समाजातील सर्व घटकांचा आधारस्तंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |
Sitaram Rane _1 &nbs
 
 
‘लॉकडाऊन’च्या या कालावधीत समाजातील वंचित घटकांना सहकार्याची, मदतीची आवश्यकता असल्याने अनेक राजकीय, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे नेते आणि समाजसेवक मदतीसाठी पुढे आले. त्यातीलच एक म्हणजे ठाण्यातील सीताराम राणे होय. ‘कोविड’ काळात ठाणे ते कोकणसह महाराष्ट्रातील सोसायट्या असा सर्वदूर मदतीचा हात देणार्‍या सीताराम राणे या ‘कोविड योद्ध्या’चा आढावा घेणारा हा लेख.

नाव : सीताराम बाजी राणे
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
पद : भाजप राष्ट्रीय परिषद सदस्य, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था महासंघ
कार्यक्षेत्र : ठाणे जिल्हा व महाराष्ट्र
संपर्क क्रमांक : ९८९२८७४०८७
 
 
सामाजिक आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची आणि मदत करण्याची मुळातच सीताराम राणे यांची मानसिकता असल्यामुळे, जेवढे शक्य होईल तेवढी मदत सर्व माध्यमातून करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सुरुवातीला ‘लॉकडाऊन’च्या कालावधीमध्ये काय करावे आणि काय करू नये, याविषयी लोकांच्या व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सभासदांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्याचबरोबर हातावर पोट असलेले नाका कामगार असतील, घरेलू काम करणारा महिलावर्ग असेल, या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता होती. त्यासाठी वर्तकनगर, शिवाईनगर व कोकणीपाडा या परिसरातील घरेलू कामगार व नाका कामगारांना त्यांच्या घरामध्ये चूल पेटावी म्हणून धान्य-कडधान्य आणि आवश्यक असलेल्या गोष्टी इत्यादीचे मोठ्या प्रमाणात वाटप केले.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ शासनाच्या आयुष विभागाकडून मंजूर केलेल्या पाच हजार होमियोपॅथिक गोळ्यांच्या पाकिटांचे वाटप आपल्या परिसरात त्यांनी केले. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने ठरवून दिलेल्या नियम/अटी/सूचनांबाबत समज-गैरसमज होत होते. या सगळ्यांना ‘झूम’ त्याचप्रमाणे विविध माध्यमातून दर १५ दिवसांनी संपर्क साधून त्यांच्या शंकांचे निरसन ठाणे जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर मार्गदर्शन करण्यात आले असून, त्याचा उपयोग एक लाख दहा हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून सभासदांनी घेतला. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत संस्थेच्या पदाधिकार्‍यांना काही अडचणी असल्यास पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त या सर्वांशी संपर्क साधून, मार्गदर्शन करण्याचा व मदत करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आला.
 
 
मार्चअखेर सुरू झालेला हा ‘लॉकडाऊन’, कोकणातील शेतकरी आंबा उत्पादक यांच्या मुळावर आलेला गंभीर प्रश्न होता. सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे, कोकणातील आंबा उत्पादकांना तयार झालेले हापूस आंबे मुंबई-पुणे या ठिकाणी पाठवता येत नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करून, मुंबई-ठाण्याकरिता आंबा वाहतुकीसाठी परवानगी घेतली. कोकणातील प्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची २५ हजार डझनची ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना योग्य किमतीत विक्री करून शेतकर्‍यांना थेट आंब्यातून उत्पन्न मिळवून दिले. महत्त्वाचे म्हणजे, देवगड तालुक्यातील आंबा उत्पादकांचे वेगवेगळे गट तयार करून आंबा विक्रीसाठी एक साखळी तयार केली. याला, संपूर्ण ठाणे शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोकणी शेतकरी खर्‍या अर्थाने समाधानी झाला. कोरोना काळात आंब्याला इतका चांगला दर सीताराम राणे यांनी मिळवून दिला, अशा प्रकारच्या भावना अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या.
 
 
ठाणे शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सुरुवातीला सगळ्या प्रकारचे व्यवसाय बंद असल्यामुळे, नाशिक व जुन्नर येथून शेतकर्‍यांनी पिकविलेला भाजीपाला व कडधान्य थेट सहकारी गृहनिर्माण संस्थांना मिळण्याची व्यवस्था करून दिली. त्या माध्यमातूनही शेतकर्‍यांना त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना माफक दरात भाजी मिळवून, त्याचा मोबदला शेतकर्‍यांना करून दिला.
 
 

Sitaram Rane _2 &nbs 
 
“कुटुंबात कुणीही सहकारात व राजकारणात नसतानाही मी गेली १५ ते २० वर्षे महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा १५ वर्षे अध्यक्ष आहे. ठाणे शहराच्या राजकारणात अडीच दशके कार्यरत असून, गेली सात वर्षे भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचा सदस्य आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती, संस्थांशी सहकार्याचे संबंध असल्याने ‘राष्ट्र प्रथम’ हेच ब्रीद जपत आलो आहे.”
 
 
यावर्षी कोकणातील गणेशोत्सवासाठी जाणार्‍ से म्हणून राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राणे ज्या परिसरात शिवाईनगरला राहतात, त्या परिसरात काही कालावधीमध्ये ‘कोविड-१९’च्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होत होती व ती थांबविण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे आवश्यक होते, म्हणून बर्‍याच परिसरातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून यासंबंधी उपाययोजना त्यांनी केली. त्यामध्ये विनोद देसाई, संदीप शिंदे, सुमंत देसाई, ज्ञानदीप जाधव आदींसह कोकण ग्रामविकास मंडळातील सहकारी व भाजप तसेच, सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले म्हणून शिवाईनगर परिसरात ‘कोविड’ रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाल्याचे राणेंनी सांगितले.
हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून सीताराम राणे यांनी, ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांसह राज्यभरातील सोसायट्यांच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन संवाद साधला. तसेच, सर्वांना विनामूल्य मार्गदर्शन केले. सद्यःस्थितीत ‘अनलॉक’ झाल्यानंतरदेखील आजही राणे सभासद व रहिवाशांच्या अडचणींसाठी धावून जात आहेत.

- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@