‘कोरोना’वर मात करणारे ‘रोल मॉडेल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

g gaikwad_1  H


प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत कठोर परिश्रम, जीवनमूल्ये आणि सत्य या तत्त्वावर चालत इतरांसाठी एक ‘रोल मॉडेल’ ठरलेले भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोनाकाळात गरजूंना मदतीचा हात दिला. लहानपणापासून गरिबांचे चटके सहन केल्याने गरिबी काय असते, ते त्यांना चांगलेच ठावूक आहे. म्हणूनच गरिबांना मदतीचा हात देणारे गणपत गायकवाड यांनी ‘कोविड’काळात केलेल्या मदतकार्याचा आढावा.


गणपत काळू गायकवाड
राजकीय पक्ष : भाजप
मतदारसंघ : कल्याण पूर्व
पद : आमदार
संपर्क क्र. : ९०२९९९९९९९


कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला तो गरीब, मजूर, कामगार, रोजंदारीवर काम करणारे पुरुष-महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना! खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून निर्माण झाला होता. त्यांना धीर देण्यासाठी गणपत गायकवाड धावून गेले. गणपत गायकवाड यांनी दहा हजारांहून अधिक गरजू कुटुंबीयांना धान्याच्या किटचे वाटप केले. अन्नधान्याचे किट देऊनही इतर साहित्य नसल्याने अनेकांना जेवण बनविणे शक्य नव्हते. या गरजूंसाठी त्यांनी ‘कम्युनिटी किचन’ (अन्नछत्र) सुरू केले. या ‘कम्युनिटी किचन’मध्ये तयार केलेल्या अन्नाची पॅकेट भाजप कार्यकर्त्यांच्या साहाय्याने १५ हजारांहून अनेक नागरिकांपर्यंत पोहोचविली. या ‘कम्युनिटी किचन’मुळे नागरिकांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय झाली.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, तसेच विधानसभा क्षेत्रांतर्गत येणार्‍या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना तसेच सर्वसामान्यांनाही कोरोनाविरोधात लढण्यासाठी पाच हजार मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. डॉक्टर, पारिचारिका आणि इतर कर्मचारीवर्ग यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. कोरोना विरोधात लढण्यासाठी या ‘कोविड योद्ध्यां’ना ‘पीपीई’ किटचे वाटप केले. सरकारी रुग्णालयात या ‘पीपीई’ किटचे वाटप केले. ‘कोविड योद्ध्यां’नाही गणपत गायकवाड यांनी ‘पीपीई’ किटचे वाटप केले. गरजू नागरिकांच्या मदतीसाठी भाजपचे कार्यकर्ते धावधाव करीत होते. हे मदतकार्य करताना कुणालाही कोरोनाची बाधा होऊ नये, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक औषधाचे मोफत वितरण करण्यात आले. विधानसभा क्षेत्रातील पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना या होमियोपॉथिक गोळ्यांचे वाटप केले. वाटपाचे काम सामाजिक अंतर ठेवून केले. गणपत गायकवाड यांनी केवळ गरजू नागरिकांनाच मदत केली नाही, तर आपल्या कार्यकर्त्यांचीही काळजी घेतली.आपला परिसर रोगराईमुक्त, विषाणूमुक्त ठेवण्यासाठी आ. गणपत गायकवाड यांनी जंतुनाशक फवारणीदेखील करवून घेतली. ‘कोविड’ रुग्ण ज्या ठिकाणी आढळून येत होते, त्याठिकाणीही सोसायटीच्या मागणीनुसार जंतुनाशक फवारणी केली. संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील सोसायटी, वस्तीमध्ये फवारणीचे काम केले. ही फवारणी आजही सुरूच ठेवली आहे.


‘लॉकडाऊन’च्या काळात नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. भाजीसाठी नागरिकांची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. ही टाळण्यासाठी महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या. कांदे-बटाटे विक्री एका ठिकाणी ठेवली. दुसर्‍या ठिकाणी केवळ भाजीविक्री ठेवली. या उपाययोजनांनंतर ही भाजी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत होती. कल्याण-डोंबिवली हा विभाग रेड झोनमध्ये होता. त्या ठिकाणी दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विधेयकात शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत आणण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्या पद्धतीने ‘कोविड’काळात शेतकर्‍यांचा माल थेट सोसायटीपर्यंत नेण्याचा उपक्रम गणपत गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविला.


g gaikwad_1  H


संकटकाळात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली पाहिजे. कोरोनामुळे शत्रूवरही जी वेळ येऊ नये, अशी वेळ नागरिकांवर आली. दोन वेळेचे जेवण मिळणेही त्यांना मुश्कील झाले होते. आपल्याकडून जितकी जमेल तेवढी मदत गरजूंना केली पाहिजे. मी, माझ्या परीने प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कोणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली.



यामुळे नागरिकांना आपल्या दारात वाजवी दरात भाजीपाला मिळू लागला. आठ हजारांहून अधिक नागरिकांना या उपक्रमांचा फायदा झाला. स्थलांतरित कामगारांना आपल्या गावी तसेच आपल्या घरी जाण्यासाठी त्यांना डॉक्टरांमार्फत वैद्यकीय प्रमाणपत्र देणे, त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे, अशा प्रकारे त्यांना आवश्यक ते सहकार्य केले. कोरोनाची आपल्यालाही बाधा होईल, याचा विचार न करता गणपत गायकवाड यांनी प्रत्यक्ष विधानसभा क्षेत्रात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांमध्ये सामाजिक अंतर राखणे, याबाबत जनजागृती केली, तसेच कोरोनाला दूर ठेवण्यासाठी असलेले नियम त्यांनी नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन पोहोचविले.


शिधापत्रिका कार्यालयावर जाऊन तेथील भोंगळ कारभाराबद्दल आवाज उठवून सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून कल्याण पूर्वेत आठ ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एक हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये अ‍ॅन्टिजेन चाचणी, संपूर्ण बॉडी चेकअप आणि रक्त तपासणी करण्यात आली, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचेही मोफत वाटप करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांना अनेक वेळा बेड, आवश्यक इंजेक्शन, प्लाझ्मा उपलब्ध होत नव्हता. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी गणपत गायकवाड यांनी प्रयत्न केले. गरजूंना मदत करण्यासाठी गणपत गायकवाड यांनी सुमारे ५९ लाख रुपये खर्च केला आहे. कोरोनाकाळात काम करताना गणपत गायकवाड यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ते गरजूंना मदत करू शकले. या कामात त्यांच्या पत्नी सुलभा, मुलगा वैभव, प्रणव आणि मुलगी सायली यांची साथ मिळाली. गणपत गायकवाड हे स्वत:ची पूर्ण काळजी घेऊनच गरजू नागरिकांना मदत करीत होते. त्यासाठी ते सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करीत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी ते आयुर्वेदिक काढा आणि व्हिटामीन ‘सी’ च्या गोळ्याही घेत होते. पण, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. घरातच ‘क्वारंटाईन’ होऊन त्यांनी कोरोनावर मात केली आणि पुन्हा एकदा ‘मी जनतेचा सेवेकरी’ म्हणत, ते आपल्या कार्याला लागले.

गणपत गायकवाड यांना त्यांच्या सेवाकार्यात त्यांच्या सहकार्‍यांनी मनापासून साथ दिली. त्यात कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, श्री मलंग मंडल अध्यक्ष राजेंद्र वारे, उल्हासनगर मंडल अध्यक्ष निलेश बोबडे, संदीप सरवणकर, संदीप तांबे, मनोज माळी, सौरभ सिंह, विवेक त्रिवेदी, संदेश काळे, धनश्री मुकुंदे, समीर भंडारी, सुभाष म्हस्के, प्रकाश दूधकर आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कपिल पाटील, आ. रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कोरोनाकाळात अनेक रुग्णांना उपचार मिळत नव्हते. कोरोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे दुसरा कोणी व्यक्ती त्या रुग्णाला हात लावत नव्हता. कोरोना रुग्णांच्या घरातील व्यक्ती ही त्यापासून लांब राहत होती. काही रुग्ण ज्यांना नीट चालता येत नाही, ते फरफटत जिन्यावरून खाली येत होते, असे प्रसंग पाहून मन हेलावून जात असल्याचे ते सांगतात.


- जान्हवी मोर्ये
@@AUTHORINFO_V1@@