मदत व प्रबोधनकारी सेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |
rupali nikule _1 &nb



कोरोनाकाळात समाजातील नागरिकांना अनेकांनी मदत केली. वस्तू, अन्न, कपडे व इतर माध्यमातून करण्यात आलेली मदत ही नक्कीच आवश्यक अशीच होती. मात्र, त्याचबरोबरीने नागरिकांना कोरोनाबाबत माहिती देणे आणि त्यांचे प्रबोधन करत त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणेही आवश्यक होते. इतर मदतीबरोबरच प्रभाग क्र.२३ (अ) च्या नगरसेविका रूपाली यशवंत निकुळे यांनी केलेले कार्य हे नक्कीच वाखाणण्याजोगे असेच आहे.

रूपाली यशवंत निकुळे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्य, 
नाशिक मनपाप्रभाग क्र.: २३ (अ)
संपर्क क्र. : ९३७१५२५१९५

दि. १ एप्रिलपासून या कोरोनाच्या काळात आपल्या मदतकार्याचा झरा समाजात रिता करण्यास निकुळे यांनी सुरुवात केली.तांदूळ, तुरडाळ, गहू, पीठ आदी कोरड्या शिध्याचे वाटप करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर त्यांनी शिजविलेल्या अन्नाचे वाटपदेखील केले. सुमारे ६,५०० कुटुंबांना त्यांनी मदत केली. यात जवळपास ७० टक्के नागरिक हे विविध सेवावस्तीत वास्तव्यास असणारे होते हे विशेष. तसेच, निकुळे यांच्या मदतीने परराज्यातील नागरिकदेखील सुखावले. त्यांचा प्रवास निकुळे यांच्या मदतीमुळे सुखकर होण्यास मदत झाली. निकुळे यांच्या माध्यमातून शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनीनगर, शिवाजीवाडी घरकूल योजना, बजरंगवाडी, सिद्धार्थनगर, आदर्शनगर या सेवावस्तीत तसेच विनयनगर, दीपालीनगर, सुचितानगर, साईनाथनगर, अमृतवर्षा कॉलनीलगतचा महामार्ग व प्रभागातील कॉलनी आदी भागात मदत करण्यात आली. याकामी त्यांना गणपत वारडे, मनसुर पटेल, अशोक भारुडकर, मोईन बागवान, सुनील निकम, राजू मोरे, संगीता बोकड, भागूबाई आरदाळकर आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे पाठबळ आणि सहकार्य लाभले.

 
 

‘कोविड’काळात सामाजिक संकट सर्वात मोठे होते. ‘गरजवंत अनेक आणि मदतीच्या मर्यादा’ अशी स्थिती सामान्यपणे समाजात दिसून येत होती. त्यामुळे मदतीचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे, यासाठी निकुळे यांच्या या समाजकार्यात अनेक सामाजिक संस्थांचा हातभार लागला. सर्वांच्या सहभागाने ‘कोविड’काळातील मदतकार्य निकुळे यांनी समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचविले. त्यात त्यांना मुक्ताई सामाजिक संस्था, दशरथ नंदन बहु उद्देशीय संस्था, श्रीरामनगर, विनयनगर, दीपालीनगर, साईनाथ नगरमधील ज्येष्ठ नागरिक संघ, शिवाजीवाडी मित्रमंडळ, नंदिनीनगर मित्रमंडळ, भारतनगर मित्रमंडळ यांसारख्या संस्थांची बहुमोल मदत झाली. मदतकार्य करत असताना आर्थिक विषयाचा भारदेखील निकुळे यांनी पेलला. यासाठी त्यांनी साधारण साडेतीन लाख रुपयांच्या पुढे निधी या मदतकार्यासाठी खर्च केला.

 
 

कोरोनाकाळात मदतीची आस असणारे अनेक नागरिक होते. त्यांना मदत करणारे दाते त्यांच्या संपर्कात आले असता, तेथे ते त्यांच्याजवळ गोळा होत असत. नागरिकांना त्यांचे कुटुंब जगविण्याचा प्रश्न होता आणि हा प्रश्न या नागरिकांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसून येत होता. नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्याचे मोठे आव्हान निकुळे यांच्यासमोर होते. मदत घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. त्यांना नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान निकुळे यांच्या समोर होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव न होण्याची काळजी निकुळे यांना मोठ्या प्रमाणात घ्यावी लागली. यासाठी पोलीस आणि कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर मदत निकुळे यांना झाली. बॅरिकेटिंग करत पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविण्याकामी निकुळे यांना मोठी मदत केली.तसेच, शिधा उपलब्धतेचे मोठे आव्हानही निकुळे यांच्यासमोर होते. यासाठी निकुळे यांचे पती यशवंत निकुळे यांच्या मित्रवर्यांची मोठी मदत त्यांना झाली. तसेच, केवळ मदत न करता, निकुळे यांनी कोरोनाची नेमकी भयावहता आणि त्यापासून नागरिकांनी आपले आरोग्य रक्षण कसे करावे, याबाबत नागरिकांना मार्गदर्शनही केले. या प्रबोधनामुळे नागरिकांचा आत्मविश्वास द्विगुणित होण्यास मोठी मदत झाली.



rupali nikule _1 &nb

सामाजिक जाणिवेतून कार्यकर्त्याने सेवक म्हणून कार्य करत राहणे आवश्यक आहे. समाजाचे आपण देणे लागतो, हा भाव प्रत्येकाने सदैव आपल्या मनी बाळगणे आवश्यक आहे. संकटे ही येत-जात असतात. मात्र, कार्य हे चिरस्थायी टिकणारे असते.

 

 
 
 

मदतकार्य विनाअडथळा पार पडावे यासाठी निकुळे यांना सरकारी यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले. त्यासाठी पोलीस, नाशिक महानगरपालिका व जिल्हाधिकारी यंत्रणेने त्यांना विशेष पास देऊ केले होते. त्यामुळे निकुळे यांच्या कार्यकर्त्यांना मदतीचा ओघ अविरत सुरू ठेवणे सहज शक्य झालेकोरोनाकाळात मदतकार्यासाठी निकुळे यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोठी मदत झाली. त्यासाठी कुटुंबीयांचा १०० टक्के पाठिंबा रूपाली निकुळे यांना होता. सासरे केशव निकुळे, सासू मुक्ताबाई निकुळे, पती यशवंत निकुळे यांची मोलाची साथ लाभली. निकुळे यांच्या कुटुंबाने गरिबी अनुभवली आहे. त्यामुळे गरिबीच्या आणि हलाखीच्या परिस्थितीची निकुळे यांच्या कुटुंबाला पूर्णत: जाणीव आहे. त्यामुळे गरजवंत हे कोरोनामुळे नंतर आपल्या जीवाला मुकतील; मात्र भुकेने हे नागरिक मृत्युपंथास जाऊ नये, यासाठी त्यांना वेळीच आणि आवश्यक ती मदत करण्याचा पाठिंबा निकुळे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी दिला. त्यामुळे रूपाली निकुळे यांचा आत्मविश्वास अधिकच द्विगुणित होण्यास मदत झाली. या मदतकार्यात भाजप पक्षाचा मोठा पाठिंबा निकुळे यांना लाभला. आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, यांचे मोलाचे मार्गदर्शन निकुळे यांना प्राप्त झाले. तसेच त्यांनी प्रशासकीय संवाद साधत मदतीचा मार्ग सुकर करण्यास मोठे योगदान दिल्याचे निकुळे आवर्जून नमूद करतात.

 
 

आजही निकुळे या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ व मास्क यांचे मोठ्या प्रमणावर वाटप करत आहेत. बेरोजगारांना विविध आस्थापनांत रोजगार निकुळे यांनी उपलब्ध करून दिला आहे. ‘लॉकडाऊन’काळात रोजगार गमविलेल्या २० बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे, तसेच प्रभागात नागरिकांची ‘रॅपिड टेस्ट’देखील आजही निकुळे या घेत आहेत. भविष्यातदेखील असेच कार्य सुरू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. निकुळे यांना काम करत असताना अनेक भावनिक प्रसंगांचा सामना करावा लागला. मात्र, त्यातील काही प्रसंगांनी निकुळे यांचे मन अक्षरश: हेलावून टाकले. जेव्हा निकुळे या शिवाजीवाडी सेवावस्तीमध्ये मदत घेऊन पोहोचल्या असता, तेथील हातावर पोट असणारा कामगारवर्ग हा भुकेने त्रासलेला त्यांना दिसून आला. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांची आवक थांबलेली होती. अशा वेळी निकुळे यांची मदत पाहून हे लोक त्यांच्या पाया पडून ढसाढसा रडू लागले. त्यांना धन्यवाद देऊ लागले. हे चित्र पाहून निकुळे यांचे मन त्यांच्यासमोर उभे ठाकलेले संकट पाहून व्याकूळ झाले.

 
 

तसेच, त्यांच्या प्रभागातील भारतनगरहा भाग तसा मुस्लीमबहुल भाग. या भागात ‘तबलिगी’ प्रकरणामुळे मदत पोहोचत नव्हती. मात्र, निकुळे यांनी तेथे मदत केली. तेव्हा धर्मापलीकडे विचार करून मानवता जागृत ठेवणारे सेवक म्हणून लोकांनी निकुळे यांना धन्यवाद दिले. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यावर दयनीय स्थितीतील महिलेची करूण कहाणी निकुळे आजही विसरू शकत नाहीत. त्यांना किराणा सामानाची मदत केल्यावर त्या महिलेचे कृतार्थ भाव आजही निकुळे यांना स्पष्ट जाणवतात. काही लोक हे संकट संधी म्हणून पाहत असले, तरी 95 टक्के लोकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे निकुळे सांगतात.

 

 

@@AUTHORINFO_V1@@