लोकसेवेचा अविरत वारसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |
Tejinder sing _2 &nb
कोरोनाच्या संक्रमण काळात मैदानात उतरून सर्वसामान्य जनतेत जाऊन प्रत्यक्ष मदतीचा हात देणे जितके जिकिरीचे तितकेच धाडसाचे. मात्र, सामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याला निश्चयाचे बळ देत, मदतीचा हात तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी केले. कोरोना संकटकाळातील त्यांच्या कामावर दृष्टिक्षेप टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न.
 
 

तेजिंदरसिंग तिवाना
राजकीय पक्ष : भाजप
पद : भाजयुमो मुंबई अध्यक्ष
कार्यक्षेत्र : मुंबई (पश्चिम उपनगर)
संपर्क क्र. : ९९६७५६६६६१
 
 
 
 
जनसेवेसाठी राजकारणात प्रवेश केलेल्या तेजिंदरसिंग तिवाना यांनी मालाड परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. नेत्याला मार्ग माहिती असतो, त्या मार्गाने तो जातो आणि मार्ग दाखवितो, या नेतृत्वाच्या मूल्यावर तिवाना यांचा विश्वास आहे. त्यांचे वडील सतनामसिंग तिवाना आणि आई जया तिवाना गेल्या ३० वर्षांपासून लोकसेवेच्या कार्यात आहेत. आईवडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून, तिवाना यांनीही कोरोनाकाळात विविध लोकोपयोगी कामे केली.
 
 
‘लॉकडाऊन’ जाहीर होण्याआधीच कोरोनाचे संकट ओळखून कार्यकुशल, तरुण तडफदार, युवा नेतृत्व अशी ओळख असलेल्या तेजिंदरसिंग तिवाना यांनी आपल्या सहकार्‍यांबरोबर बैठक घेतली व सर्वसामान्यांसाठी कोणत्या स्वरूपात आणि कशी मदत करायची, याचे नियोजन केले. याच नियोजनातून मुंबईतील ३६ विधानसभा मतदासंघातील लाखो व्यक्तींपर्यंत त्यांच्या पुढाकाराने मदत पोहोचविली. त्यात अन्न पाकिटांपासून ते मास्क-सॅनिटायझर वाटप व रक्तदानापासून स्थलांतरित कामगारांसाठी भोजन व्यवस्थेचा समावेश होतो. यात त्यांचे १४ सहकारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ झाले. पण, त्यांनी आपले काम थांबविले नाही.
 
 
तिवाना यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघात सहा ‘कम्युनिटी किचन,’ रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित सहा पाकगृहे व भाजयुमोच्या पाच स्वयंपाकघरांच्या माध्यमातून तब्बल तीन लाख ३४ हजार अन्न पाकिटांचे वितरण करण्यात आले. इतकेच नव्हे, तर सर्वसामान्य गरजवंतांपर्यंत सुमारे ३१ हजार ६६० मोदी किट्स किंवा जीवनावश्यक वस्तूंची पाकिटेदेखील पोहोचविण्यात आली. त्यापैकी १५ हजार ३४० रेशन किट भाजयुमोमार्फत, तर १६ हजार ३२० रेशन किट भाजपचे लोकप्रतिनिधी व बिगरसरकारी संस्थांच्या सहकार्याने वितरित केली गेली.
 
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचावासाठी व जागृतीसाठी तेजिंदरसिंग तिवाना यांनी आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजे मुंबईत सुमारे १८ हजार ९९० व्यक्तींना ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करून दिले. कोरोनाच्या संकटकाळात माहिती, मार्गदर्शन व मदतीसाठी ‘२६३’ हेल्पलाईन क्रमांक सुरू केला. त्यामार्फत त्यांना चार हजार ४७८ फोन कॉल्स आले व औषधे, अन्न पाकिटे, रुग्णवाहिका, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंसाठीच्या पासेससाठी सहकार्य करण्याचे काम तिवाना व त्यांच्या सहकार्‍यांनी केले. रमजानच्या काळात गरजूंना इफ्तारसाठी खाद्यपदार्थ साहित्याचेही तिवाना यांनी वाटप केले.
 
 
 

Tejinder sing _1 &nb
 

"कोरोना काळात माजी मुख्यमंत्री व विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले, त्यांचे कार्य माझ्यासाठी व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरक गोष्ट ठरली, तसेच मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही मुंबईभर गरजवंतांसाठी धाव घेतली, त्यांचे कार्यदेखील आम्हाला प्रेरणा देऊन गेले व मी, तसेच सहकार्‍यांनी कामाला सुरुवात केली."
 
तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वात रक्तपेढी व रुग्णालयांतील रक्तपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७०व्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘सेवा सप्ताह’ काळात भाजयुमोने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले व त्यात तब्बल चार हजार ९०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने तिवाना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील तब्बल चार हजार ४८० इमारती आणि ४५४ झोपडपट्टी वस्त्यांमध्ये सॅनिटायझेशनचे काम केले. तसेच मुंबईत निर्माण होणारा कचरा एकत्र करून त्याची पर्यावरणपूरक विल्हेवाटही लावली. गणेशोत्सवाच्या काळात घरगुती गणपती विसर्जनासाठी मुंबईत गणेश विसर्जन रथ तयार करून ती सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली.
 
 
तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी १४४ रेशन दुकानांमध्ये गरजूंना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली. ‘लॉकडाऊन’मुळे उद्योगधंदे बंद पडल्याने स्थलांतरित कामगारांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले व तिवाना यांनी इथेही मदतीची भूमिका घेतली. भाजयुमोच्या माध्यमातून हेल्पलाईन क्रमांक सुरू केले. मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघात स्थलांतरित कामगारांसाठी श्रमिक विशेष रेल्वेगाड्या आणि बसेसमध्ये जाऊन तयार अन्न पाकिटे तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वितरण केले.तृतीयपंथीयांसाठी भाजयुमोच्या माध्यमातून तयार अन्नाची व रेशन किटची व्यवस्था करण्यात आली. अशा १६३ कुटुंबांना मदत केली गेली. तेजिंदरसिंग तिवाना यांनी प्रामुख्याने आरोग्य कर्मचार्‍यांना ‘पीपीई’ किटचे वाटप केले, तसेच रुग्णांकडून ‘पीपीई’ किटची किंमत वसूल करू नये, अशी विनंतीही करण्यात आली.
 
 
भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानुसार भाजयुमो उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने ‘क्वारंटाईन सेंटर’मधील निकृष्ट दर्जाच्या व झुरळे आढळलेल्या अन्नाविरोधात पोलिसांत तक्रारही करण्यात आली. तसेच ठेकेदाराविरोधातही तक्रार करण्यात आली.रोगप्रतिकार शक्ती वर्धक औषधी म्हणून भाजयुमो पदाधिकार्‍यांनी मुंबईतील ३६ हजार कुटुंबांना आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथी गोळ्यांचे वाटपही केले. तसेच तेजिंदरसिंग तिवाना व त्यांच्या भाजयुमोतील सहकारी-कार्यकर्त्यांनी २९ हजार नग सॅनिटायझर आणि एक लाख २३ हजार नग मास्कचेदेखील मुंबईभर वितरण केले. सोबतच मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना सॅनिटायझेशन स्टॅण्डचे वाटप केले व मुंबईमधील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सॅनिटायझेशन मशीनचे वाटप केले.
 
 
दरम्यान, पोलीस कर्मचारी आणि स्थलांतरित मजुरांसाठी इलेक्ट्रोल पावडरचे वाटपही त्यांनी केले. सोबतच तिवाना यांनी व भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांनी ‘क्वारंटाईन सेंटर्स’मध्ये दूध वितरणाचीदेखील मदत केली. मुंबईमधील व्यापारी बंधूंना चिनी वस्तूंची विक्री न करता स्वदेशी वस्तू विक्रीसाठीदेखील तिवाना यांनी कोरोनाकाळात प्रेरित केले. तसेच चिनी वस्तू नागरिकांनी खरेदी करू नये, यासाठी जनजागृती केली. सोबतच कोरोनाबरोबरच मुंबईत अमली पदार्थांचे संकटही निर्माण झाले होते, त्यामुळे अमली पदार्थ (ड्रग्ज) विरोधी अभियानही तिवाना यांनी राबविले.
 
 
तेजिंदरसिंग तिवाना यांनी व भाजयुमोने मोकळी जागा उपलब्ध असलेल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये शेतकरी बाजारांचेही आयोजन केले. भाजयुमोच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षेसाठी जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत वाहतूक व्यवस्थादेखील उपलब्ध करून दिली. तिवाना यांना यादरम्यान कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा मिळाला, त्यांच्या मातोश्रींनी इतरांना मदत करण्याच्या त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले. तसेच आपल्या ग्रुपच्या माध्यमातून व स्वतः वैयक्तिकरीत्यादेखील सेवाकार्यासाठी आर्थिक मदत केली. तेजिंदरसिंग तिवाना यांना त्यांच्या सहकार्‍यांनी सदैव सहकार्य केले. तिवाना यांनीदेखील आपल्या सहकार्‍यांचा आरोग्य विमा उतरवला व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली. तेजिंदरसिंग तिवाना यांना खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनीदेखील वेळोवेळी मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या कामाचे कौतुकही केले, त्यामुळे तिवाना व सहकार्‍यांचा कामाचा हुरूप वाढला.
 
-  महेश पुराणिक
@@AUTHORINFO_V1@@