कुलाबाकरांचा कैवारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

Purohit _2  H x
 
‘प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’ या भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वाचे पालन सर्वच कार्यकर्ते करतात. असाच एक हाडाचा कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक आकाश राज पुरोहित. कोरोनाच्या संकटात ते पायाला भिंगरी लावून कुलाबा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या मदतीला धावत होते. या काळात गरजूंना त्यांनी लागेल ते साहाय्य करत खूप मोठा दिलासा दिला. तेव्हा, ‘कोविड’ संकटात त्यांनी केलेल्या कामाचा हा आढावा...
 
 
नाव : आकाश राज पुरोहित
 
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
 
पद : अध्यक्ष, युवा मोर्चा कुलाबा विधानसभा
 
लोकप्रतिनिधी पद : नगरसेवक, अध्यक्ष प्रभाग समिती ‘सी’/ ‘डी’ विभाग
कार्यक्षेत्र : कुलाबा
कोरोना संक्रमणाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावलेले ‘सी’ वॉर्डमधील नगरसेवक आकाश राज पुरोहित खर्‍या अर्थाने ‘किंगमेकर’ ठरले आहेत. नागरिकांसाठी वेळोवेळी धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे लोकांमध्ये विश्वास संपादन करण्यात त्यांना यश मिळाले. ‘लॉकडाऊन’च्या काळात घराच्या चार भिंतीत बसून न राहता, त्यांनी स्वत: सार्वजनिक ठिकाणांचा दौरा केला.
दक्षिण मुंबईतील आपल्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा होणारा प्रसार लक्षात आल्यावर पुरोहितांनी बचावासाठी सर्वात प्रथम स्थानिक नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. या माध्यमातून त्यांनी विभागामध्ये सुमारे २० हजार मास्क आणि सॅनिटायझर वाटले. ‘सी’ वॉर्डमधील सर्व सार्वजनिक ठिकाणी शौचालये, बँक, भाजी मंडई, पोलीस स्टेशन, पोलीस चौक्या आणि इमारतींमध्ये निर्जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच त्यांनी कोरोनाविषयी जनजागृतीपर पत्रके वाटली.
‘लॉकडाऊन’ लागल्यानंतर हातावर पोट असणार्‍या लोकांचा दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. कोणीही उपाशी राहू नये, म्हणून पुरोहितांच्या माध्यमातून रोज सकाळी गरजूंना जेवणाची पाकिटे वाटण्यात आली. दररोज एक हजार पाकिटांचे वितरण करण्यात आले. ‘क्वारंटाईन’ केलेल्या नागरिकांची त्यांनी स्वतः जाऊन विचारपूस केली. अशाप्रकारे काही दिवसांसाठी घरबंद झालेल्या नागरिकांना घरपोच रेशन देण्यात आले. त्यांनी गरीब टॅक्सीवाले आणि झोपडपट्टीमधील गरजूंना घरपोच अन्नधान्य पोहोचविण्याची सोय केली. तसेच ‘सी’ विभागात सर्व नागरिकांना रेशनवाटप करण्यात आले. विभागातील सर्वसामान्य लोकांना दैनंदिन भाजीपाला खरेदी करण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यांच्यासाठी पुरोहितांनी विभागात स्वस्त दरातील भाजीपाला केंद्रे सुरू केली.




Purohit _1  H x



"एकूणच कोरोनाकाळात धडाडीने काम केल्यामुळे नागरिकांचे आशीर्वाद मिळालेच. मात्र, मी आणि माझ्या कार्यकर्त्यांप्रति नागरिकांचा विश्वास संपादन होण्यास मदत मिळाली."
हातावर पोट असणार्‍या भाजीवाल्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी पुरोहित त्यांच्या मदतीला धावून गेले. गरीब आणि गरजू भाजीपालावाल्यांना मुंबादेवी येथील मैदानात स्थलांतरित केले. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करून त्यांंना भाजी विकण्याची सोय करून देण्यात आली. याशिवाय धोबीतलाव येथील ए.पी. मार्केटमध्ये चिकन आणि मटन ग्राहकांची झुंबड होत होती. या ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पुरता फज्जा उडाला होता. याची स्थानिक नागरिकांनी पुरोहितांकडे तक्रार केली. यावेळी त्यांनी त्वरित ही बाब उपायुक्त हर्षद काळे आणि ‘सी’ विभाग साहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या निदर्शनास आणू दिली. यासंदर्भात झालेल्या कारवाईत मार्केट बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला.
कोरोना व्हायरसच्या सुरक्षा आणि नियंत्रणासाठी जास्तीत जास्त नागरिकांना मोठ्या संख्येने मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले. मुंबईतील प्रत्येक नगरसेवकांना तातडीने विशेष निधी देण्यात यावा, अशी मागणी पुरोहितांनी केली. ‘सी’ विभागामधील प्रभाग क्र. २२१ मध्ये त्यांच्या माध्यमातून प्रत्येक इमारत आणि सार्वजनिक मंदिरांमध्ये जंतुनाशक आणि धुराची फवारणी करण्यात आली. व्यावसायिकांना मास्क आणि हॅण्डग्लोव्हज अनिवार्यपणे वापरण्याबाबत सांगण्यात आले. यासाठी महापालिकाने विक्रेत्यांना मास्क आणि हॅण्डग्लोव्हज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच भारतीय सीमेवरील चीनचा वाढता आक्षेप लक्षात घेऊन कुलाबा विधानसभेमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
पावसाळी हंगामात कोरोनाबरोबरच साथीच्या आजारांचा धोका होता. अशावेळी डासांमुळे होणार्‍या मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांपासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी रोज विभागात फवारणी करण्यात आली. ‘मिशन झिरो मोहीम’ उपक्रमांतर्गत पुरोहितांनी विभागात मोफत ‘कोविड’ चाचण्या उपलब्ध करून दिल्या. ‘कोरोना योद्धा’ आणि लडाख, कारगील येथील वीर जवानांना रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठविण्यात आल्या. श्रीराम मंदिर निर्माण शिलान्यास समारोह दिवसानिमित्त त्यांनी विभागातील सर्व रामभक्तांना तुळशी, खिचडी, केळी व लाडूवाटप केले. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
मंदिरे चालू करण्यासाठी त्यांनी घंटानाद आंदोलन आणि हस्ताक्षर अभियान राबविले. ‘आत्मनिर्भर किसान बाजार’ मोहिमेअंतर्गत शेतकर्‍यांकडून थेट भाजी आणून त्याची विक्री करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोहितांनी प्रभाग क्र. २२१ मध्ये ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन केले होते. याअंतर्गत मुंबादेवी उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. जी.टी. हॉस्पिटलमधील रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळे, बिस्किटे, सॅनिटायझर, मास्क देण्यात आले. भुलेश्वर येथील जलाराम बाप्पा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक भाजप आणि युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. वर्धमान चौक, लोहार चाळ, काळबादेवी, गीताग्रह बिल्डिंग, मंगलदास मार्केट, श्यामलदास गांधी मार्ग, पिकेट रोड या ठिकाणी स्वच्छता अभियान आणि प्रभाग क्र. २२१ मध्ये धूरफवारणी करण्यात आली. विकलांगांना ‘व्हीलचेअर’ देण्यात आल्या. तसेच प्रभाग क्र. २२१ मधील कोळीवाडी येथील महिलांना सॅनिटरी पॅड देण्यात आले.
कोरोनाच्या कठीण काळात पुरोहितांकडून झालेल्या या मदतीला त्यांच्या सहकार्‍यांचा मोठा हातभार लागला आहे. भारतीय जनता पक्ष, मुंबई अध्यक्ष तथा आमदार मंगलप्रभात लोढा व युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या अध्यक्षतेखाली, मा. कॅबिनेट मंत्री तथा आमदार राज के. पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली, कुलाबा विधानसभा आमदार राहुल नार्वेकर यांच्या निर्देशनाखाली, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर व युवा मोर्चा दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सनी सानप यांच्या संयोगाने ही कामे करण्यात आली.
वॉर्ड अध्यक्ष २२१ जसवंतसिंह राठोड, अभिजीत चव्हाण, राकेश नेवरेकर, कुलदीप शहा, पल्लवी सप्रे, सोनल नाईक, अहमद मन्सुरी, रोहित अध्यारू, राम ठाकूर, जयेश शाह, अनराज नौवरा, आशाताई माणगावकर, नूतन सोनी, अंकित शर्मा, केडी शहा, सुनील शहा, छोटा ठाकूर, अभिराज खिलारी, नरेंद्र ठाकूर, मनीष जैन, लक्ष्मण परमार, सुरेश मांगवकर, संतोष यादव, राम ठाकूर, राहुल सागर, योगेश ठक्कर, विजेंद्र मिश्रा, रामदास गीते, विक्रम गोहिल, दत्ताभाई शेजवल, विजय भागवत, जितू नाईक, अनुप श्रीवास्तव, तरुण जाणा, राधानाथ मोडक, हितेश कोठारी, नील शहा, हितेश शर्मा, शिवांश सिंघ, मनीष पुरोहित, मनीष शाह, विजयराजजी, भावेश सोनी या सर्व भाजप आणि युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मदत त्यांना मिळाली.

- अक्षय मांडवकर
@@AUTHORINFO_V1@@