समाजस्नेही जनसेविका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Sneha Ambre _1  
 
 
राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पती रमेश आंब्रे यांची सहचारिणी बनून समाजकारण करत असताना लोकप्रतिनिधी पदाची संधी उपलब्ध झाली अन् भाजपच्या माध्यमातून उच्चभू्र, तसेच गोरगरीबबहुल प्रभागाच्या नगरसेविका बनून जनसेवेचा त्यांनी वसा घेतला. त्यानंतर, सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजस्नेही जनसेविका बनलेल्या स्नेहा रमेश आंब्रे; अर्थात ‘एसआरए’ यांनी ‘कोविड’काळातही आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले.
 
 
नाव : स्नेहा रमेश आंब्रे
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : नगरसेविका, ठाणे महानगरपालिका
कार्यक्षेत्र : मानपाडा, तुळशीधाम, नळपाडा, ठाणे (प)
प्रभाग क्रमांक : ४ ब
संपर्क क्रमांक : ९८७०४४७२७२
 
 
 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीला सामोरे जाताना, किंबहुना ‘कोविड’काळात केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे गोरगरीब, तसेच गरजू नागरिकांच्या मदतीसाठी प्रभाग क्र. ४च्या नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे आणि भारतीय जनता पक्ष ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष व नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक रमेश बा. आंब्रे हे दाम्पत्य पुढे सरसावले. माणुसकीच्या दृष्टिकोनातून अन्नदान असो वा तब्बल २५ टन शिधा, धान्यवाटप, मास्क व सॅनिटायझरचे वाटप, ‘पीपीई’ किट, जंतुनाशक फवारणी, ‘आर्सेनिक अल्बम-३०’च्या दहा हजार गोळ्यांचे वाटप, मोफत रुग्णवाहिका सेवा, अशी विविध प्रकारची समाजकार्ये गरजेच्या प्रत्येक ठिकाणी स्वतः जातीने लक्ष देऊन पूर्ण केली. त्यांच्या कोरोनाकाळामधील या मदतकार्याने गरजूंना मोठा आधार लाभला.
 
 
कोरोनाकाळात ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला तो गरीब मजूर, कामगार, ज्येष्ठ नागरिक, नोकरीधंदा गमावलेले मध्यमवर्गीय कुटुंब, रोजंदारीवर काम करणारे स्त्री-पुरुष व दिव्यांगांना. या घटकांच्या दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी समाजकार्यासाठी कायम तत्पर असलेल्या स्नेहा आंब्रे व रमेश आंब्रे या दाम्पत्याने गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे ठरविले. जेणेकरून दुर्बल घटकांपासून ते मध्यमवर्गीय लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये. एवढीच त्यामागील भावना होती. या दोघांबरोबरच त्यांचे उच्चशिक्षित सुपुत्र मुंबईच्या नायर रुग्णालयाचे डॉ. सागर रमेश आंब्रे (चइइड, चड, ॠएछएठअङ डणठॠएठध ऋचअड ऋशश्रश्रेु ळप ेपर्लेीीीसशीू इीशरीीं उरपलशी र्डीीसशीू ढछचउ) यांनीदेखील समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. या सर्व मदतकार्यामध्ये आंब्रे कुटुंबाच्या सोबतीला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांचे सहकारी यांचीदेखील मोलाची साथ लाभली. हातावर पोट असणारे, मोलमजुरी करून गुजराण करणार्‍या लोकांबरोबरच वृत्तपत्रविक्रेता, ठामपाचे चतुर्थश्रेणी कर्मचारी, सफाई कामगार, तसेच अन्य राज्यातील स्थलांतरित व झोपडीवासीय यांनादेखील आंब्रे दाम्पत्याने मदत केली.
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकल स्टोअर्समधून घरपोच औषध पुरवणे, तसेच फळेवाटपाचे कर्तव्य बजावले. आश्रमामध्ये जाऊन लहानग्यांना आणि वृद्धांना कपडे व फळांचे वाटप केले. प्रभागातील नागरिकांना धान्यवाटप करण्यासोबतच ऐन कोरोनाकाळात रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आंब्रे दाम्पत्याने २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि प्रभागातील नागरिकांसाठी घरपोच २५ हजार मास्कचे वाटप करण्यात आले. हे सर्व करत असतानाच रक्तदान शिबिराचे आयोजन, आरोग्य शिबीर, ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे मोफत वाटप केले. याच काळात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून सामाजिक उपक्रमदेखील राबवला. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी स्वतः जातीने लक्ष घालून रुग्णांसोबतच त्यांच्या घरच्या कुटुंबीयांची विचारपूस करून वेळोवेळी मदतीचा हात दिला.
 
परराज्यातील मजूर व श्रमिकांची हेळसांड होऊ नये, याची दक्षता घेतानाच या श्रमिकांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी ई-पास काढून देणे, फिटनेस सर्टिफिकेट कॅम्प, प्रभागातील सर्व ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पावसाळ्यामध्ये रोगराई वाढू नये म्हणून नालेसफाई, गटारे साफसफाई, प्रभागातील सखल भागात अतिवृष्टीमुळे साचणारे पाणी उपासणारे पंप उपलब्ध करून देणे आदी नियमित कामेदेखील स्वतः घराबाहेर पडून नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी केली. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी श्रवणयंत्र, अंधकाठी, ज्येष्ठ नागरिकांना आधारकाठी, दिव्यांगांना सायकलवाटप, डोळ्यांचे लेन्स आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
 
 
"कोरोनामुळे जीवनकार्य बदलून गेले, नातीगोती दुरावली. तरीदेखील, कोणताही भेदभाव न करता समाजाप्रति असलेल्या कर्तव्यभावनेचा विचार अंगीकारून गरजूंना, ‘फूल ना फुलाची पाकळी’ देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भविष्यातील आव्हाने पेलण्यास भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे. पती रमेश आंब्रे यांच्या समर्थ साथीने उभारलेल्या मदतीच्या सेतूमुळे आम्ही आज समाजस्नेही बनलो आहोत."
 
 
 
ही सर्व समाजस्नेही कार्ये करत असताना पक्षपातळीवर वरिष्ठांचे सहकार्य व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असते, ते सहकार्य व मार्गदर्शन भाजप ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष व कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे शहराचे भाजप आमदार संजय केळकर यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत राहिले. त्यामुळेच आंब्रे दाम्पत्याचे समाजकार्य सतत सुरूच असून ते कायम सुरू राहील, असेही ते अभिमानाने सांगतात. या समाजकार्यामध्ये त्यांना कृष्णा यादव, अश्विन शेट्टी, पौर्णिमा शेट्टी, राजेश सावंत, मंजुळा माळेकर, निपा बिस्वास, राकेश बोर्‍हाडे, अलोक ओक आणि प्रशांत मोरे या सहकार्‍यांनी वेळोवेळी साथ दिल्याचे स्नेहा आंब्रे सांगतात. दरम्यान, “कोरोनाचा भार ओसरत असताना ‘अनलॉक’च्या काळात ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर (निधी) योजना’ व पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना राबिवण्यात आली. हे समाजकार्य करत असताना आम्हाला खूप आनंद मिळतो. म्हणून यापुढेही आम्ही आमची समाजकार्ये अशीच चालू ठेवणार,” असे आंब्रे दाम्पत्य सांगायला विसरत नाहीत.
 
 
पंतप्रधानांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ प्रभागात भव्य सेवासप्ताह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका स्नेहा आंब्रे व रमेश आंब्रे यांनी १६ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत भव्य सेवा सप्ताहाचे आयोजन केले होते. या विविध उपक्रमांना ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते विनोद तावडे आणि आ. प्रसाद लाड यांची विशेष उपस्थिती होती. सेवा सप्ताहामधील पहिल्या दिवशी सिव्हिल रुग्णालय व ठाणे महापालिकेचे महाराष्ट्र नगर येथील डायलेसिस केंद्रात पोहोचून कोरोना रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप केले. दुसर्‍या दिवशी वाघबीळ येथील जीवन संवर्धन फाऊंडेशन संचालित ‘स्व. मालती गंधरे मातृच्छाया गुरुकूल’ या अनाथाश्रमात, तसेच ‘आनंद वृद्धाश्रमा’तील अनाथ वृद्ध व लहानग्यांना कपडे, फळे व बिस्कीट पाकीट, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
 
 
 
सेवा सप्ताहातील तिसर्‍या दिवशी प्रभाग क्र. ४ मधील कृष्णानगर, टीएमटी कॉलनी, धर्मवीरनगर, नळपाडा, गांधीनगर, ऑक्सफोर्ड सोसायटी, तुळशीधाम, भैरवी, सत्नाम पॅराडाईस येथील रहिवाशांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते घरोघरी जाऊन २१ हजार मास्कचे वाटप करण्यात आले. घरकाम करणार्‍या घरेलू महिला कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन व पथविक्रेत्यांसाठी ‘आत्मनिर्भर पथविक्रेता’ योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी स्नेहा आंब्रे यांनी पुढाकार घेतला. त्याचबरोबर, गरजूंना मदतीसोबतच रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी उपक्रमदेखील आंब्रे दाम्पत्याने नवयुग मित्रमंडळ व भाजपच्या माध्यमातून राबवले.
 
 

- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@