सत्ता स्वार्थासाठी नव्हे, सेवेसाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

gangadhare_1  H


कोरोनाच्या काळात लोकांना लागेल त्या मदतीसाठी नगरसेवक प्रकाश गंगाधरे हे रस्त्यावर उतरले. अक्षरश: २४ तास जनतेच्या सेवेस सिद्ध झाले. सर्वात प्रथम लोकांच्या मनात असलेली कोरोनाची भीती आणि कोरोनाबद्दलचे गैरसमज दूर करणे गरजेचे होते. प्रकाश गंगाधरे यांनी वस्ती पातळीवर अशा प्रकारे नियोजन केले की, वस्तीतील लोकांशी तत्काळ संपर्क होईल. तेव्हा, प्रकाश गंगाधरे यांच्या कोरोना महामारीच्या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...

प्रकाश काशिनाथ गंगाधरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक
प्रभाग क्र. : १०४, मुलुंड
संपर्क क्र. : ९८२००२६३४७

कोरोनाचा कहर सुरू झाला. कोरोना संसर्गाच्या अटी-शर्ती पाहता कोरोना झोपडपट्टीच्या दाट लोकवस्तीत पोहोचेल, अशी अटकळ होतीच. थोड्या प्रमाणात ही अटकळ खरीही ठरली. मुंबईत सुरुवातीला कोरोना संसर्ग झोपडपट्ट्यांमध्येच झाला. त्या सुरुवातीच्या काळात मुलुंड परिसरात कोरोना रूग्ण सापडला नव्हता. ‘लॉकडाऊन’ही शिस्तीतच पाळले गेले होते. मात्र, एप्रिल-मे महिना सुरू झाला आणि मुलुंडमध्ये कोरोना जाणवू लागला. मुलुंड पश्चिममध्ये कोरोनाने जोर पकडला. त्यातही मुलुंडचा प्रभाग क्र. १०४ म्हणजे सेवावस्ती बाहुल्य असलेला प्रभाग. या प्रभागात कोरोनाचा प्रसार वाढला. त्या वेळी कोरोनाला घाबरून भले भले घरी बसले होते. पण, नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी प्रत्येक वस्तीत राजकीय भाषेत प्रत्येक बुथमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृती केली गेली. निवडणुकीच्या वेळी झोपडपट्टीमध्ये चपला झिजवणारे हातपाय जोडणारे राजकारणी आपण पाहतो. पण, प्रकाश गंगाधरे निवडणुकीमध्ये नव्हे, तर कोरोना काळात झोपडपट्टीच्या गल्लीगल्लीत पोहोचले. लोकांना हात जोडून विनंती करू लागले की, ‘घाबरू नका, कोरोनाची लक्षणं दिसली तर तत्काळ दवाखान्यात जा. काही अडचण असेल तर मला किंवा इथल्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांस कळवा.’
वस्तीत जात असताना प्रकाश गंगाधरे यांना जाणवले की, कामधंदा ठप्प पडल्याने लोकांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही. उपासमारीमुळे लोकांचे इतर आजार बळावत आहेत. लोकांची उपासमार टाळण्यासाठी प्रकाश यांनी एप्रिल ते सप्टेंबर अन्नवितरण सुरू केले. हजारो लोकांनी या अन्नाचा लाभ घेतला. हे अन्न वितरण करताना ते स्वत: जातीने हजर राहत. लोकांना इतर काही समस्या आहेत का? काही प्रश्न आहेत का, याबाबत संवाद साधत. लोकांना ते प्रकर्षाने सांगत की, तुम्ही इथे एकटे नाही आहात, आम्ही तुमच्यासोबत आहोत. अन्नवितरणासोबतच प्रकाश यांनी प्रभागामध्ये घरोघरी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप केले. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या काढ्याचे वितरण केले. तसेच गरजूंना अन्नधान्याचे वाटपही केले. त्यातही डबेवाले, रिक्षाचालक, नाका कामगार यांना धान्याचे किट वितरीत केले.
असो, यादरम्यान मास्क घालणे अनिवार्य होते. पण काही काही लोक अशीसुद्धा होती की, त्यांच्याकडे मास्क घ्यायला किंवा सॅनिटायझर घ्यायलाही पैसे नव्हते. प्रकाश यांनी हजारो मास्क वितरित केले. शिवाय सॅनिटायझरचेही वाटप केले. या काळात प्रकाश यांचे कार्यालय कधीही बंद राहिले नाही, म्हणजे कार्यालयाचा दरवाजा जरी बंद असला तरी संपर्कासाठी दूरध्वनी २४ तास सुरू होते. लोक कोंड्याचा मांडा करून पोट भरतील. पण, बांधव मनातून खचायला नकोत, असा विचार प्रकाश करत. त्यामुळेच ते या काळात लोकांच्या संपर्कात राहिले. केंद्र सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक वंचितांसाठी, सामाजिक वंचितांसाठी, दिव्यांगासाठी योजना जाहीर केल्या व कार्यान्वित केल्या. त्या योजनाचा लाभ प्रभागातील जनतेला मिळवून द्यायचा प्रयत्न प्रकाश यांनी केला.



gangadhare_1  H



‘सत्ता स्वार्थ के लिये नही, सेवा के लिये हैं’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्य मला समाजकार्यासाठी नेहमी प्रेरणा देते. मुलुंडच्या नागरिकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिले, स्नेह दिला. माझा प्रभाग क्र. १०४ तर माझे घरच आहे. त्यामुळे कोरोना काळात प्रभागातील बांधवांच्या सुखदु:खात सहभागी होणे, त्यांना सहकार्य करणे हे तर माझे कर्तव्यच आहे. आज ज्या पदावर, ज्या स्थानावर आहे ते केवळ या समाजबांधवांमुळेच!



त्यांनी प्रभागातील प्रत्येक वस्तीत आरोग्य शिबीर लावले. या आरोग्य शिबिराला ते स्वत: उपस्थित राहत असत. अनेकदा कोरोना संशयित व्यक्ती म्हणे की, ‘मला काहीच झाले नाही. मी अजिबात दवाखान्यात जाणार नाही आणि माझ्या घरातले तर अजिबात ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये जाणार नाहीत. मी ठणठणीत आहे.’ मात्र, त्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणं असत. अशा वेळी प्रकाश त्या व्यक्तीस समजावत असत की, “तुम्ही कशाला घाबरता, टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत ना, काही दिवस उपचार केले की, तुम्ही परत घरी याल. त्यावेळी तुमच्या घरी चहा-नाश्त्याला येईन.” नगरसेवक असे म्हणतो हे ऐकून वस्तीतल्या त्या व्यक्तीलाही धीर येई. तो उपचार करण्यास तयार होई. उपचार घेऊन तो काही दिवसाने परतल्यानंतर त्या गल्लीतल्या लोकांना समजे की, कोरोना भयंकर आजार आहे, पण वेळीच उपचार घेतल्यावर आपण वाचू शकतो. त्यामुळे लोकांच्या मनातला कोरोनाबद्दलचा गैरसमज दूर होऊ लागला. लोक स्वत:हून कोरोना चाचणी करायला पुढे येऊ लागले. आजारी पडल्यास घाबरून घरात न राहता उपचारासाठी दवाखान्यात जाऊ लागले.
प्रभागातील कोरोना रूग्णांची यादी प्रकाश गंगाधरे यांच्याकडे दररोज येते. प्रकाश गंगाधरे न चुकता प्रत्येक रूग्णाला संपर्क करून त्याला हॉस्पिटल किंवा ‘कोविड सेंटर’मध्ये काही त्रास तर नाही ना? काही हवे आहे का? याबाबतची विचारणा करत, आजही करत आहेत. कुणा रूग्णाने कोणत्याही प्रकारची तक्रार केलीच, तर त्या तक्रारीचे निवारणही प्रकाश गंगाधरे यांनी केले आहे. पुढे प्रभागातील वस्ती पातळीवरील खासगी छोटे दवाखाने सुरू व्हावे, यासाठी प्रकाश यांनी डॉक्टरांशी संपर्क केला. त्यांनी पुन्हा वस्तीतले आपले क्लिनीक सुरू करावे, यासाठी प्रयत्न केले. डॉक्टरांना, अत्यावश्यक सेवेत असणार्‍यांना पीपीई किटचे वाटप केले. तसेच प्रत्येक सोसायटीमध्ये ऑक्सिमीटर आणि थर्मल गनचे वितरण केले. कारण, प्रशासनाने प्रत्येक सोसायटीसाठी नियमावली केली होती. त्यानुसार सोसायटीमध्ये प्रवेशासाठी थर्मल गन व ऑक्सिमीटरने तपासणी आवश्यक होते. पण, सगळ्याच सोसायटी ही सामग्री घेऊ शकत नव्हत्या. त्यामुळे प्रकाश यांनी ऑक्सिमीटर आणि थर्मल गन सोसायटींमध्ये वितरीत केले.
याच काळात खूप जणांच्या नोकर्‍या गेल्या, तर खूप जाणांचे उद्योगधंदे बंद पडले. प्रकाश गंगाधरे यांनी प्रयत्न केला की, ज्यांच्या नोकर्‍या गेल्या आणि ज्यांचे उद्योगधंदे कर्मचार्‍यांअभावी बंद पडले. या दोघांचीही भेट घडवून द्यायची, जेणेकरून जेव्हा केव्हा ‘लॉकडाऊन’ संपेल, तेव्हा नोकरी गमावणार्‍यांना नोकरी मिळेल आणि उद्योगधंद्यांना कर्मचारी मिळतील.
प्रकाश यांनी विविध स्तरांवर लोकांना मदत केली. सततच्या लोकसंपर्कातून त्यांनाही कोरोनासदृश लक्षणे सुरू झाली. त्यावेळी काही काळ स्वत:ला ‘क्वारंटाईन’ करून ते पुन्हा कामाला सिद्ध झाले. आपण थांबलो तर कसे होईल? मी समाजबांधवाच्या सुखदु:खात उपस्थित राहायलाच हवे, असे त्यांचे मत. त्यामुळे प्रकाश गंगाधरे कोरोना काळात खरे ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करत होते. लोकांची दु:खं त्यांना तत्काळ समजत होती.याबाबत प्रकाश गंगाधरे म्हणतात की, “मी एका साधारण घरातला मुलगा. घरची गरिबी, गिरण्या बंद पडल्यामुळे घरंदारं उद्ध्वस्त होताना मी पाहिली. गरिबी, लाचारी, भूक माणसाचे खरे शत्रू आहेत. कोरोना काळात माणसाला या शत्रूंचा सामना करावा लागला. मला वाटते, निदान मी जिथपर्यंत योगदान देऊ शकतो, तिथपर्यंत तरी माझ्या प्रभागात कुणीही व्यक्ती उपाशी झोपू नये, कुणी व्यक्ती भुकेने कळवळू नये आणि कुणीही व्यक्ती आजारी पडल्यावर वैद्यकीय उपचार न मिळता हतबल होऊ नये. नगरसेवक म्हणून नाही तर एक समाजबांधव म्हणून समाजाप्रती माझे कर्तव्य आहे आणि ते मी निभावणारच...”
@@AUTHORINFO_V1@@