मानव सेवा हीच खरी भक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

sUNESH jOSHI _1 &nbs


कोरोनाच्या संकटात सेवाकार्य झाले आहेच. अजूनही गरजेनुसार होत आहे. यथाशक्ती अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय जनता पक्षाचे ठाणे नौपाडा मंडल अध्यक्ष, प्रभाग क्रमांक २१ चे नगरसेवक सुनेश जोशी यांनी पुढाकार घेऊन ‘लॉकडाऊन’च्या पूर्ण कालावधीत नौपाडा परिसरात विविध प्रकारची कामं केली आहेत. ‘कोरोना योद्धा’ होऊन सुनेश जोशी कार्यरत आहेत. नगरसेवक सुनेश जोशी यांनी केलेल्या कार्याचा आढावा...
 
 
 
 
नाव : सुनेश जोशी
राजकीय पक्ष : भाजप
पद : अध्यक्ष, भाजप, नौपाडा मंडल (ठाणे)
नगरसेवक : प्रभाग क्र. २१
९८३३८३१३५८
 
 
 
 

‘गोरगरिबांना
धरूनिया पोटी,
पुसुनिया आसू,
घास देई ओठी...’
 
 
 
हा सेवेचा सहज भाव बाळगून नगरसेवक सुनेश जोशी यांनी आवर्जून नोंद घ्यावी, असे काम संकटकाळात केले आहे. बालपणापासून संघ स्वयंसेवक असल्याची प्रचिती सुनेश जोशी यांनी दिली आहे. संवेदनेचे कृतिरूप प्रकटीकरण सुनेश जोशी यांनी केले आहे. हिंदू जागृती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सक्रिय असलेल्या सुनेश जोशी यांनी कार्यकर्ता वृत्तीचे दर्शन घडविले आहे.
 
 
मध्यमवर्गीय कुटुंबात आपल्या ताटातली अर्धी भाकरी देणे हे अगदी सहज. घासातील घास काढून देणे हा स्वभाव. अशा कुटुंबातला सुनेश जोशी यांचा जन्म. आपुलकीने जमेल तेवढे करणे ही शिकवण त्यांना अगदी बालवयापासून मिळाली. रा. स्व. संघाच्या शाखेत खेळ, पद्य, आणि मस्ती यात दंग असताना हा समाज आपला आहे आणि त्यासाठी आपण काही करणे हे कर्तव्य आहे, हे अधिक दृढ झाले. हिंदू जागृती गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून प्रबोधनाच्या चळवळीत सहभाग देताना झालेले समाजदर्शन सेवेसाठी प्रोत्साहित करणारे ठरेल.
 
 
ज्या प्रकारचे संकट आहे, त्यात झोकून देऊन काम करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे धैर्य लागते. स्वतःच्या कुटुंबाच्या, घराच्या सुरक्षेची काळजी घेत वेळी-अवेळी येणार्‍या हाकेला त्वरित ‘ओ’ देणे, अशा परिस्थितीत तसे सोपे नसते. एक टांगती तलवार सतत डोक्यावर घेऊन वावरणे अवघड असते. अशा एका वेगळ्या वातावरणात सुनेश जोशी रणभूमीवर ठामपणे उभे राहिले. आपल्या मर्यादांवर मात करून, क्षमता ताणून सुनेश जोशी आलेल्या संकटाला सामोरे गेले. भाजप नौपाडा मंडलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिंदू जागृतीचे कार्यकर्ते अशा सगळ्यांच्या सहकार्याने कामाचे नियोजन करून सुनेश जोशी यांनी निःस्वार्थ सेवा केली आहे. सत्कार्याचे अखंड चिंतन, स्नेहभावाचे रक्षाबंधन हा भाव त्यांनी रुजविला आहे.
 
 
 
 
 

sUNESH jOSHI _3 &nbs 
 
"भाजपच्या माध्यमातून समाजबांधवांच्या वेदनेवर फुंकर घालण्याची संधी मिळाली. कोरोना आपत्तीत लोकप्रतिनिधी या नात्याने घरातील संस्कार, संघ शाखेतील शिकवण आणि भाजपची सैद्धांतिक भूमिका याचे कृतिरूप म्हणून सेवा कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपत्ती काळातील आवाहन, नियोजन, निर्णय आणि त्यांचे अथक परिश्रम ही सेवा कार्य करण्याची प्रेरणा आहे."
 
 
 
 
४२ हजार ७५० मास्कचे वितरण, ३४ हजार ४७५ सॅनिटायझरचे वाटप, ७४ हजार आयुर्वेदिक गोळ्या, काढे-भरड, होमियोपॅथिक गोळ्यांचे वितरण, नऊ हजार कामगारांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, सलग ४२ दिवस ४३ हजार ७३५ अन्न पाकिटांचे वितरण, ३३५ नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी ई-पास उपलब्ध करून दिले, तसेच २१ हजार ५६० नागरिकांची, फिरता दवाखाना माध्यमातून तपासणी ही सुनेश जोशी यांनी केलेल्या कामाची आकडेवारी आहे. सदर आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. केलेल्या कामाची कल्पना यावरून येते. यातून सेवा धर्म श्रेष्ठ असल्याचे अधोरेखित झाले आहे.
 
 
पोलीस, महापालिका कर्मचारी, फेरीवाले, असंघटित कामगार, ज्येष्ठ नागरिक, एसटी आणि टीएमटी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी अशा विविध घटकांना केलेली मदत मोलाची ठरली आहे. झोपडपट्ट्या, चाळी, अपार्टमेंट्स, गृहनिर्माण संस्था या सर्व ठिकाणी पोहोचून त्यांच्या आवश्यकतेनुसार काम केले आहे. सर्वांच्या ठायी एकच ईश्वर आहे, या शाश्वत सिद्धांतावर विश्वास ठेवल्यास काम सुकर होते.
 

sUNESH jOSHI _2 &nbs
 
 
परिसरात सर्वत्र नियमितपणे जंतुनाशक फवारणी, रक्तदान शिबिराचे आयोजन, प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र, रेशन किटचे वाटप, स्वस्त दरात भाजीविक्री केंद्र, जनजागृतीवर भर देऊन लोकशिक्षण, काही जणांना घरपोच जेवणाचे डबे, ही कामे प्राधान्याने केली आहेत. ‘कमल कवच’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून तब्बल सहा हजार नागरिकांची स्वस्त दरात ‘कोविड-१९’, कोरोना चाचणी केली आहे. नागरिकांना कोरोना विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
 
सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, सद्भावना आणि संवाद या सात ‘स’च्या आधारे सुनेश जोशी कार्यरत आहेत. या सप्तसूत्रांचे वहन सेवाकार्यात करून भारतीय जनता पक्षाचे वेगळेपण सिद्ध केले आहे. आपत्तीकाळात उपेक्षितांच्या जवळ जाऊन, प्रेमाने हृदय भरण्याची सुनेश जोशी यांची ठोस कृती दिलासा देणारी ठरली आहे. समर्पण, कर्तव्य, मित्रत्व याने ओंजळ भरून समाजाच्या चरणी सेवांजली सुनेश जोशी यांनी अर्पण केली आहे.
 
- मकरंद मुळे


@@AUTHORINFO_V1@@