त्यांनी आणला आयुष्यात गोडवा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

taware_1  H x W



कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दसर्‍याला प्रत्येकाच्या घरात गोडधोड बनावे या हेतूने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सदस्य व प्रभाग क्र. ६६ आयरे गावचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी श्रीखंडाचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळातही त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या या कामाचा घेतलेला आढावा...


मंदार गोविंद टावरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष
लोकप्रतिनिधी : माजी कडोंमपा स्थायी समिती सदस्य
प्रभाग क्र. : ६६, आयरेगावचे माजी नगरसेवक
संपर्क क्र. : ९८३३८५७१३७

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ‘लॉकडाऊन’ जाहीर होण्याआधीच मास्क वाटप करण्यास सुरुवात केली. मार्चमध्ये त्यांनी दोन हजार नागरिकांना मास्कचे वाटप केले. टावरे यांनी त्यांच्या कार्यालयात मास्क ठेवून दिले होते. सोसायटीतील पदाधिकारी येऊन सर्व सदस्यांसाठी मास्क घेऊन जात होते. आयरे गाव परिसरात ज्योतीनगर, समतानगर हा झोपडपट्टीचा विभाग आहे. या रहिवाशांचे हातावर पोट चालत असे. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांचा रोजगार बुडाला आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या रहिवाशांसाठी त्यांनी रेशन किट दिले.
झोपडपट्टीतील एक हजार कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे तांदूळ, गहू, तूरडाळ, मूगडाळ, तेल, साखर इत्यादी वस्तूंचे वाटप केले. रेशन दुकानावरून रेशन कार्डधारकांना देण्यात येणारे अन्नधान्य मोफत दिले. त्यासाठीचे २५ हजार रुपये रेशन दुकानांना दिले. प्रभागातील अडीच हजार नागरिकांना पाच किलो गव्हाच्या पिठाची पिशवी तयार करून दिली होती. श्रीरामनगर विभागातील बहुतांशी नागरिक ‘लॉकडाऊन’ काळात घरीच होते. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रभागात दोन महिने अन्नछत्र सुरू केले. या अन्नछत्रात दररोज वेगवेगळे प्रकार असायचे. १२०० नागरिकांना या अन्नछत्रातून जेवण पुरविण्यात आले. जेवण बनविणे आणि ते वाढणे यासाठी श्रीरामनगर सामाजिक संस्थेचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.आपला प्रभागाचा परिसर स्वच्छ, कोरोनामुक्त करण्यासाठी आणि जंतुनाशक फवारणी करण्यासाठी दोन कामगारांची नियुक्ती केली. ज्या विभागात कोरोना रुग्ण आढळून येतो त्याठिकाणी जंतुनाशक फवारणी केली जाते. याशिवाय प्रभागात दररोज जंतुनाशक फवारणी केली जाते. त्यासाठी दोन नवीन जंतुनाशक फवारणी पंपही खरेदी केले आहेत. टावरे यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी आणि नागरिकांची प्रतिकारशक्ती उत्तम राहावी, यासाठी प्रतिकारशक्ती वर्धक औषध वाटपाचा कार्यक्रम राबविला. त्यामध्ये संपूर्ण प्रभागात पाच हजार ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप करण्यात आले. अनेक रूग्णांना तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागत होते. त्यांच्यासाठी दोन विनामूल्य रिक्षांची सोय केली होती. या सेवेचा अंदाजे ३०० नागरिकांनी लाभ घेतला.टावरे यांनी गणेशोत्सवात नागरिकांना ३५० रूपये किमतीचे गणेशपूजन साहित्याचे वाटप केले. प्रभागातील दोन हजार नागरिकांना साखरेचे वाटप केले. सोसायटीतील प्रत्येक व्यक्तीने प्रवेश करताना सॅनिटायझरचा वापर करावा, यासाठी सॅनिटायझर पंप लावले होते. सोसायटीत साधारणपणे १०० ते १५० सॅनिटायझर पंप लावले आहेत. याशिवाय प्रभागातील मुख्य रस्त्यावर आणि महत्त्वाच्या जागी ही सॅनिटायझर पंप लावले आहेत. या सॅनिटायझरचे रिफिलिंगसुद्धा टावरेच करतात.

प्रभागात कोरोना संशयित रुग्णांची आकडेवारी समजावी आणि त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी वेळेत काळजी घेणे गरजेचे आहे, हे जाणून घेण्यासाठी विनामूल्य ‘अ‍ॅन्टिजेन टेस्ट’ शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात फेरीवाले, रिक्षावाले, दुकानदार या सगळ्यांची चाचणी करण्यात आली. आता कायमस्वरूपी ‘अ‍ॅन्टिजेन’ चाचणी केली जात आहे. रोजगार गेल्याने आपल्या मूळ गावी जाऊन शेतात काम करून पोट भरता येईल, या आशेने अनेकांनी गावाची वाट धरण्याचा विचार केला. पण, त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था नव्हती. या नागरिकांसाठी खासगी बसेची सोय करून दिली. तसेच त्यांच्या तिकिटांचा आर्थिक भार ही उचलला. तीस ते चाळीस हजार रूपये खासगी बस सेवेसाठी त्यांनी खर्च केले. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या विभागांना ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात येत होते. त्या विभागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. या नागरिकांना गरज असलेल्या वस्तूंची ते यादी देत असत. त्यानुसार सर्व साहित्य मोफत देऊन नागरिकांच्या घरी पोहोचविले जात होते. प्रभागातील नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासण्याचेही काम केले.



taware_1  H x W



ज्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी समाजातील गरजूंना मदत केली पाहिजे. कोरोना काळातील वेळ कोणावरही येऊ नये. काही लोक लाह्या खाऊन दिवस काढत होते, तर दुसरीकडे अनेक जण वेगवेगळ्या पाककृती बनवित होते. कोरोना काळात अनेकांनी हलाखीचे दिवस काढले. म्हणूनच अशा गरजूंना समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली पाहिजे.



टावरे यांनी या सर्व कामासाठी वैयक्तिक पातळीवर दहा ते बारा लाख रूपये खर्च केला. सरकारी यंत्रणेचे सहकार्य होते. त्यामुळे खर्च थोडा कमी झाला. सरकारने रेशनवर अन्नधान्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे सरकारी यंत्रणेचे पूर्णपणे सहकार्य होते. प्रभागात झोपडपट्टी विभाग असल्याने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागली. आमच्या प्रभागातील म्हात्रेनगरमध्ये ३० मार्चला पहिला रूग्ण आढळून आला. या विभागात फळ, भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणावर राहतात. रोजंदारीवर काम करून ते स्वत:चे पोट भरतात. त्यांना ‘लॉकडाऊन’च्या काळात घराबाहेर पडू न देणे हे एक मोठे आवाहन होते. त्यासाठी समाजमाध्यमांतून तर कधी वैयक्तिक जनजागृतीवर भर दिला. या कामात पोलीस मित्रांचीही मोठी मदत झाली.टावरे यांना हे काम करताना घरातून पूर्ण पाठिंबा होता. या कामात पत्नी मिनल आणि वडील गोविंद याशिवाय इतर कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली. कोरोना काळात गरजूंना मदत करण्यासाठी घराबाहेर गेले तरी ते स्वत:ची पूर्णपणे काळजी घेत होते. घरातील आणि कार्यकर्ते अशा मिळून नऊ जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाविषयी सर्वांच्याच मनात भीती होती, पण ते सगळे ही लढाई लढले आणि जिंकलेही.कोणतेही काम करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आवश्यक असते. याकामी माजी राज्यमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रत्येक गोष्टीची ते काळजी घेत असत. दूरध्वनीवरून ते सातत्याने संपर्कात होते.
प्रभागातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर कोरोनाची लागण झालेले रूग्ण बरे होऊन घरी परतत होते. मात्र, त्या तरुणांच्या परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा जाणवत नव्हती. टावरे डॉक्टरांशी सतत संपर्कात असायचे. पण त्यांचे शरीर उपचारांना म्हणावे तितके साथ देत नव्हते. हा तरूण उपचार घेऊन जवळजवळ ३० ते ३५ दिवसांनी परतला. त्यावेळी बालाजी गार्डन विभागात त्यांचे स्वागत करण्यात आले. तो तरुण घरी आला हा प्रसंग भावनिक करणारा होता, असे टावरे सांगतात.टावरे यांच्या समाजकार्याला गरजूंकडून चांगला प्रतिसाद मिळाला. झोपडपट्टीमध्ये कोरोना पसरण्याची भीती अधिक होती. टावरे यांनी त्या रहिवाशांना नीट समजून सांगितले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासही मदत झाली.


- जान्हवी मौर्य 
@@AUTHORINFO_V1@@