‘त्याने’ धरली मायेची सावली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

adak_1  H x W:
कोरोनाच्या सातत्याने कानावर येणार्‍या बातम्या ऐकून अनेकांचे धैर्य खचले. त्यातही आपल्या घरात कोरोना रूग्ण आढळल्यास कुटुंबीयांना मानसिक आधाराची गरज भासते. कोरोनाच्या काळात आपलीच माणसे एकमेकांपासून दुरावली. या परिस्थितीत कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मायेची सावली धरण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे ठाणे ग्रामीणचे माजी महासचिव व भाजपचे अंबरनाथमधील नेते संजय आदक यांनी केले आहे.


संजय संतोष आदक
राजकीय पक्ष : भाजप
पद : मा. महासचिव कल्याण जिल्हा भाजप
प्रभाग क्र. : ४७,साई विभाग, अंबरनाथ पूर्व
संपर्क क्र. :९६८९९४९०००
अंबरनाथमध्ये मेपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर करताच अंबरनाथमधील साई विभाग प्रभाग क्र. ४७ मधील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने एक डॉक्टरांची टीम तयार केली. ही टीम आदक यांच्या पत्नी माजी सभापती व नगरसेविका अनिता आदक यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली. या डॉक्टरांच्या टीममध्ये नील जेटाले, प्रकाश कौराणी, जफ्फर शेख, राहुल चौधरी यांचा सहभाग होता. नागरिकांना २४ तासांत कोणतीही आरोग्यविषयक अडचण असल्यास ते या डॉक्टरांशी संपर्क करू शकत होते. नागरिक ‘लॉकडाऊन’मुळे बाहेर जात नव्हते, त्यांना रात्री काहीही झाले तरी डॉक्टर उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती व घराबाहेर पडू शकत नाही, अशासाठी एक स्वयंसेवकांची टीम तयार केली. या टीमकडून ज्येष्ठ नागरिकांना लागणार्‍या सर्व वस्तू दुकानांतून आणून दिल्या जात होत्या. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोरोना काळात घरातच राहणे शक्य झाले.
पंकज जावडेकर, परेश पाठारे, सचिन पिंगळे, मितुल घोषर, संतोष देशपांडे, वैभव जोशी, जगदीश दुबे या स्वयंसेवकांनी ज्येष्ठांना मदत केली. ‘सेवा समन्वयक’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून प्रभागातील सर्व नागरिकांपर्यंत संपर्क क्रमांक पाठविला होता. आदक हे ब्रॉडकास्ट व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एक हजार लोकांच्या संपर्कात राहत होते. नरेश वाधवानी यांच्या माध्यमातून अल्पदरात रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून दिली. स्वयंसेवकांच्या माध्यमातून मेडिकल, भाजीपाला, किराणा माल घरपोच सेवा पुरविण्याचे काम केले. घरपोच सेवा नागरिकांना मोफत मिळत होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर जीवनावश्यक वस्तूंसाठी जाण्याची गरज भासत नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले होते. सरकारचा उद्देशही या घरपोच सेवेमुळे साध्य झाला.
कोरोना काळात मजूर, गरीब, कामगार, घरकाम करणार्‍या महिला, रिक्षाचालक, केशकर्तनालयचालक, रोजंदारीवर काम करणार्‍यांना सर्वाधिक फटका बसला होता. जैन मंदिराच्या माध्यमातून सुरुवातीला सेवावस्तीमध्ये मोफत अन्नधान्य वाटप केले होते. आदक यांनी वितरण व्यवस्थेसाठी सहकार्य केले. त्यात दररोज ५०० ते ६०० लोकांना अन्नधान्य दिले जात होते. ‘लॉकडाऊन’च्या काळात रिक्षा बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आदक यांनी भीमनगर, कानसई गाव, एमपी गेट येथील १५ रिक्षाचालकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. घरकाम करणार्‍या प्रभागातील व इतर प्रभागांतील गरजू २० ते २२ महिलांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. केशकर्तनालय चालविणार्‍या २०० कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप केले. अंबरनाथ समन्वयक प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम राबविले. वसंत नागडा, जितेन चौधरी, ईश्वर चव्हाण, गोखले, टांकळकर यांनी सहकार्य केले. कोविड रुग्णांची सेवा करताना आपल्यालाही बाधा होऊ शकते, यांचा विचार न करता डॉक्टर, परिचारिका कार्यरत होते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘केशवसृष्टी’च्या माध्यमातून अंबरनाथ येथील छाया सरकारी रूग्णालयात २०० व दंत महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये १०० असे एकूण ३०० पीपीई किट देण्यात आले. प्रभागातील पं. दीनदयाळ उपाध्याय वाचनालय येथे नगरपालिकेच्या माध्यमातून ‘अ‍ॅन्टिजेन’ चाचण्या चालू केल्या. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना अंबरनाथमध्ये चाचण्या वाढविल्या पाहिजेत, असे एक पत्र दिले.
घराघरात जाऊन प्रत्येकांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली होती. रुग्ण आजारी झाला तर त्यांची कोविड चाचणी करावी लागत होती. त्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत होता. याकाळात उपचाराअभावी काही रुग्ण दगावत होते. त्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचाही मृत्यू झाला. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यात लॅब असावी, त्यामुळे चाचणीचे रिपोर्ट लगेच मिळतील, अशी मागणी जोर धरू लागली. या मागणीनुसार बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी लॅब सुरू केली आहे. अंबरनाथ आणि बदलापूरसाठी एक लॅब दिली आहे. रिपोर्ट लवकर आल्यामुळे उपचार जलद गतीने होऊ लागले आणि संक्रमणाचा धोका टाळता येऊ लागला. संपूर्ण अंबरनाथमध्ये स्क्रीनिंग व ऑक्सिजन पातळी तपासणी करण्याचा उपक्रम आदक यांच्या मागणीमुळे राबविला गेला. आदक यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ७०० ते ८०० लोकांशी संपर्क केला. आपल्या पाठीशी कुणीतरी आहे. आपली काळजी घेत आहे, ही भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली. नागरिकांच्या सेवेसाठी आदक २४ तास सज्ज असतात. त्यामुळे लोकांना आत्मविश्वास निर्माण झाला. कोविड रूग्णांची यादी त्यांच्यापर्यंत दररोज येते. त्यातील आपल्या प्रभागातील नागरिकांची विचारपूस केली जाते. त्यांच्या कुटुंबीयांना मदताची गरज आहे का ते पाहण्याचे काम ते करतात. कोरोनाची जास्त लक्षणे नसतील तर डेंटल कोविड सेंटरला दाखल व्हा. आपल्या परिचयातील लोक असल्याने संवाद साधला जातो. त्यामुळे आजारांशी लढण्याचे बळ मिळते.


कोविडमध्ये मोठी राष्ट्र ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, तो पैसा काही कामाला आला नाही. ईश्वरीशक्तीने संपूर्ण जग थांबविले आहे. या काळात परमेश्वराने मनुष्य जीवन दिले आहे. आपल्या जीवनातील २५टक्के तरी समाजाला द्यावे. तळागाळातील लोकांना मदत होईल, हा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा.


‘कोविड सेंटर’ जुलैमध्ये सुरू झाल्यावर जेवण, स्वच्छता संदर्भातील तक्रारी आल्या. अंबरनाथमध्ये सध्या प्रशासक असल्याने माजी सभापती आणि नगरसेविका अनिता आदक यांनी प्रशासकीय अधिकारी जगतसिंग गिरासे आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत रसाळ यांच्याशी संपर्क साधला. त्याठिकाणचा ठेकेदार बदलून चांगल्या सुविधा देण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात अंबरनाथ कोविड सेंटरचे कौतुक करण्यात आले होते. प्रशासकीय लोकांच्या माध्यमातून रुग्णांची काळजी घेणे, शासकीय यंत्रणोच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या सेवा कशा मिळतील, हे पाहिले. मध्यतंरीच्या काळात ऑक्सिजन रुग्णांना न मिळाल्याने ते दगावत होते. प्रशासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणल्यावर ऑक्सिजन टँक बसविला. त्यामुळे रूग्णांना कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची सेवा उत्तम मिळाली. अन्नधान्य पुरवण्यात साधारणपणे एक लाख रुपये खर्च केले आहे.
पुढील काळात छाया रुग्णालय केईएमसारखे अद्ययावत रुग्णालय होईल. कर्जतपासून उल्हासनगर तर ग्रामीण शहरी भागातील लोकांना सेवा उपलब्ध होतील. या पुढील काळात रुग्णालय सुसज्ज करणे हे पहिली जबाबदारी असल्याचे आदक सांगतात. आदक म्हणतात की, ”आमचे संपूर्ण कुटुंब हे संघ परिवारातील आहे. माझ्या पत्नी धनश्री महिला पतपेढीच्या संचालिका आहेत. तिची या कामात मोठा साथ लाभली.” पक्षपातळीवर निरंजन डावखरे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे आदक सांगतात. शिवाय माजी आमदार नरेंद्र पवार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही सहकार्य लाभले. कोविड रुग्ण सापडल्यावर काय होत असेल, ही परिस्थिती आदक यांनी स्वत: अनुभवली. त्यांच्या मुलाला ताप आला तेव्हा डॉक्टरांनी ‘अ‍ॅन्टिजेन’ चाचणी करायला सांगितले. घरात सर्वजण घाबरले होते. मुलाच्या आईच्या डोळ्यात पाणी होते. ‘अ‍ॅन्टिजेन करणे’ बोलणे सोपे आहे, पण चाचणी करताना घरात काय वातावरण असेल हे समजले. विड काळात नागरिकांना प्रेरणादायी ठरतील, अशा फेसबुक मुलाखती, व्हिडिओ कॉल संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांमुळे प्रभाग स्वच्छ राहतो. या कर्मचार्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे पूजन करण्याचा स्तुत्य उपक्रमही आदक यांनी राबविला. तसेच त्यांना भेटवस्तू ही दिली. आदक म्हणतात की, “कोविड काळात गरजूंना मदत करणे हे ईश्वरी काम आहे आणि लोकांनाही या कामाला चांगला प्रतिसाद दिला.’
- जान्हवी मोर्ये
@@AUTHORINFO_V1@@