक मशीनची खरेदी केली. तीन महिने, दोन हजार गरजू नागरिकांना जेवणाचे वाटप केले. यामध्ये बहुतांशी मजूर, कामगार, हातावर पोट असणार्‍यांचा समावेश होता. नांदिवली येथील गावात २३ विद्यार्थी अडकले होते. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय होत नव्हती. त्यांनी ट्विट केले होते ते पाहून त्यांना सिलिंडर, अन्नधान्यवाटप केले. काही रक्कमही इतर सामान आणायला दिली. परगावी जाणार्‍या साडेतीन ते चार हजार नागरिकांना तिकीट उपलब्ध करून दिले. मास्कसह चहा-नाश्ता, बिस्कीट, पाणी यांची सोय केली होती. परगावी पायी जाणार्‍या १५ ते २० जणांना पादत्राणे दिली. पोलीसमित्र आपले कर्तव्य बजावत होते. या पोलिसांना थंड लिंबू सरबत देण्याचे काम मोरे यांनी केले. तृतीयपंथीयांच्याही पोटापाण्याचा प्रश्न या काळात निर्माण झाला होता, अशा २०० जणांना अन्नधान्याचे वाटप केले. आमदार गणपत गायकवाड यांच्यातर्फे ग्रामीण पट्ट्यात तयार जेवणाचे वाटप केले जात होते. जेवणवाटप करताना गर्दी होऊ नये, याकरिता कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. गायकवाड यांनी हळद, मीठ, तिखट आणि अन्नधान्यवाटप ग्रामीण भागात केले. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत केली.


more_1  H x W:


सर्व सामाजिक संस्थांनी आपल्याकडे उपलब्ध संसाधनांनुसार गरजूंना मदत केली पाहिजे. सक्षमपणे उभे राहा, कोणत्याही संकटांचा सामना करण्याची आपली तयारी आहे. त्यातूनच सशक्त भारत आपण घडवू शकतो.


कल्याण-डोंबिवलीत ‘कोविड’ रुग्ण आढळल्यास त्यांना रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध होत नव्हत्या. अनेकांची आर्थिक लूट केली जात होती. यावर मात करण्यासाठी दोन रुग्णवाहिका ताब्यात घेऊन रुग्णांना रुग्णालयापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. महापालिकेने नंतर सर्व रुग्णवाहिका ताब्यात घेतल्या. ३० ते ४० रुग्णांची बिले कमी करून दिली. त्या रुग्णालयांवर कारवाई करण्यास सांगितले.मोरे यांच्या पत्नी स्नेहल यांनी त्यांना या कामात मोठी मदत केली. कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय हे काम करणे कठीण होते. लोकांचा जीव वाचविण्यासाठी अतोनात काम करीत होते, त्यामुळे घरातून पाठिंबा होता. लोकांमध्ये फिरून एकाही कार्यकर्त्याला ‘कोविड’ची लागण झाली नाही. औषधोपचार घेत होते. प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घेतली होती, असे मोरे सांगतात.
‘कोविड’ रुग्णांच्या मृतदेहाला अंत्यसंस्कार करण्यासाठी एकच माणूस असायचा. त्या रुग्णांना अग्नी देतानाही मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे. खुद्द मोरे यांनीदेखील दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. मोरे यांनी, ‘कोविड’ निर्मूलनासाठी किमान ३० लाख रुपये खर्च केले आहेत. हा सर्व खर्च त्यांनी स्वच्छेने केला होता. भाजीपाला वाटप करताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कागदी पिशव्यांच्या वापरावर त्यांनी भर दिला. पर्यावरणाचेही रक्षण या काळात त्यांनी केले आहे. पावसाळ्याच्या दिवसात ‘कोविड’ चाचणी सकारात्मक येईल, अशी भीती नागरिकांमध्ये होती. नागरिकांनी तपासणी करावी यासाठी जनजागृती केली. दीड महिना अ‍ॅन्टिजेन चाचणीसाठी नागरिकांना बाहेर काढण्यात गेला. मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते सक्षम होते, त्यामुळे ‘कोविड’काळात आलेल्या अडचणींवर त्यांनी मात केली.


सुरुवातीच्या काळात कडोंमपाचे सहकार्य नव्हते. हळूहळू महापालिकेचेही सहकार्य मिळाले. कडोंमपा आयुक्तांच्या ‘मुंबईच्या कर्मचार्‍यांनी कल्याण-डोंबिवलीत येऊ नये,’ या निर्णयाचे स्वागत केले होते. या सगळ्या कामात माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चांगली मदत केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सगळे काम सुरू होते. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आमदार गणपत गायकवाड आणि पदाधिकार्‍यांनी मदत केली. तसेच कार्यकर्त्यांचीही मोलाची साथ लाभली. त्यात सुभाष म्हस्के, अमोल साळुंखे, संतोष मोरे, अजय कदम, सचिन कुरणे, मनीष पाटील, रूपेश साळुंखे, अजय गायकवाड, सुरज कुरणे, अजित यादव, सौरभ सिंग, विवेक त्रिवेदी, शुभम साळवी, राजेश कोंजे, आदिनाथ सलते, इस्साकी कोनार, दीपक कोंजे, छगन शिंदे, भैरव वाघमारे, मधुकर पालांडे, अविनाश शिरकर, गुडू खान, रोहित पाणिग्रही, मंगेश पवार, प्रथमेश शिंदे यांचा समावेश होता. महापालिकेतील सफाई कर्मचार्‍यांच्या मुलांना वह्यावाटप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगासाठी व्हीलचेअर, अशा विविध वस्तू घेतल्या आहेत. मोरे यांनी, समाजातील गरजूंसाठी मदतीचा एक हात दिला, त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी जनजागृती करताना ऐकून घेतले हेच खूप आहे. अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले.


- जान्हवी मोर्ये
@@AUTHORINFO_V1@@