ज्योत एक सेवेची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

१ _1  H x W: 0
 
 

आणीबाणीपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले संजय केळकर ठाण्यात दीर्घकाळ भाजपचे काम करत आहेत. ठाण्याच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले आहेत. कोरोना संकटात ठाणे आणि ठाणेकरांची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी ते उभे राहिले. ‘आपला माणूस, हक्काचा माणूस’ अशी ओळख असलेल्या ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी कोरोना आपत्तीत केलेल्या कामावर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख.
 
 

नाव : संजय केळकर
राजकीय पक्ष : भाजप
पद : आमदार
कार्यक्षेत्र : ठाणे शहर
संपर्क क्र. : ८१०८९११७९९
 
 
 
मावळतीला जाणारा सूर्य विचारतो, “कोण करेल माझे काम?” मातीची एक छोटीशी पणती म्हणते, “हे सूर्या, होय मी करेन तुझे काम!” गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेचा हा आशय आहे. आसमंत प्रकाशमान करणार्‍या सूर्याला मोठ्या आत्मविश्वासाने छोट्या पणतीने दिलेले हे उत्तर हीच आशा आहे. यथाशक्ती अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणारी पणती हीच सेवेची आश्वासक ज्योत आहे.
 
 
 
कोरोनाच्या भीषण संकटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली देश सामना करत आहे. केंद्र सरकारने संकटाची चाहूल लागताच जीवाचे मोल लक्षात घेऊन तातडीने पाऊल उचलली. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर कोरोना संकटात ठाणेकरांना सहकार्य करण्यासाठी ‘लॉकडाऊन’च्या अगदी पहिल्या दिवसापासून सक्रिय होते. केवळ मतदारसंघापुरते मर्यादित असे त्यांनी आपल्या कामाचे मर्यादित स्वरूप ठेवले नाही. संपूर्ण ठाणे महानगरपालिका हद्द, पालघर हा आदिवासी जिल्हा, रायगड जिल्हा असा कुठूनही अडीअडचणीचा फोन आला की तत्काळ मदत त्यांनी पोहोचवली. रोहा येथे एक रुग्णाला त्वरेने औषध पोहोचविण्यासाठी संजय केळकर यांनी पुढाकारही घेतला.
 
 
 
 
ठाण्यातील कौसा, मुंब्रा, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, इंदिरा नगर, कोपरी, पाचपाखाडी, लोकमान्य नगर आदी भागांतील झोपडपट्टीतील रहिवाशांच्या किमान गरजा भागवण्यासाठी त्यांनी आवश्यक नियोजन केले होते. केंद्र शासन, राज्य सरकार, जिल्हाधिकारी, ठामपा यांच्याशी सतत पत्रव्यवहार करून त्यांनी संबंधितांना न्याय मिळवून दिला आहे. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळप्रसंगी उग्ररूप धारण करून आपत्तीतही मनमानी करणार्‍यांना जाब विचारला आहे.
 
 
 
 
आपल्या प्राणांची बाजी लावून रात्रंदिवस दुसर्‍याचे प्राण वाचविण्यासाठी झटणार्‍या डॉक्टर्स, परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कामगार, परिवहन सेवेतील कर्मचारी अशा सगळ्यांना आवश्यक सुविधा मिळतील, यासाठी आग्रह धरला आहे. मास्क, सॅनिटायझरचे मोठ्या प्रमाणात वितरण होत आहे. गरजूंना ‘ऑन कॉल’ औषधे दिली जात आहेत. नाभिक समाज, पौरोहित्य करणारा समाज यासह ज्यांचा रोजगार पूर्णतः थांबला आहे. अशा घटकांना संपूर्ण रेशन (किराणा माल) दिले आहे.
 
 
 
 
कोरोना योद्धा’ म्हणून आमदार संजय केळकर यांनी सेवेद्वारे आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या ‘अंत्योदया’च्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. स्वामी विवेकानंदांच्या कृतिशील संदेशानेही मला प्रेरणा दिली. कै. रामभाऊ म्हाळगी यांचा आदर्श समोर होता. कै. अरविंद पेंडसे यांची उपेक्षितांसाठी तळमळ अनुभवली होती. यातून जनसेवेचा संस्कार रुजत गेला. कोरोना आपत्तीत त्या संस्काराच्या शिदोरीच्या आधारे यथाशक्ती सेवा कार्य केले आहे.
 
 
 
 
ठाण्याच्या विविध भागात ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून रोज सकस जेवण आणि त्याचे वितरण करून कोणी उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली आहे. भाजी पिकविणार्‍या शेतकरी आणि ग्राहक यांची गरज लक्षात घेऊन थेट शेतकर्‍यांकडून भाजी ठाण्याच्या विविध भागांत उपलब्ध होईल, यासाठी विशेष योजना केली आहे. आंबा उत्पादकांचे नुकसान होऊ नये आणि ज्यांना आंबे हवे आहेत, अशा दोघांसाठी आंबे उपलब्ध करून दिले आहेत.
 
 
 
 
अन्य प्रांतांतील कामगार ज्यांना आपल्या गावी परतायचे होते त्यांची वैद्यकीय तपासणी करून ते आपल्या गावी सुखरूप पोहोचतील, याची काळजी घेतली आहे. ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील भाजप कार्यकर्त्यांनी ठाणे-मुंबई परिसरात आपल्या राज्यातील अडचणीत असलेल्या नागरिकांची माहिती कळवताच त्यांना संपर्क करून त्यांना स्वगृही पाठविण्याची व्यवस्था केली आहे. हे सगळे सेवाकार्य कृतज्ञतेच्या भावनेतून होत आहे. ठाणेकरांना आपत्तीत आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
Kelkar _1  H x
 
 
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या ‘अंत्योदया’च्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. स्वामी विवेकानंदांच्या कृतिशील संदेशानेही मला प्रेरणा दिली. कै. रामभाऊ म्हाळगी यांचा आदर्श समोर होता. कै. अरविंद पेंडसे यांची उपेक्षितांसाठी तळमळ अनुभवली होती. यातून जनसेवेचा संस्कार रुजत गेला. कोरोना आपत्तीत त्या संस्काराच्या शिदोरीच्या आधारे यथाशक्ती सेवा कार्य केले आहे.
 
 
 
 
थेट मैदानात उतरून नागरिकांना सहकार्य करणे हा भारतीय जनता पक्षाचा संस्कार आहे. त्याचे प्रकटीकरण ‘लॉकडाऊन’च्या पहिल्या दिवसापासून होत आहे. ‘राष्ट्र प्रथम’ अशी भाजपची धारणा आहे. राष्ट्र संकटात असताना धावून जाणे हे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कर्तव्य मानतो, हीच आमदार संजय केळकर यांची सेवा कार्य करतानाची भूमिका आहे.
 
 
 
 
कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, ज्या नागरिकांना विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे, त्यांना तेथे प्राथमिक सुविधा मिळतील याकडे विशेष लक्ष दिले आहे. या काळात डायलिसिसच्या रुग्णांना तातडीने मदत केली गेली. १,०४० डायलिसिस सायकल पूर्ण केल्या गेल्या. यासाठी रुग्ण दत्तक योजना तयार केली होती.
 
 
 
पोलीस अधिकारी व कर्मचारी, ठामपा सफाई कामगार, वृत्तपत्र विक्रेते आणि वितरक, रेशनिंग, राज्य परिवहन कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात वितरीत केले गेले. आरोग्य सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना ठाणे येथून मुंबईत वेळेत पोहोचण्यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाशी बोलून बस सेवा उपलब्ध करून दिली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारशी नियमितपणे पत्रव्यवहार करून तातडीचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
 
 
 
जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी आमदार निधीतून रुग्णवाहिका दिली आहे. ऑनलाईन शाळा सुरु झाल्यावर गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल आणि नेट पॅक देऊन त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू केले. आ. संजय केळकर यांनी या दिलेल्या सुविधेचा लाभ ठाण्यातील अनेक विद्यार्थी घेत आहेत.
 
 
 
‘लॉकडाऊन’ ते ‘अनलॉक’ या काळात आ. संजय केळकर अथकपणे काम करत आहेत. ‘जनसेवक’ हे विशेषण त्यांनी कृतिशील केले आहे. माणुसकीचे नेते आणि कर्तव्याची प्रखर जाणीव यातून सेवेच्या ज्योतीने सेवेचा प्रकाश पेरत आहेत.
 
 
 
 
संस्कार सेवाभावी संस्था, संजय फाऊंडेशन, आरोग्यम, विश्व हिंदू परिषद, भारतीय जैन संघ, कोकण विकास प्रतिष्ठान, श्रीसंत शिरोमणी सावता माळी शेतकरी गट आणि अमेरिकेतील समीर व प्रिती गोखले यांच्या सहकार्याने आ. संजय केळकर जनजीवन सुरळीत राहावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांची त्यांना चांगली साथ मिळत आहे.




- मकरंद मुळे
@@AUTHORINFO_V1@@