मदतकार्याचा श्रीगणेशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |
sangita gaikwad _1 &



कोराच्या काळात नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. २० च्या नगरसेविका संगीता गायकवाड व त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी नागरिकांना मदतीचा हात देऊ केला. दु:खितांचे अश्रू मदतीच्या रूपाने पुसण्याचे सर्वात पहिले काम या दाम्पत्याने केले. नाशिक शहरात गायकवाड दाम्पत्याने सर्वात आधी मदतीचा श्रीगणेशा केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...

संगीता हेमंत गायकवाड
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक तथा सभापती, शिक्षण समिती, 
नाशिक मनपा प्रभाग क्र. : २०
संपर्क क्र.: ९३७१६६७८२४

 


 
‘कोरोना’मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, तसेच कोरोना महामारीचा फैलाव रोखता यावा, यासाठी देशासह राज्यात दि. २४ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले होते. अचानकपणे देश बंद झाल्याने नागरिकांसमोर अनेक आव्हाने एकाच वेळी उभी ठाकली. हातावर पोट असणारे मजूर, रोजंदारी कामगार, परप्रांतीय, हमाल अशा समाजातील अनेक घटकांसमोर त्यामुळे अन्न, पाणी यांच्या पूर्ततेचे मोठे संकट उभे राहिले. या सर्वांसाठी गायकवाड दाम्पत्याने ‘कोविड’ काळात केलेल्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

 

‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यानंतर नागरिकांचा अन्नाचा प्रश्न हा समाजात गंभीर बनण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे गायकवाड यांनी १५ हजार ८४१ कुटुंबांना कोरड्या शिध्याचे वाटप केले. तसेच त्यांनी ३,७०० नागरिकांना शिजवलेल्या अन्नाचे वाटप केले. अन्नवाटपाचे हे कार्य अविरत सुरू होते. आजही गायकवाड यांच्या वाहनात कोरड्या शिध्याचे किट आपल्याला सहज दिसून येते. ‘अनलॉक’च्या दिशेने आता आपण जात आहोत. मात्र, तरीही कुणी गरजवंत असल्यास किंवा कोणी मदतीपासून वंचित असल्यास त्याच्या मुखात अन्नाचे दोन घास जावे, यासाठी संगीता व हेमंत गायकवाड आजही प्रयत्नशील आहेत हे विशेष. याच कळात त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर हमालीचे कार्य करणार्‍या हमालांच्या ५० पेक्षा जास्त कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले. त्याचबरोबर या काळात वृत्तपत्रवाटपाचे अविरत कार्य करणारे वृत्तपत्रविक्रेते बांधवांच्या १४० कुटुंबांना त्यांनी किराणा मालाचे वाटप केले.


 
 
sangita gaikwad _1 &
आम्ही प्रभागात जे कार्य केले, तसे कार्य इतरांनीही करावे. यामुळे इतरांची मदत तर होतेच, पण आपल्यालाही ही मदत केल्याचे समाधान प्राप्त होते. मानवधर्म मोठा असून तो जोपासला जावा. सर्वांनी आरोग्यदायी आणि सहिष्णू कार्य केल्यास देश कोरोनामुक्त होण्यास नक्कीच हातभार लाभेल.

 
प्रभागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या प्रभागात होऊ नये, यासाठी त्यांनी सेवकाच्या भूमिकेतून ६५० पेक्षा जास्त नागरिकांच्या अॅन्टिजेन चाचण्या गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात आल्यामदत ही केवळ तात्कालिक नसावी, तर ती नेहमी शाश्वत असावी याकडे गायकवाड यांचा विशेष ओढा होता. त्यामुळे कोविड काळात जनतेत थेट मिसळून कार्य करणार्‍या आणि नागरिकांच्या आरोग्याची चाचणी करणार्‍या आशा सेविका यादेखील तितक्याच महत्त्वाच्या होत्या, हे गायकवाड यांनी जाणले. यामुळे आठ आशा सेविकांचा प्रत्येकी तीन लाख रुपयांचा वैयक्तिक विमा गायकवाड यांनी स्वखर्चाने काढला. मदतकार्य हे सुरू होते आणि आजही सुरूच आहे. मात्र, रोगाचा प्रसार वाढू नये आणि तसेच नाशिकरोड भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी गायकवाड दाम्पत्याने ‘आर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे वाटप करत कोरोनाला थोपविण्याचा यथोचित प्रयत्न केला. 

 



 

याकाळात बिहार, उत्तर प्रदेश आदी भागातील परप्रांतीय मजुरांचे होणारे हाल हे अवर्णनीय असेच होते. या मजुरांना तुम्ही एकटे नसून आमची साथ-सोबत तुम्हाला आहे. याची जाणीव करून देणे, त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरविणे, हे आवश्यक होते. अशावेळी केवळ तोंड देखले काम करणे आवश्यक नसून प्रत्यक्षकृती करणे आवश्यक आहे. हे गायकवाड यांनी जाणले. त्यामुळे या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे कार्यदेखील त्यांनी केले. २३ नगरसेवकांनी व्यापलेल्या या भागात गायकवाड यांची मदतीची साधना अशा प्रकारे अविरत सुरू होती. गायकवाड यांच्या या कार्याची आणि त्यांच्या मदतीच्या वृत्तीची बातमी बँकॉकपर्यंत पोहोचली. नाशिकरोड भागात वास्तव्यास असणारे विजय काळे हे बँकॉक येथे विमाने बंद असल्याने अडकले होते. त्यांच्या भारतात येण्याच्या सर्व आशा धुसर झाल्या होत्या. खिशातील पैसे संपत आले होते. तेथील मुक्काम हा खर्चिक होता. अशा कोंडीत अडकलेल्या काळे यांना गायकवाड यांनी मदतीचा हात देऊ केला. नाशिकचे खासदार व केंद्रीय मंत्रालय यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत काळे यांचे स्वदेश आगमन गायकवाड यांनी सुकर बनविले. आपल्या केलेल्या मदतीबद्दल काळे आजही गायकवाड यांचे विशेष आभार मानतात. तसेच, त्यांच्या डोळ्यातील अश्रू आजही या मदतीचे महत्त्व विशद करताना आपल्याला दिसून येते. अशाच प्रकारची मदत गायकवाड यांनी ओमान येथे अडकून पडलेल्या संदीप गायकवाड यांना करत त्यांना मायभूमीचे दर्शन घडविले. या कार्यात त्यांना कांचन चव्हाण, मनीषा गायकवाड, सुजाता जोशी, सचिन हांडगे, जयंत नारद, गौरव विसपुते, योगेश भगत आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 


 

‘कोविड’ काळात करण्यात आलेल्या या मदतीचे शिवधनुष्य गायकवाड दाम्पत्याने स्वतः पेलले. साधारणत: सहा लाख ८० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च गायकवाड दाम्पत्याने मदतकार्यासाठी केला. विशेष म्हणजे, हा सर्व खर्च त्यांनी वैयक्तिकरीत्या केला. त्यासाठी त्यांनी आपले भविष्य निर्वाह निधीचे कर्जदेखील उचलले. मदतकार्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्रीची उपलब्धता करणे हे एक मोठे आव्हान गायकवाड दाम्पत्यापुढे या काळात होते. परिवहन व्यवस्था बंद असल्याने सामानाची सहज उपलब्धता होत नव्हती. अशा वेळी संगीता गायकवाड यांचे पती हेमंत गायकवाड यांचे मित्र कामास आले. त्यांच्या सहकार्यांने गायकवाड यांनी मोठ्या स्वरूपात एकत्रित सामान खरेदी करण्यास प्राधान्य दिले. तसेच, सेवावस्तीत कार्य करताना स्वतःचे आरोग्य जपणे हे एक मोठे आव्हान होते. सजगता बाळगत त्यांनी हे आव्हानदेखील लीलया पेलले. समाजातील कोणताही घटक मदतीपासून वंचित राहू नये, याचाच विचार हे दाम्पत्य सातत्याने करत असे. त्यामुळे असा घटक शोधण्याचे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. यासाठी सूक्ष्म नियोजन कामी आल्याचे ते आवर्जून नमूद करतात. मदतकार्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे सहकार्य गायकवाड यांना लाभले. गायकवाड दाम्पत्याच्या दोन मुली, एक मुलगा यांनीदेखील आपल्या माता-पित्याच्या या सेवाभावपूर्ण कार्यात स्वत:ला झोकून दिले. यासाठी संगीता गायकवाड यांना पती व भाजप मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड आणि नाशिकरोडमधील सर्व ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले


 

‘कोविड’ काळात नागरिकांच्या सर्वच प्रकारच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना रोजगारक्षम बनविणेकामी यापुढील काळात गायकवाड मदत करणार आहेत. परप्रांतीय नागरिकांना पायी चालताना पाहून मन हेलावले असल्याचे गायकवाड नमूद करतात. केलेल्या मदतीमुळे लोकांनी राजकारणी न मानता ईश्वराची उपमा देण्यास सुरुवात केल्याचे गायकवाड सांगतात. अविरत कार्याचा मनोदय गायकवाड बोलून दाखवितात.

@@AUTHORINFO_V1@@